22 November 2024 2:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News Tata Motors Share Price | टाटा मोटर्स सहित या 5 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, 15 दिवसात मालामाल करणार - NSE: TATAMOTORS Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य
x

2 महिन्यांपासून मणिपूर मध्ये दंगली, महागाई-बेरोजगारी शिगेला, हंगर-इंडेक्स विकोपाला, तरी पंतप्रधान मोदी अमेरिकेत 'भारत की विकास गाथा' सांगणार

PM Narendra Modi

PM Narenra Modi on US Visit | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी २१ ते २४ जून दरम्यान अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. ते २२ जून रोजी मोदींना स्टेट डिनरसाठी आमंत्रित करतील. या दौऱ्यात २२ जून रोजी काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करण्याचाही समावेश आहे. 23 जून रोजी मोदी वॉशिंग्टन डीसीमध्ये डायस्पोरा नेत्यांच्या निमंत्रण बैठकीला संबोधित करतील. दोन तास चालणाऱ्या या मेगा शोमध्ये मोदींचा संवाद ‘भारत की विकास गाथा’ त्यांच्या केंद्रस्थानी असणार आहे.

लोकसभा निवडणुका जवळ आल्याने भाजपने अमेरिकेत सर्व यंत्रणा, पीआर कंपन्या आणि इव्हेन्ट मॅनेजमेंट कंपन्या कामाला लावल्याचं वृत्त आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्याकडे देशापेक्षा भाजपचं अधिक लक्ष आहे, कारण भारतातही मोदींची मन की बात केवळ भाजपचे आमदार-खासदाराच ऐकतात.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी चार दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर जात आहेत. यावेळी पंतप्रधान मोदींच्या स्वागतार्थ व्हाईट हाऊसमध्ये 21 तोफांची सलामी दिली जाणार आहे. यात २१ जून रोजी संयुक्त राष्ट्र मुख्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिनाचा कार्यक्रम, २२ जून रोजी काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करणे, दोन तासांच्या मेगा शोमध्ये भारताच्या विकासाची कहाणी सांगणे यांचा समावेश आहे.

हा मेगा शो दोन तासांचा असेल
23 जून रोजी स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी 7 ते रात्री 9 या वेळेत पंतप्रधान मोदींचे भारतीयांना संबोधित करण्यात येणार आहे. यावेळी आंतरराष्ट्रीय गायिका मेरी मिलबेन पंतप्रधान मोदी आणि इतर पाहुण्यांसाठी परफॉर्म करणार आहेत. मॅनेजमेंट जाणारी तीच लोकं आहेत ज्यांनी यापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यक्रमाचे मॅनेजमेंट केले होते. तसेच भारतातील मोदींचा आणि भाजपचा प्रचार करणाऱ्या काही निवडक टीव्ही वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींना देखील सोबत घेऊन जाणार आहेत या वृत्त आहे.

अमेरिकेतील सत्कार समारंभाचे आयोजक डॉ. भरत बरई
अमेरिकेतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सत्कार समारंभाचे आयोजक डॉ. भरत बरई म्हणाले की, पंतप्रधान हे केवळ भारतातीलच नव्हे तर जगातील सर्वात लोकप्रिय सार्वजनिक व्यक्तिमत्व आहेत. पंतप्रधान मोदी वॉशिंग्टन डीसीमध्ये भारतीय समुदायाला संबोधित करतील. वृत्तसंस्था पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, हा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात पार पडणे अपेक्षित होते, परंतु व्यस्त वेळापत्रकामुळे ते होऊ शकले नाही. या कार्यक्रमाला सुमारे एक हजार लोक उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

बायडन यांच्याशी अनेक करारांवर स्वाक्षऱ्या
पंतप्रधान मोदी २२ जून रोजी वॉशिंग्टनला जाणार आहेत. व्हाईट हाऊसमध्ये त्यांचे औपचारिक स्वागत करण्यात येणार आहे. यावेळी सात हजारांहून अधिक लोक उपस्थित राहू शकतात, असे सांगितले जात आहे. यानंतर मोदी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांशी उच्चस्तरीय चर्चा करतील. द्विपक्षीय बैठकांमध्ये संरक्षण आणि तंत्रज्ञान आणि काही महत्त्वाच्या करारांवर चर्चा होण्याची शक्यता आहे.

News Title : PM Narendra Modi visit in US check details on 19 June 2023.

हॅशटॅग्स

#PM Narendra Modi(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x