23 November 2024 12:29 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Ugar Sugar Share Price | उगार शुगर वर्क्स शेअर्स झटपट पैसा वाढवत आहेत, अल्पावधीत गुंतवणूक 8 पट केली, फायदा घेणार?

Ugar Sugar Share Price

Ugar Sugar Share Price | उगार शुगर वर्क्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सनी मागील तीन वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना 800 टक्के परतावा कमावून दिला आहे. 27 मार्च 2020 रोजी उगार शुगर वर्क्स कंपनीचे शेअर्स 9.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर16 जून 2023 रोजी हा स्टॉक 126.90 रुपये या आपल्या सर्वकालीन उच्चांक किमतीवर पोहोचला होता. (Ugar Sugar Share Price Today)

या कालावधीत उगार शुगर वर्क्स कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 800 टक्के परतावा कमावून दिला आहे. 27 मार्च 2020 रोजी ज्या लोकांनी उगार शुगर वर्क्स कंपनीच्या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 8 लाखांपेक्षा जास्त झाले आहे. आज बुधवार दिनांक 21 जून 2023 रोजी उगार शुगर वर्क्स कंपनीचे शेअर्स 1.09 टक्के (Ugar Sugar Share Price NSE) वाढीसह 120.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Ugar Sugar Share Price BSe)

उगार शुगर वर्क्स कंपनी शिरगावकर ग्रुप ऑफ कंपनीजची प्रमुख संस्था म्हणून ओळखली जाते. उगार शुगर वर्क्स कंपनी व्हाईट क्रिस्टल शुगरच्या उत्पादनाचा व्यवसाय करते. मागील चार सेशनपासून उगार शुगर वर्क्स कंपनीचे शेअर्स लाल निशाणीवर ट्रेड करत आहेत. हीच गुंतवणूकीची संधी मानून गुंतवणुकदार यात पैसे लावू शकतात.

उगार शुगर वर्क्स कंपनीचे शेअर्स रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्सवर 64.6 अंकावर ट्रेड करत आहेत. यावरून समजते की स्टॉक ओव्हरबॉट किंवा ओव्हरसोल्ड झोनमध्ये नाही. उगार शुगर वर्क्स स्टॉकचा बीटा 1.1 आहे, जो एक वर्षातील उच्च अस्थिरतेचे निर्देशक आहे.

उगार शुगर वर्क्स कंपनीचे शेअर्स 5 दिवस, 20 दिवस, 50 दिवस, 100 दिवस, आणि 200 दिवसांच्या सरासरीवर ट्रेड करत आहेत. उगार शुगर वर्क्स कंपनीचे बाजार भांडवल 1323.56 कोटी रुपये आहे. 16 जून 2022 रोजी उगार शुगर वर्क्स कंपनीचे शेअर्स 126.90 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक पातळीवर ट्रेड करत होते. तर 21 जून 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 43.10 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते.

मार्च 2023 ला संपलेल्या तिमाहीत कंपनीच्या 42 प्रवर्तकांनी कंपनीचे 44.35 टक्के भाग भांडवल म्हणजेच 4.98 कोटी शेअर्स होल्ड केले होते. तर 53613 सार्वजनिक गुंतवणूकदारांनी कंपनीचे 55.65 टक्के भाग भांडवल म्हणजेच 6.26 कोटी शेअर्स होल्ड केले होते.

कंपनीच्या एकूण 52435 गुंतवणूकदारांकडे 2 लाख रुपयेपर्यंत वैयक्तिक भाग भांडवल आहेत. आणि मार्च 2023 तिमाहीच्या अखेरीस त्यांनी 4.59 कोटी शेअर्स होल्ड केले होते. 10 FPIs ने मार्च 2023 तिमाही शेवटी उगार शुगर वर्क्स कंपनीचे 4.87 लाख शेअर्स होल्ड केले होते. तर मार्च 2023 ला संपलेल्या तिमाहीत उगार शुगर वर्क्स कंपनीने 339.76 टक्के वाढीसह 65.26 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.

मागील आर्थिक वर्षात याच तिमाहीत कंपनीने 14.84 कोटी निव्वळ नफा कमावला होता. मार्च 2023 ला संपलेल्या तिमाहीत कंपनीची विक्री 67.45 टक्के वाढीसह 608.47 कोटीवर पोहचली होती. जी मागील आर्थिक वर्षाच्या मार्च 2022 तिमाहीत 363.38 कोटी रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Ugar Sugar Share Price today on 21 June 2023.

हॅशटॅग्स

#Ugar Sugar Works Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x