26 April 2025 11:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | पीएसयू डिफेन्स कंपनी शेअरसाठी 338 रुपये टार्गेट प्राईस; पडझडीत संधी - NSE: BEL Bank Account Alert | सेव्हिंग बँक खात्यात तुम्ही किती पैसे जमा करू शकता? नसेल माहित तर इन्कम टॅक्स नोटीस येईल PPF Investment | 90% लोकांना माहित नाही, मॅच्युरिटीनंतरही दर वर्षी 700000 रुपये व्याज मिळतं, पैसे बचतीचीही गरज नसते EPF for Home Loan | पगारदारांनो, गृहकर्ज डोईजड झालंय? EPF च्या माध्यमातून कर्जमुक्त होऊ शकता, अपडेट जाणून घ्या Horoscope Today | 26 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या BHEL Share Price | पीएसयू शेअर 4.21 टक्क्यांनी घसरला, बाजारातील पडझडीत तज्ज्ञांनी दिला असा सल्ला - NSE: BHEL Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 26 एप्रिल रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

Brightcom Group Share Price | स्वस्त झालेल्या ब्राइटकॉम ग्रुप शेअरमध्ये बंपर तेजी, गुंतवणूक गुणाकारात वाढते आहे, शेअरची खरेदी करावी?

Brightcom Group Share Price

Brightcom Group Share Price | ब्राइटकॉम ग्रुप कंपनीच्या शेअरची किंमत मागील दीड महिन्यात 9 रुपयेवरून वाढून 25 रुपयेवर पोहचली आहे. ब्राइटकॉम ग्रुप कंपनीच्या शेअर्सने या कालावधीत आपल्या गुंतवणूकदारांना 170 टक्के परतावा कमावून दिला आहे. ब्राइटकॉम ग्रुप कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 57.70 रुपये होती. तर कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 9.27 रुपये होती.

ब्राइटकॉम ग्रुप कंपनीच्या शेअर्सने मागील दीड महिन्यात आपल्या शेअर धारकांना 1 लाख रुपयेवर 2.70 लाख रुपये नफा दिला आहे. 28 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 9.27 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 12 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 24.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मंगळवार दिनांक 13 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.84 टक्के वाढीसह 26.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

जर तुम्ही 28 एप्रिल 2023 रोजी ब्राइटकॉम ग्रुप कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 2.70 लाख रुपये झाले असते. अवघ्या 6 महिन्यांत हा कंपनीच्या शेअरची किंमत 2300 टक्के मजबूत झाली आहे.

ब्राइटकॉम ग्रुप कंपनीच्या शेअर्सने लोकांना मल्टीबॅगर कमाई करून दिली आहे. 4 जून 2021 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 17 डिसेंबर 2021 रोजी ब्राइटकॉम ग्रुप कंपनीचे शेअर्स 117.75 रुपये किमतीवर पोहोचले होते. या कालावधीत गुंतवणूकदारांनी 2327 टक्के नफा कमावला आहे.

ब्राइटकॉम ग्रुप कंपनीने मागील.2 वर्षात आपल्या शेअर धारकांना 2 वेळा मोफत बोनस शेअर्स देखील वाटप केले होते. कंपनीने ऑगस्ट 2021 मध्ये 1 : 4 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप केले होते. म्हणजेच कंपनीने प्रत्येक 4 शेअर्सवी 1 बोनस शेअर मोफत दिला होता. नंतर हा कंपनीने मार्च 2022 मध्ये 2 : 3 या प्रमाणात शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप केले होते. म्हणजेच ब्राइटकॉम ग्रुप कंपनीने प्रत्येक 3 शेअर्सवर 2 बोनस शेअर्स मोफत वाटप केले होते.

शंकर शर्मा यांनी ब्राइटकॉम ग्रुप कंपनीचे 2.5 कोटी शेअर्स होल्ड केले आहेत. ज्येष्ठ गुंतवणूकदार शंकर शर्मा यांनी ब्राइटकॉम ग्रुपचे 2.5 . कोटी शेअर्स म्हणजेच सुमारे 1.24 टक्के भाग भांडवल खरेदी केले होते. हा शेअरहोल्डिंग डेटा 31 मार्च 2023 रोजी संपलेल्या तिमाहीचा आहे. सध्याच्या शेअरच्या किमतीनुसार शंकर शर्मा यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 62.37 कोटी रुपये झाले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Brightcom Group Share Price today on 13 June 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Brightcom Group Share Price(35)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या