23 November 2024 12:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

मध्य प्रदेशात भाजपला मोठा धक्का! सिंधिया यांचे समर्थक बैजनाथ यादव शेकडो समर्थकांसह काँग्रेसमध्ये, भाजपवर भ्रष्टाचाराचा आरोप

Baijnath Singh Yadav

MP BJP Crisis | केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांचे निकटवर्तीय आणि दिग्गज नेते बैजनाथ यादव यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला. शिवपुरी येथील बैजनाथ यादव यांनी २०२० मध्ये सिंधिया यांच्यासोबत भाजपमध्ये प्रवेश केला होता. पण आता विधानसभा निवडणुकीपूर्वी ते पुन्हा काँग्रेसमध्ये परतले आहेत. बैजनाथ यादव यांच्यासह त्यांच्या शेकडो समर्थकांनीही काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्यासोबत आज ५०० गाड्यांचा ताफा होता.

मध्य प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी दिग्विजय सिंह यांच्यासह इतर काँग्रेस नेत्यांच्या उपस्थितीत बैजनाथ यादव आणि त्यांच्या समर्थकांना काँग्रेस पक्षात प्रवेश दिला . प्रदेश काँग्रेस अध्यक्ष कमलनाथ यांच्या नेतृत्वाने प्रभावित होऊन भाजप नेते बैजनाथ सिंह यादव यांनी आपल्या शेकडो सहकाऱ्यांसह काँग्रेस पक्षात प्रवेश केला असं म्हटलं आहे. यावेळी त्यांनी भाजपच्या भ्रष्ट कारभाराचा देखील उल्लेख केला.

मध्य प्रदेशात या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत. भाजप सत्ता टिकवण्याचा प्रयत्न करत आहे, तर सर्व्हे सांगत आहेत की काँग्रेस मोठ्या बहुमताने सत्तेत येणार आहे. यापूर्वी 2018 मध्ये राज्यात विधानसभा निवडणुका झाल्या होत्या. त्यावेळी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास आला होता. काँग्रेसनेही राज्यात सत्ता स्थापन केली.

मात्र 2020 मध्ये सिंधिया यांच्यासह अनेक आमदारांनी काँग्रेसविरोधात बंड पुकारले. त्यानंतर सिंधिया आणि काँग्रेसच्या बंडखोर आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या आमदारांच्या राजीनाम्यानंतर कमलनाथ सरकार कोसळले. राज्यात भाजपने सत्ता स्थापन केली. सिंधिया यांच्यासह त्यांचे सर्व जवळचे नेते आणि समर्थकांनीही भाजपमध्ये प्रवेश केला.

News Title : MP Assembly Election BJP Scindia supporter Baijnath Singh Yadav join congress check details on 14 June 2023.

हॅशटॅग्स

#Baijnath Singh Yadav(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x