13 December 2024 2:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Jio Recharge | जिओचा न्यू इयर गिफ्ट प्लॅन; कमी पैशांत मिळणार जास्त व्हॅलिडीटी, होईल मोठी बचत Vivo X200 5G | बहुचर्चित Vivo X200 5G भारतात लॉन्च; स्मार्टफोनची किंमत, फीचर्स सह स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या Business Idea | महिलांनो इकडे लक्ष द्या, गृहिणी महिला घरच्या घरी लघुउद्योग सुरू करून महिना कमवू शकतील 1 लाख रुपयांची रक्कम L&T Share Price | लार्सन अँड टुब्रो शेअर मजबूत परतावा देणार, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला, टार्गेट नोट करा - NSE: LT RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअरमध्ये तेजीचे संकेत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL Rental Home | तुम्ही सुद्धा भाड्याने घर शोधत आहात का, मग काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा, नाहीतर अडचणीत सापडाल CIBIL Score | 'या' व्यक्तींनी चुकूनही करू नये क्रेडिट कार्डचा वापर; सिबिल स्कोर खराब होईलच सोबतच कर्जाचा डोंगर वाढेल
x

पहिला नव्हे, मोदींचा हा 6 वा अमेरिका दौरा! लोकसभा निवडणुकीपूर्वी RSS आणि विश्व हिंदू परिषद नेत्यांची अमेरिकेत स्क्रिप्टेड मार्केटिंग पकडली गेली

PM Narendra Modi

PM Modi on US Visit | पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत. त्यांची ही भेट अत्यंत खास असणार आहे. ते दुसऱ्यांदा अमेरिकन काँग्रेसच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करतील आणि भारतीय अमेरिकन समुदायाच्या एका कार्यक्रमालाही उपस्थित राहतील.

अमेरिका सुद्धा बिकट आर्थिक स्थतीचा सामना करत असल्याने त्यांना सुद्धा पैसा महत्वाचा आणि त्यामुळे त्यांनी मोदींपेक्षा संरक्षण सौद्यांना महत्व देण्यासाठी पंतप्रधान मोदींच्या स्वागताची तयारी केली आहे. या दौऱ्यात अरबो रुपयाच्या संरक्षण सौद्यांसह इतर करारही केले जाणार आहेत. गौतम अदानी यांचा समूह संरक्षण क्षेत्रात उतरल्यानंतर मोदी सरकारच्या संरक्षण क्षेत्रासंबंधित करारांनी देखील वेग पकडला आहे. या सौद्यात अदाणी समूहाचं नाव सध्या नसलं तरी मागील फ्रान्ससोबतच्या राफेल सौद्यात अनिल अंबानींच्या कंपनीचं नाव पुढे आलं होतं. त्यामुळे पुढे काय होणार यावर विरोधकांचं लक्ष राहणार आहे.

विशेष म्हणजे काही महिन्यापूर्वी गुजरात निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारने शिंदें मार्फत महाविकास आघाडी सरकार पडून फॉक्सकॉन-वेदांता सेमीकंडक्टर्स प्रकल्प गुजरातला पळवला होता. आता अमेरिकेतही एक महत्त्वाचा सौदा सेमीकंडक्टर्सबद्दल असू शकतो. भारत-अमेरिका तंत्रज्ञान भागीदारी अंतर्गत एक करार केला जाणार आहे. या अंतर्गत भारत आणि अमेरिका यांच्यात सेमीकंडक्टर्ससाठी पुरवठा साखळी स्थापन करण्यात येणार आहे.

गेल्या आठवड्यात अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवन भारत दौऱ्यावर आले होते. यावेळी ते म्हणाले होते की, सेमीकंडक्टरच्या बाबतीत चांगला करार होईल, अशी आम्हाला खूप आशा आहे. तेव्हापासून अपेक्षा वाढल्या आहेत. भारत अमेरिकेकडून मोठ्या प्रमाणात एमक्यू-9 बी ड्रोन खरेदी करणार आहे. या ड्रोनची खासियत म्हणजे ते 40 तासांपेक्षा जास्त काळ उड्डाण करू शकतात. मोठ्या प्रमाणात स्फोटके घेऊन ते शत्रूच्या तळांवर हल्ले करू शकतात. इतकंच नाही तर पाकिस्तान आणि चीनसारख्या देशांच्या सीमेवरील पाळत ठेवण्याची यंत्रणाही त्यांच्या माध्यमातून बळकट केली जाऊ शकते.

अमेरिकेत स्क्रिप्टेड मार्केटिंगसाठी RSS आणि VHP पदाधिकारी सज्ज
दरम्यान, हा मोदींचा पहिला नव्हे तर तब्बल सहावा अमेरिकन दौरा आहे. मात्र भारतात लोकसभा निवडणूक होणार असल्याने भाजप, RSS आणि VHP पदाधिकारी अमेरिकेत तळ ठोकून असून, त्यांच्यावर मार्केटिंगची आणि मोदींचा जयजयकार करणाऱ्या इव्हेन्ट कंपन्या हाताळण्याची जवाबदारी देण्यात आली आहे. तसेच भारतातील सर्व राज्यातील भाजप नेत्यांना त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर या दौऱ्याची पब्लिसिटी करण्याचे आदेश देण्यात आल्याचे वृत्त आहे. दरम्यान, अमेरिकेतील मीडियाने सुद्धा RSS आणि VHP कार्यकर्त्यांची पोलखोल करण्यास सुरवात केली आहे.

विश्व हिंदू परिषदेचे अमेरिकेतील सरचिटणीस अमिताभ मित्तल मोदींचे अमेरिकेतील चाहते असल्याचे व्हिडिओ ANI आणि PTI ला पुरवून भारतीय माध्यमांकडे जयजयकाराचे कन्टेन्ट पुरवत आहेत. अमेरिकेतील पत्रकाराने याची पोलखोल केली आहे. यामध्ये ते सांगत आहेत कि’ “ते (पंतप्रधान मोदी) कृतीशील व्यक्ती आहेत. त्यांनी भारताचा कायापालट केला आहे. त्यांच्यासारखा कोणी तरी पदभार स्वीकारेल याची भारत वाट पाहत होता,’ असे VHP नेते अमिताभ मित्तल अमेरिकेत सांगत आहेत. अमेरिकेत लाखो भारतीय राहत असताना केवळ आपल्याच २०-२५ जणांच्या समुदायाचे जयजयकाराचे व्हिडिओ शेअर करण्याचा सपाटा लावण्यात आला आहे.

News Title : PM Narendra Modi on US visit check details on 20 June 2023.

हॅशटॅग्स

#PM Narendra Modi(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x