Rajratan Global Wire Share Price | मालामाल शेअर! राजरतन ग्लोबल वायर शेअरने 3 वर्षात 2000% परतावा दिला, शेअरची आता खरेदी करावा का?
Rajratan Global Wire Share Price | राजरतन ग्लोबल वायर लिमिटेड कंपनीच्या शेअरने मागील तीन वर्षांत आपल्या शेअर धारकांना बंपर नफा कमावून दिला आहे. 19 जून 2020 रोजी राजरतन ग्लोबल वायर कंपनीचे शेअर्स 44.2 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 20 जून 2023 रोजी हा स्टॉक 880.15 रुपये किमतीवर पोहचला होता. (Rajratan Global Wire Share Price Today)
तीन वर्षापूर्वी ज्या लोकांनी बीड वायर बनवणाऱ्या राजरतन ग्लोबल वायर कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 19.91 लाख रुपये झाले आहे. आज बुधवार दिनांक 21 जून 2023 रोजी राजरतन ग्लोबल वायर कंपनीचे शेअर्स 0.23 टक्के घसरणीसह 858.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
मागील काही दिवसांपासून राजरतन ग्लोबल वायर कंपनीच्या शेअरमध्ये प्रॉफिट बुकींग पाहायला मिळत आहे. मागील एका वर्षात राजरतन ग्लोबल वायर कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 48.06 टक्के परतावा कमावून दिला आहे. 2023 मध्ये या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 2.58 टक्के बुडवले आहेत. राजरतन ग्लोबल वायर कंपनीच्या शेअरने मागील एका महिन्यात लोकांना 14.10 टक्के नफा कमावून दिला आहे. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 4382.81 कोटी रुपये आहे.
8 सप्टेंबर 2022 रोजी राजरतन ग्लोबल वायर कंपनीने 1409.05 रुपये ही आपली 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. तर 20 जून 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 560 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांकी किंमत पातळीवर ट्रेड करत होते. राजरतन ग्लोबल वायर कंपनीच्या शेअरचा रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स 57.6 अंकावर आहे. या वरून असे कळते की, शेअर जास्त विकला गेला नाही किंवा जास्त खरेदी झाला नाही.
राजरतन ग्लोबल वायर स्टॉकचा बीटा 0.7 वर आहे, जो कमी अस्थितेचे निर्देशक आहे. राजरतन ग्लोबल वायर स्टॉक 5 दिवस, 20 दिवस, 50 दिवस आणि 100 दिवसांच्या मूव्हिंग सरासरीपेक्षा जास्त किमतीवर ट्रेड करत आहे. तर 200 दिवसांच्या मूव्हिंग सरासरीपेक्षा खाली ट्रेड करत आहे.
मार्च 2022 ला संपलेल्या तिमाही राजरतन ग्लोबल वायर कंपनीने 37.03 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला हकता. तर मार्च 2023 ला संपलेल्या तिमाहीत कंपनीच्या निव्वळ नफ्यात 45.26 टक्के घट नोंदवली गेली, आणि कंपनीने फक्त 20.27 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मार्च 2023 ला संपलेल्या तिमाहीत कंपनीच्या विक्रीमध्ये 11.37 टक्के घट झाली आहे.
कंपनीने मार्च तिमाहीत फक्त 219.43 कोटी रुपये मूल्याचे उत्पादन विकले आहे. QOQ आधारावर डिसेंबर 2022 तिमाहीत कंपनीने 7.86 टक्के घसरणीसह 22 कोटी रुपये नफा कमावला होता. तर डिसेंबर 2022 च्या तिमाहीत कंपनीची विक्री 9.74 टक्के वाढीसह 199.95 कोटी रुपये नोंदवली गेली होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Rajratan Global Wire Share Price today on 21 June 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News