17 November 2024 10:07 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | नवीन IPO आला रे, एकाच दिवसात पैसे दुप्पट होणार, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की Hold करावा - NSE: YESBANK Penny Stocks | 1 रुपयाचा शेअर श्रीमंत करणार, रोज अप्पर सर्किट हिट, 1 वर्षात 516% परतावा दिला - Penny Stocks 2024 HAL Share Price | डिफेन्स कंपनी HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, जेफरीज ब्रोकरेज फर्मचा खरेदीचा सल्ला - NSE:HAL Money Formula 12x30x12 | हा एक फॉर्मुला बनवेल करोडपती, योजनेत गुंतवा केवळ 1000 रुपये, कमवा पैसाच पैसा - Marathi News Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रेटिंग अपग्रेड, शेअर 'ओव्हरसोल्ड' झोनमध्ये, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | पेनी शेअर पुन्हा तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: IDEA
x

Samvardhana Motherson Share Price | सुपर मल्टिबॅगर शेअर संवर्धन मदरसन इंटरनॅशनल बाबत मोठी बातमी, गुंतवणुकदारांना फायदा होणार?

Samvardhana Motherson Share Price

Samvardhana Motherson Share Price | संवर्धन मदरसन इंटरनॅशनल कंपनी सध्या चर्चेचा विषय बनली आहे. कारण कंपनीने मोठा व्यापारी करार केला आहे. संवर्धन मदरसन इंटरनॅशनल कंपनी विन्सी एनर्जी कंपनीकडून फ्रान्सस्थित सर्मा एंटरप्राइझ कंपनीमधील 100 टक्के भाग भांडवल खरेदी करणार आहे. ही डील 7.2 दशलक्ष युरो मध्ये होणार आहे.

या कराराचा पूर्तता संवर्धन मदरसन इंटरनॅशनलची उपकंपनी संवर्धन मदरसन ऑटोमोटिव्ह सिस्टीम ग्रुप बीव्हीद्वारे पूर्ण केला जाणार आहे. आज सोमवार दिनांक 19 जून 2023 रोजी संवर्धन मदरसन इंटरनॅशनल कंपनीचे शेअर्स 1.15 टक्के घसरणीसह 81.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

संवर्धन मदरसन इंटरनॅशनल ही कंपनी पूर्वी मदरसन सुमी सिस्टम्स या नावाने ओळखली जात होती. सर्मा एंटरप्राइझ कंपनीचा हा करार सहा पुढील महिन्यांत पूर्ण होण्याची शक्यता आहे. ज्या कंपनीची डील होणार आहे, ती सर्मा एंटरप्राइझ कंपनी मुख्यतः एरोस्पेस, शिपबिल्डिंग, अलाईड इंडस्ट्रीज इत्यादीं क्षेत्रात इलेक्ट्रिकल वायरिंग आणि इंटरनेट सिस्टम्स निर्मितीचे आणि विक्रीचे काम करते. 2022 च्या अखेरीस सर्मा कंपनीची उलाढाल 11.41 दशलक्ष युरो इतकी होती.

संवर्धन मदरसन इंटरनॅशनल कंपनीचे शेअर्स 1999 मध्ये 80 पैशांवर ट्रेड करत होते. तर आता या कंपनीचे शेअर्स 81.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील 24 वर्षांत संवर्धन मदरसन इंटरनॅशनल स्टॉकने 80 पैसे वरून 80 रुपयेच पल्ला गाठला आहे.

तज्ज्ञांच्या मते या कंपनीच्या शेअरची किंमत 100 रुपयेवर जाण्याची शक्यता आहे. ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांनी संवर्धन मदरसन इंटरनॅशनल कंपनीच्या स्टॉकवर बाय रेटिंग देऊन स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Samvardhana Motherson Share Price today on 19 June 2023

हॅशटॅग्स

Samvardhana Motherson Share Price(19)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x