22 November 2024 5:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER
x

हिंदूंविरोधात ट्रॅप? उरणमध्ये मशिदीसाठी मागणी करणारा आमदार फडणवीस समर्थक, मशीद पाडण्याची धमकी देणाऱ्यांचं भाजप कनेक्शन, स्क्रिप्टेड प्लॅन

Highlights:

  • Maharashtra BJP Hindu Muslim Politics
  • आम्ही कोणत्याही थराला जाऊ
  • अपक्ष आमदार बालदी यांची मागणी
  • सिडकोने मशिदीसाठी मागणी करणाऱ्या आमदाराचं भाजप-फडणवीस कनेक्शन
  • माजी भाजप आमदाराने ‘लँड जिहाद’ म्हटले आणि सर्वच बाजूने भाजप कनेक्शन
  • सिडकोने भाष्य करण्यास नकार दिला
  • अपक्ष आमदार महेश बालदी, मुस्लिम मशिदीची मागणी आणि भाजप कनेक्शन इतिहास
BJP Hindu Muslim Politics

Maharashtra BJP Hindu Muslim Politics | मुंबई नजीकच्या उरण-उलवे परिसरातील मशिदीसाठी महाराष्ट्र शहर व औद्योगिक विकास महामंडळाने (सिडको) भूखंड देण्यास सकल हिंदू समाजाने विरोध केला आहे. ही मागणी मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा आणि मशीद पाडण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे. त्यांनी सिडको कार्यालयावर निदर्शने करून ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्या. परिसरातील दुकानांचे शटरही पाडण्यात आले.

एसएचएसचे सदस्य राजेंद्र पाटील म्हणाले, ‘उलवेमध्ये हिंदू बहुसंख्य आहेत. मुस्लीम क्वचितच आहेत. आम्ही येथे मशिदीला परवानगी देऊ शकत नाही. दर दोन तासांनी लाऊडस्पीकरवरून त्यांची अजान का ऐकावी? हिंदू जागे झाले आहेत आणि म्हणूनच मशिदीच्या षडयंत्राला विरोध करण्यासाठी आपण सर्व जण आज एकत्र आलो आहोत.

ते म्हणाले की, सिडकोचे षडयंत्र हे मुस्लिम समाजाच्या तुष्टीकरणाचे धोरण आहे. आम्ही ते होऊ देणार नाही. आमदार महेश बालदी यांना मुस्लिमांना खूश करायचे असेल तर ते उरणमध्ये मशीद बांधू शकतात. भूखंड वाटपाचे समर्थन करण्याच्या त्यांच्या कृतीचा आम्ही निषेध करतो.

आम्ही कोणत्याही थराला जाऊ

या भूखंडाच्या प्रस्तावाविरोधात आम्ही न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. मशीद बांधली जाऊ नये यासाठी आम्ही कोणत्याही थराला जाऊ. कायदाही आपण हातात घेऊ शकतो. सिडकोला कडक संदेश देण्यासाठी सध्या हा केवळ ट्रेलर आहे. जर हे वाटप रद्द केले नाही तर आम्ही मशीद पाडू.

अपक्ष आमदार बालदी यांची मागणी

सिडकोने मशिदीसाठी सेक्टर १९ मधील भूखंड स्थानिक प्रकल्पग्रस्त (पीएपी) ट्रस्टला भाडेतत्त्वावर दिला आहे. उरणचे अपक्ष आमदार महेश बालदी यांनी नुकतीच सिडकोसोबत झालेल्या बैठकीत मुस्लिमांसाठी भूखंड देण्याची मागणी केली होती. महेश बालदी यांनी मात्र याबाबत बोलण्यास नकार दिला. विशेष म्हणजे उरणचे अपक्ष आमदार महेश बालदी हे देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक असून त्यांनी २०१९ मध्ये भाजपमधून बंडखोरी करत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती. तसेच त्यांनी २०१९ मध्ये देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन जाहीर पाठिंबा देखील दिला होता.

सिडकोने मशिदीसाठी मागणी करणाऱ्या आमदाराचं भाजप-फडणवीस कनेक्शन

त्यामुळे एका बाजूला फडणवीस आणि भाजपशी कनेक्शन असलेल्या आमदाराने मुस्लिम धर्मियांच्या मशिदीसाठी भूखंड देण्याची सिडको’कडे मागणी करायची आणि दुसऱ्या बाजूला उरण मध्ये एका विशिष्ट हिंदू गटाने सिडको वर मोर्चा काढून थेट मशिदी पाडण्याची भाषा करायची असा निवडणुकीपूर्वी धार्मिक गेम भाजपनेच रचला आहे याची चर्चा सुरु झाली आहे. काही करून राज्यात आणि देशात हिंदू-मुस्लिम करून धार्मिक वातावरण पेटवायचं आणि जनता महागाई-बेरोजगारी अशा महत्वाच्या मुद्द्यांवर मोर्चे काढणार नाही याची काळजी घायची असे प्रकार वाढल्याचं पाहायला मिळतंय. कारण लोकसभा निवडणूक सुद्धा काही महिन्यावर आली आहे.

माजी भाजप आमदाराने ‘लँड जिहाद’ म्हटले आणि सर्वच बाजूने भाजप कनेक्शन

आंदोलनात सहभागी झालेले भाजप नेते नरेंद्र पाटील यांनी उलवे येथे मोठ्या प्रमाणात लँड जिहाद होत असल्याचा दावा केला. काही असामाजिक घटक त्या भागात आपला धर्म पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. या हिंदूबहुल भागात इतर कोणत्याही समाजासाठी जमीन देण्यात अर्थ नाही. जिथे तो समाज बहुसंख्य आहे तिथे जमीन देता येईल. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सिडकोने हे आंदोलन गांभीर्याने घेऊन आपला आदेश मागे घ्यावा.

सिडकोने भाष्य करण्यास नकार दिला

आंदोलकांच्या शिष्टमंडळाने सिडको अधिकाऱ्यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सादर केले. भूखंड प्रस्तावाला होत असलेल्या विरोधावर सिडकोने भाष्य करण्यास नकार दिला.

अपक्ष आमदार महेश बालदी, मुस्लिम मशिदीची मागणी आणि भाजप कनेक्शन इतिहास

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत उरण विधानसभा मतदारसंघाची निवडणूक अपेक्षेप्रमाणे चुरशीची ठरली होती. भाजपचे बंडखोर उमेदवार महेश बालदी यांनी तत्कालीन आमदार मनोहर भोईर आणि शेकापचे नेते विवेक पाटील या दोन दिग्गज नेत्यांशी दोन हात करत विजयश्री खेचून आणला होता. महेश बालदी यांना ७४,५४९ तर मनोहर भोईर यांना दुसऱ्या क्रमांकाची ६८,८३९ तर विवेके पाटील यांना ६१,६०१ मते पडली होती.

जेव्हा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले तेव्हा उरण चे माजी नगराध्यक्ष राहिलेले महेश बालदि यांनी युतीत बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या ठिकाणी मग शिवसेनेनेही शहला काटशह देत पनवेल विधानसभा मतदारसंघातून माजी जिल्हाप्रमुख बबन पाटील यांना उमेदवारी अर्ज भरायला लावला होता. ही व्यूहरचना कामी येईल आणि उरण मधून महेश बालदी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतील असे शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांना वाटले पण तसे काही झाले नाही. या उलट बालदी यांनीही आपला अर्ज कायम ठेवला पण पनवेल मधून उमेदवारी अर्ज भरलेल्या बबन पाटील यांनी अनाकलनीयरीत्या आपला अर्ज शेवटच्या दिवशी मागे घेतला होता. ज्यामुळे पनवेल आणि उरण मधील सेनेच्या पदाधिकारी आणि शिवसैनिकांत खळबळ उडाली होती.

उरण मधील सेनेची जागा महेश बालदी यांनी काबीज केली तर पनवेल मध्ये प्रशांत ठाकूर यांना विक्रमी १,७६,१०९ मतं मिळाली. पनवेल येथील शिवसैनिकांनी परिपूर्ण पणे भाजपचा प्रचार केला तर याविरोधी चित्र उरण मध्ये पहावयाला मिळाले. येथे तालुका भाजपच्या एखाद दुसरा अपवाद वगळता संपूर्ण फळीने बालदी यांच्यासाठी प्रचार केला होता. त्यावेळी मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांनीही उरण येथील शिवसेनेच्या प्रचारात भाजपचे पदाधिकारी भाग घेत नसल्याची तक्रार वरिष्ठांकडे केली होती. महेश बालदी यांचे भाजपच्या केंद्रीय नेत्यांशी उत्तम संबंध असल्यामुळे या साऱ्यांकडे वरिष्ठ नेत्यांनी दुर्लक्ष केल्याचे दिसले होते. त्यामुळे आता मुस्लिम धर्माच्या मशिदीसाठी भाजपच सिडकोसोबत लढतंय हे यातून अप्रत्यक्षरीत्या दिसतंय आणि आता भाजप नेतेच हिंदू संघटनांना घेऊन लोकसभा-विधानसभा निवडणुकीपूर्वी हिंदू-मुस्लिम करत लढवतंय हे ‘महागाई-बेरोजगारीच्या’ गंभीर मुद्द्यात होरपळलेल्या हिंदू मोर्चेकऱ्यांनी सांगणार तरी कोण हाच कळीचा मुद्दा आहे.

News Title : BJP Hindu Muslim Politics Before Loksabha Vidhansabha Election check details on 18 June 2023.

हॅशटॅग्स

#BJP Hindu Muslim Politics(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x