13 December 2024 7:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक पुन्हा रॉकेट होणार, कंपनीने योजना आखली, स्टॉक BUY करावा का - NSE: IDEA Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर मालामाल करणार, मजबूत कमाई होणार, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH
x

PNC Infratech Share Price | 320 टक्के परतावा देणारा पीएनसी इन्फ्राटेक शेअर 5 दिवसांपासून तेजीत, फायदा घेणाऱ्यांकडून मोठी खरेदी

PNC Infratech Share Price

PNC Infratech Share Price | पीएनसी इन्फ्राटेक कंपनीचे शेअर्स आज शुक्रवार दिनांक 16 जून 2023 रोजी 336.55 रुपये या तीन महिन्यांच्या उच्चांक किमतीवर ट्रेड करत आहेत. गुरुवारी इंट्रा-डे ट्रेडमध्ये पीएनसी इन्फ्राटेक कंपनीचे शेअर्स 6 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते.

स्टॉक वाढीचे मुख्य कारण म्हणजे, पीएनसी इन्फ्राटेक कंपनीने KKR चे रोड हायवे इन्फ्रास्ट्रक्चर ट्रस्ट पोर्टफोलिओ घेण्याची बोलणी सुरू केली आहे. या प्रोजेक्टचे मूल्य 9,000 कोटी रुपये आहे. आज शुक्रवार दिनांक 16 जून 2023 रोजी पीएनसी इन्फ्राटेक कंपनीचे शेअर्स 3.99 टक्के वाढीसह 336.55 रुपये किंमतीवर ट्रेड करत आहे.

सविस्तर माहिती

पीएनसी इन्फ्राटेक या सिव्हिल कन्स्ट्रक्शन कंपनीचा स्टॉक फेब्रुवारी 2023 नंतर आता सर्वोच्च किंमत पातळीवर पोहचला आहे. तर 3 फेब्रुवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 354.55 रुपये या आपल्या 52 आठवड्यांचा उच्चांक किंमतीवर ट्रेड करत होते. या डील अंतर्गत पोर्टफोलिओमध्ये 11 हायब्रीड अॅन्युइटी मॉडेल रस्ते आणि एक बिल्ड-ऑपरेट- ट्रॉन्सफर रस्ते प्रकल्प सामील आहेत.

द इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या माहितीत म्हंटले आहे की, पीएनसी इन्फ्राटेक कंपनीने बोली लावलेले प्रकल्प उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थान राज्यात स्थित आहे. मीडिया रिपोर्ट नुसार पीएनसी पोर्टफोलिओसाठी चार कंपन्यांनी बोली लावली आहे. या पोर्टफोलिओचे एकूण मूल्य 9,000 कोटी रुपये आहे, तर त्यावर 6,900 कोटीचे कर्ज आहे.

शेअरची कामगिरी

पीएनसी इन्फ्राटेक कंपनीच्या शेअर्सने आतपर्यंत आपल्या गुंतवणूकदारांना 320.95 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील पाच वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 122.37 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या गुंतवणूकदारांनी 47.67 टक्के नफा कमावला आहे. तर YTD आधारे हा स्टॉक 8.69 टक्के वाढला आहे. मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरने लोकांना 17.39 टक्के परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | PNC Infratech Share Price today on 16 June 2023.

हॅशटॅग्स

PNC Infratech Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x