19 April 2025 1:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HUDCO Share Price | तब्बल 852 टक्के परतावा देणारा सरकारी कंपनीचा शेअर, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO TTML Share Price | टाटा ग्रुपचा स्वस्त शेअर, यापूर्वी 2393% परतावा दिला, पेनी स्टॉक टार्गेट नोट करा - NSE: TTML JSW Steel Share Price | हा स्टील कंपनीचा स्वस्त शेअर खरेदी करा, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JSWSTEEL HFCL Share Price | कंपनीत रिलायन्स ग्रुपची हिस्सेदारी, 83 रुपयाचा शेअर फोकसमध्ये, फायद्याची अपडेट - NSE: HFCL Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल
x

Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअरने गुंतवणुकदारांना मजबूत तेजीत, 3 वर्षात पैसा 7 पट वाढवला, खरेदी करणार का?

Tata Power Share Price

Tata Power Share Price | टाटा ग्रुपचा भाग असलेल्या टाटा पॉवर कंपनीने सेबीला नुकताच एक नवीन माहिती कळवली अने. टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जी लिमिटेडची उपकंपनी टीपी बर्दवान सूर्या लिमिटेड कंपनीला टाटा स्टील कंपनीकडून 966 मेगावॅट राउंड-द-क्लॉक हायब्रीड अक्षय उर्जेची ऑर्डर प्राप्त झाली आहे.

भारतीय वीज खरेदीमधील हा आतपर्यंतचा सर्वात मोठा औद्योगिक करार असल्याचे मानले जात आहे. आज मंगळवार दिनांक 13 जून 2023 रोजी टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 0.68 टक्के वाढीसह 222.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

या नवीन प्रकल्पांतर्गत हायब्रीड नूतनीकरण क्षमता असलेल्या 380 मेगावॅट आणि पवन ऊर्जेची 587 मेगावॅट क्षमता असलेला प्रकल्प उभारण्याचे काम असेल. टाटा स्टील कंपनी वार्षिक 35 दशलक्ष टन क्रूड स्टील उत्पादन करणारी भारतातील सर्वात मोठी स्टील कंपनी आहे. टाटा स्टील ही जगातील सर्वात मोठी वैविध्यपूर्ण पोलाद उत्पादक कंपनी म्हणून प्रसिद्ध आहे. या ऊर्जा प्रकल्पामुळे टाटा स्टील कंपनीच्या हरित ऊर्जेची गरज मोठ्या प्रमाणात भागवली जाणार आहे.

या नवीन ऊर्जा प्रकल्पातून टाटा स्टील कंपनीच्या कार्बन उत्सर्जनात 23.89 लाख टन इतकी मोठी घट होणार आहे. टाटा स्टील कंपनी.26 टक्के इक्विटीसह या ऊर्जा प्रकल्पात भागीदारी करणार असून हा प्रकल्प 1 जून 2025 पर्यंत कार्यान्वित केला जाईल, अशी माहिती कंपनीने दिली आहे.

टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी लिमिटेड ही कंपनी भारतातील ऊर्जा क्षेत्रातील सर्वात मोठ्या टाटा पॉवर कंपनीची उपकंपनी आहे. ही कंपनी भारतातील सर्वात मोठ्या अक्षय ऊर्जा क्षेत्रातील कंपन्यापैकी एक आहे. टाटा पॉवर कंपनीकडे सोलार, विंड, हायब्रीड, पीक, फ्लोटिंग सोलर आणि स्टोरेज सिस्टीम इत्यादी ऊर्जा उत्पादन कार्यात कौशल्य प्राप्त आहे.

टाटा पॉवर कंपनीकडे वीज निर्मिती, पारेषण आणि वितरण यांचा दीर्घ काळाचा अनुभव आहे. मागील 3 वर्षात टाटा पॉवर कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 700 टक्के परतावा कमावून दिला आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 0.6 टक्के वाढीसह 222 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते. मागील बुधवारी म्हणजेच 7 जून 2023 रोजी, टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 216 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

मागील महिन्यात 18 मे 2023 रोजी टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 200 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तेव्हापासुन या स्टॉकमध्ये 10 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. 28 मार्च 2023 रोजी, टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 184 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तिथून शेअरमध्ये सुमारे 20 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. 3 एप्रिल 2020 रोजी टाटा पॉवर कंपनीचे शेअर्स 30 रुपयेवर ट्रेड करत होते. इथून या शेअरची किंमत आतापर्यंत 7 पट अधिक वाढली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Power Share Price today on 13 June 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Tata Power Share Price(162)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या