22 November 2024 12:49 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON
x

Cressanda Solutions Share Price | क्रेसेंडा सोल्युशन्स स्टॉकने 3 वर्षात दिला 15000% परतावा, 1 लाखाचे झाले दीड कोटी, स्टॉक डिटेल्स

Cressanda Solutions Share Price

Cressanda Solutions Share Price | क्रेसेंडा सोल्युशन्स या आयटी क्षेत्रातील स्मॉलकॅप कंपनीने राइट इश्यू जारी करण्याची घोषणा केली आहे. ही कंपनी आपल्या शेअर धारकांना 6:97 या प्रमाणात राईट इश्यू जारी करेल. क्रेसेंडा सोल्युशन्स ही कंपनी मागील 3 वर्षात गुंतवणूकदारांना सर्वाधिक परतावा देणाऱ्या भारतीय कंपन्यापैकी एक मानली जाते. या कंपनीने राईट इश्यूसाठी प्रति शेअर 20 रुपये इश्यू किंमत निश्चित केली आहे. ही किंमत सध्याच्या बाजार भावापेक्षा 30 टक्क्यांनी कमी आहे. (Cressanda Solutions Share Price Target)

या कंपनीने राईट्स इश्यूसाठी 16 जून 2023 हा दिवसा रेकॉर्ड डेट म्हणून निश्चित केला आहे. क्रेसेंडा सोल्युशन्स कंपनीचा राईट इश्यू 27 जून 2023 ते 11 जुलै 2023 दरम्यान खुला केला जाईल. आज गुरूवार दिनांक 15 जून 2023 रोजी क्रेसेंडा सोल्युशन्स कंपनीचे शेअर्स 4.20 टक्के वाढीसह 30.52 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

राईट इश्यू तपशील
शेअर बाजारातील अनेक कंपन्या राइट्स इश्यूद्वारे आपल्या विद्यमान शेअर धारकांना सवलती शेअर्स खरेदी करण्याची संधी देते. जर शेअर होल्डर्स राइट इश्यूसाठी पात्र असतील तर त्यांच्या डिमॅट खात्यात हे शेअर्स जमा केले जातात. गुंतवणूकदार त्यांच्या राइट्स इशूसाठी अर्ज करून शेअर स्वस्तात खरेदी करू शकतात. क्रेसेंडा सोल्युशन्स कंपनीच्या शेअरने मागील 3 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर नफा कमावून दिला आहे.

बुधवार दिनांक 14 जून 2023 रोजी क्रेसेंडा सोल्युशन्स कंपनीचे शेअर्स 29.29 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 3 वर्षांपूर्वी म्हणजेच 12 जून 2020 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.19 पैसे किमतीवर ट्रेड करत होते. मागील 3 वर्षात क्रेसेंडा सोल्युशन्स कंपनीच्या स्टॉकची किंमत 15,000 टक्के पेक्षा अधिक वाढली आहे. जर तुम्ही 3 वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 15,000 टक्के वाढून 1.5 कोटी रुपये झाले असते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Cressanda Solutions Share Price today on 15 June 2023.

हॅशटॅग्स

#Cressanda Solutions Share Price(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x