19 April 2025 9:55 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY IRFC Share Price | 129 रुपयाच्या शेअरसाठी 165 रुपये टार्गेट प्राईस, महत्वाची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC Reliance Share Price | कोटक सिक्युरिटीज बुलिश, जाहीर केली टार्गेट प्राईस, गुंतवणूकदारांसाठी अपडेट - NSE: RELIANCE
x

India: The Modi Question | धक्का! पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी अमेरिकेत गुजरात दंगली संबधित BBC डॉक्युमेंटरी दाखवली जाणार

India The Modi Question

India: The Modi Question | पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी बीबीसीचा नरेंद्र मोदींवर बनवलेला वादग्रस्त डॉक्युमेंटरी ‘इंडिया : द मोदी क्वेश्चन’ अमेरिकेत दाखविण्यात येणार आहे. या माहितीपटावर भारतात बंदी घालण्यात आली आहे, याची आठवण करून देण्यासाठी मोदींच्या दौऱ्यापूर्वी हा माहितीपट दाखविण्यात येत असल्याची घोषणा आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटना ह्यूमन राइट्स वॉचने सोमवारी केली.

ह्युमन राइट्स वॉच आणि अॅम्नेस्टी इंटरनॅशनलने पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी २० जून रोजी या माहितीपटाचे प्रदर्शन आयोजित केले आहे. माहितीपटाच्या प्रदर्शनासाठी खासदार, पत्रकार, विश्लेषकांना निमंत्रित करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमेरिका दौरा 21 जूनपासून सुरू होत असून तो 24 जूनपर्यंत चालणार आहे.

मोदी सरकारने या माहितीपटावर बंदी घातली होती

बीबीसीची माहितीपट जानेवारी महिन्यात दोन भागांत प्रदर्शित झाला होता. २००२ च्या गुजरात दंगलीवर आधारित या माहितीपटात गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी दंगली रोखण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली नसल्याचा दावा करण्यात आला आहे. भारत सरकारने या माहितीपटावर बंदी घातली होती, कारण त्यात गोष्टी योग्य पद्धतीने दाखवल्या जात नाहीत. हा केवळ प्रोपगंडा असल्याचे भारत सरकारचे म्हणणे आहे.

अमेरिका भारताच्या मानवी हक्कांच्या मुद्द्यांचा बचाव करत आहे

गेल्या महिन्यात व्हाईट हाऊसमध्ये भारतातील मानवी हक्कांशी संबंधित चिंतांवर प्रश्न उपस्थित करण्यात आले होते, तेव्हा अमेरिकेने बचाव करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता असं पाहायला मिळालं आहे. व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरिन जीन-पियरे यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितले होते की, राष्ट्राध्यक्ष बायडेन यांना वाटते की भारत-अमेरिका संबंध खूप महत्वाचे आहेत.

अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याच्या अहवालात भारतावर निशाणा

गेल्या महिन्यात अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याने धार्मिक स्वातंत्र्याचा वार्षिक अहवाल प्रसिद्ध केला होता, ज्यात भारतातील धार्मिक हिंसाचाराला लक्ष्य करण्यात आले होते. या अहवालात अल्पसंख्याकांवरील हिंसाचाराच्या २० हून अधिक घटनांचा उल्लेख करण्यात आला होता. १५ मे रोजी प्रसिद्ध झालेल्या अहवालाबाबत अमेरिकेच्या एका अधिकाऱ्याने म्हटले होते की, भारताने सातत्याने सुरू असलेल्या धार्मिक हिंसाचाराचा निषेध करावा, अशी अमेरिकेची इच्छा आहे.

भारताने अमेरिकेचा हा अहवाल फेटाळून लावत हा अहवाल पक्षपाती आणि प्रेरित असल्याचे म्हटले होते. मात्र, मानवाधिकार आणि अल्पसंख्याकांच्या मुद्द्यावर अमेरिकेला भारतावर निशाणा साधायचा नाही. भारतातील मानवी हक्क आणि लोकशाही मूल्यांबाबत अमेरिकन सरकारने मौन बाळगण्याचा निर्णय घेतल्याचा दावा अमेरिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या एका अहवालात केला होता. या अहवालात अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी म्हटले होते की, चीनसोबतच्या स्पर्धेत भारताला सोबत ठेवण्यासाठी अमेरिकेने हा निर्णय घेतला आहे.

पंतप्रधानांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात बीबीसीडॉक्युमेंट्रीही दाखविण्यात आली होती

मे महिन्यात पंतप्रधान मोदी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना ऑस्ट्रेलियन संसदेत बीबीसीची डॉक्युमेंट्री दाखवण्यात आली होती. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भारतातील मानवी हक्कांचे उल्लंघन आणि प्रसारमाध्यमांच्या स्वातंत्र्यावर गदा आणण्याच्या आरोपांवर चर्चा करावी, अशी मागणी संसदेत करण्यात आली.

News Title : India The Modi Question BBC Documentary in America before PM Narendra Modi US Tour check details on 19 June 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#India The Modi Question(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या