19 November 2024 1:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPF Pension Money | नोकरदारांनो, तुमच्या 60 ते 70 हजाराच्या पगारावर किती EPF पेन्शन मिळणार, संपूर्ण माहितीचा आढावा घ्या Salary Account | पगारदारांनो, केवळ झिरो बॅलन्स नाही तर, सॅलरी अकाउंटवर मिळतात या 5 सुविधा, जाणून आश्चर्यचकित व्हाल SBI Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 5 म्युच्युअल फंड योजना, 10 हजारांचे होतील करोडो रुपये, इथे पैशाने पैसा वाढवा - Marathi News Trident Share Price | 35 रुपयाच्या शेअरची कमाल, दिला 2300 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, फायदा घ्या - NSE: TECHLABS Yes Bank Share Price | येस बँकबाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सकारात्मक परिणाम होणार - NSE: RVNL IRFC Share Price | IRFC शेअर फोकसमध्ये, मल्टिबॅगर शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC
x

Leading Leasing Share Price | लीडिंग लीजिंग फायनान्स शेअरच्या गुंतवणूकदारांना फ्री बोनस शेअर्स मिळणार, रेकॉर्ड डेट पाहून फायदा घेणार?

Highlights:

  • Leading Leasing Finance Share Price
  • शेअरची कामगिरी
  • कंपनीबद्दल थोडक्यात
  • शेअरची 52 आठवड्यांची पातळी
Leading Leasing Share Price

Leading Leasing Share Price | लीडिंग लीजिंग फायनान्स अँड इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या संचालक मंडळाने आपल्या विद्यमान पात्र शेअर धारकांना कंपनीच्या मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. लीडिंग लीजिंग फायनान्स अँड इन्व्हेस्टमेंट कंपनी आपल्या शेअर धारकांना 1 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. या NBFC कंपनीचे एकूण बाजार भांडवल 28.97 कोटी रुपये आहे. आज मंगळवार दिनांक 20 जून 2023 रोजी लीडिंग लीजिंग फायनान्स अँड इन्व्हेस्टमेंट कंपनीचे शेअर्स 5.00 टक्के वाढीसह 6.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

शेअरची कामगिरी

लीडिंग लीजिंग फायनान्स अँड इन्व्हेस्टमेंट कंपनीने आर्थिक वर्ष FY23 च्या चौथ्या तिमाहीत 0.87 कोटी रुपये निव्वळ विक्री केली होती. आणि 0.10 रुपयेच्या EPS सह कंपनीने 0.55 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. आर्थिक वर्ष 2022 च्या तुलनेत FY2023 मध्ये कंपनीच्या निव्वळ विक्रीत 151.75 टक्क्यांची वाढ पह्याला मिळाली होती, आणि कंपनीने 3.60 कोटी रुपयेची सेल्स नोंदवली होती. कंपनीच्या निव्वळ नफा 282.46 टक्क्यांच्या वाढीसह 2.18 कोटी रुपये नोंदवला गेला होता.

कंपनीबद्दल थोडक्यात

लीडिंग लीजिंग फायनान्स अँड इन्व्हेस्टमेंट ही कंपनी मुख्यतः वित्तपुरवठा आणि तारण कर्ज देण्याचे काम करते. ही कंपनी भारतातील औद्योगिक उपक्रमांना वित्तीय सेवा देण्याचे काम करते. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये लीडिंग लीजिंग फायनान्स अँड इन्व्हेस्टमेंट कंपनीचे शेअर्स 3.75 टक्क्यांच्या घसरणीसह 5.45 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

शेअरची 52 आठवड्यांची पातळी

या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत17.38 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 3.11 रुपये होती. या कंपनीच्या शेअरने मागील 5 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना 200 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या स्टॉकचा PE 13.30 पट असून सेक्टर PE 21 टक्के, आणि ROE 33.20 टक्के आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Leading Leasing Share Price today on 20 June 2023.

हॅशटॅग्स

Leading Leasing Finance Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x