Kore Digital Share Price | कोरे डिजिटल IPO शेअरने लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांना बक्कळ पैसा दिला, डिटेल्स जाणून घ्या
Kore Digital Share Price | कोरे डिजिटल कंपनीच्या शेअर्सनी बुधवारी NSE इमर्ज इंडेक्सवर धमाकेदार एन्ट्री केली आहे. कोरे डिजिटल कंपनीचे शेअर्स इश्यू किमतीच्या 11 टक्के अशिल प्रीमियम किमतीवर सूचीबद्ध झाले आहे. कोरे डिजिटल कंपनीच्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 180 रुपये निश्चित करण्यात आली होती. आणि कोरे डिजिटल कंपनीचे शेअर्स 201 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले होते.
कोरे डिजिटल कंपनीच्या IPO चा आकार 18 कोटी रुपये होता. आणि हा IPO 2 जून ते 7 जून 2023 या कालावधीत गुंतवणुकीसाठी खुला करण्यात आला होता. या IPO स्टॉकला एकूण 41.56 पट अधिक बोली प्राप्त झाली होती. तर या SME IPO ऑफरमध्ये 10 लाख शेअर्सच्या तुलनेत 3.94 कोटी शेअर्सची बोली प्राप्त झाली होती. आज गुरूवार दिनांक 15 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के घसरणीसह 181.40 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
IPO तपशील
कोरे डिजिटल कंपनीच्या IPO मध्ये शेअरची किंमत बँड 180 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आली होती. तर 10 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या 10 लाख फ्रेश इक्विटी शेअर्स जारी करण्यात आले होते. या कंपनीने आपल्या IPO मध्ये एका लॉट अंतर्गत 800 शेअर्स जारी केले होते.
या IPO इश्यूमधून जमा होणारा भांडवल कंपनी खेळत्या भांडवलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि धोरणात्मक अधिग्रहणांमधील गुंतवणूक आणि इतर नियमित कॉर्पोरेट कामावर खर्च करणार आहे. या IPO इश्यूसाठी बुक रनिंग लीड मॅनेजर म्हणून फर्स्ट ओव्हरसीज कॅर्पिटल आणि बिगशेअर सर्व्हिसेस यांना रजिस्ट्रार म्हणून नियुक्त करण्यात आले होते.
कंपनीबद्दल थोडक्यात
कोरे डिजिटल ही कंपनी मुख्यतः कॉर्पोरेट्स आणि टेलिकॉम नेटवर्क ऑपरेटर्सना उच्च दर्जाचे संप्रेषण उपाय ऑफर करणारे दूरसंचार पायाभूत सेवा आणि सुविधा प्रदान करण्याचे काम करते. या कंपनीच्या प्रॉस्पेक्टसनुसार, कंपनीने 2023 पर्यंत भारती एअरटेल, रिलायन्स जिओ, व्होडाफोन आयडिया, टाटा टेलिसर्व्हिसेस सारख्या दिग्गज भारतीय दूरसंचार कंपन्यांसाठी 450 किमी लांबीचे फायबर जाळे पसरवले आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Kore Digital Share Price today on 15 June 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार