23 November 2024 12:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

आगामी मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याही पराभवाची तयारी, दीपक जोशी मैदानात

Congress leader Deepak Joshi

Congress leader Deepak Joshi | मध्य प्रदेश भाजपाचे माजी मंत्री दीपक जोशी शनिवार रतलाम येथे दौऱ्यावर आले होते. महिनाभरापूर्वी भाजपसोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. रतलाम येथे ते एका खाजगी कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी स्थानिक प्रसार माध्यमांशी संवाद साधताना काँग्रेस नेते दीपक जोशी म्हणाले की, कमलनाथ यांचं काँग्रेस पक्षात वजन आणि शब्दाला मान आहे, त्या पक्षात त्यांचा स्वतःचा असा दृष्टिकोन सुद्धा आहे.

ते पुढे म्हणाले की, “राजकारणात नैतिकता असेल तर काँग्रेसमध्ये शिल्लक आहे आणि भाजपचा नैतिकतेशी कोणताही संबध नाही. त्यामुळे मध्य प्रदेशच्या जनतेला आता बदल हवा असून आगामी विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमताने काँग्रेसचे सरकार स्थापन होईल, असा विश्वास काँग्रेस नेते दीपक जोशी यांनी व्यक्त केला.

दोन दिवसांपूर्वी भाजप खासदार गुमान सिंह यांनी काँग्रेस हा रावण आहे, या विधानावर ते म्हणाले होते की, राजकारणात असे शब्द लोकांना मान्य नाहीत. असे शब्द वापरू नयेत. रावणाचा अहंकारही शेवटी संपला होता. माजी मुख्यमंत्री कैलास जोशी यांचे चिरंजीव आणि भाजप सरकारमध्ये मंत्री असलेले दीपक जोशी यांनी महिनाभरापूर्वी भाजपसोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.

जोशी शिवराजसिंह चौहान यांच्याविरोधात निवडणूक लढवण्याची शक्यता
काही दिवसांपूर्वी दीपक जोशी यांनी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यासमोर निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यासाठी त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांना पत्रही लिहिले होते. त्यांनी म्हटले आहे की, सीएम शिवराज सिंह चौहान यांच्या विरोधात मला टिकट द्यावं. माझ्या वडिलांचा अपमान झाला आहे, त्याचा बदला मला घ्यावा लागणार आहे. मान्यता मिळाल्यास मी आतापासूनच निवडणुकीची तयारी सुरू करेन.

वेदना अनेकवेळा जाणवल्या
मध्य प्रदेशातील विधानसभा निवडणुकीपूर्वी ते भाजपवर नाराज होते आणि त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी अनेकवेळा आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट ही शेअर केली आहे, ज्यात त्यांनी आपल्या पक्षाच्या आमदारांवर निशाणा साधला आहे आणि म्हटले आहे की, फसवणुकीचे आणि पापाचे परिणाम भोगावे लागतील.

News Title : Congress leader Deepak Joshi big statement before assembly election 2023 check details on 21 June 2023.

हॅशटॅग्स

#Congress leader Deepak Joshi(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x