28 April 2025 2:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा; मोटर्स शेअर्समध्ये तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: TATAMOTORS IRFC Share Price | मल्टिबॅगर पीएसयू स्टॉकबाबत फायद्याचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्स मालामाल करणार; या अपडेटनंतर तेजीचे संकेत - NSE: SUZLON IREDA Share Price | पीएसयू शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, या टार्गेट प्राईसवर एक्झिटचा सल्ला - NSE: IREDA Vedanta Share Price | मायनिंग कंपनी शेअर्समध्ये तेजीचे संकेत, अपसाईड टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: VEDL Ashok Leyland Share Price | मल्टिबॅगर अशोक लेलँड शेअर्स फोकसमध्ये, लेटेस्ट टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ASHOKLEY NTPC Green Energy Share Price | सरकारी कंपनीचा शेअर मालामाल करणार, मिळेल मजबूत परतावा - NSE: NTPCGREEN
x

Manipur Violence | 50 दिवसांपासून मणिपूर मध्ये हिंसाचार, अनेक चर्च आणि हजारो झोपड्या, फ्लॅट, बंगले जाळले, हजारो लोकं बेघर

Manipur Violence

Manipur Violence | सीमावर्ती मणिपूर राज्यात दीड महिन्याहून अधिक काळ सुरू असलेल्या जातीय हिंसाचाराच्या मुद्द्यावरून काँग्रेसने पुन्हा एकदा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. मणिपूर गेल्या ५० दिवसांपासून जळत आहे, पण पंतप्रधान नरेंद्र मोदी जाणीवपूर्वक त्याकडे लक्ष देत नाहीत, असा आरोप देशातील प्रमुख विरोधी पक्षाने केला आहे. या प्रकरणात पंतप्रधान मोदी आपल्या कर्तव्यात पूर्णपणे अपयशी ठरल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.

मणिपूरमध्ये पुन्हा गोळीबार
दरम्यान, मणिपूरच्या अनेक भागात अधूनमधून गोळीबार झाल्याची माहिती समोर आली आहे. राज्याच्या अधिकाऱ्यांनी बुधवारी ही माहिती दिली. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मणिपूर पूर्वेकडील थांगजिंग भागात स्वयंचलित शस्त्रांच्या किमान १५ ते २० राऊंड गोळीबाराचे आवाज ऐकू आले आहेत. कांगचुप परिसरातील गेलजंग आणि सिंगडा येथेही अधूनमधून गोळीबार सुरु आहे. राज्यात हजारो झोपड्या, इमारती आणि बंगले देखील जाळण्यात आले आहेत. तसेच अनेक चर्च सुद्धा जाळण्यात आले आहेत. अजूनही हे प्रकार थांबलेले नसताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर एक शब्द देखील न बोलल्याने टीकेचा जोर वाढला असून राज्यात सत्ताधारी भाजप नेत्यांविरोधात प्रचंड रोष वाढला आहे.

मणिपूरमधील हजारो मुलं मिझोराममध्ये दाखल
मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचारामुळे हजारो कुटुंबे मणिपूरमधून स्थलांतरित होत आहेत. सुमारे १२ हजार लोक मिझोराममध्ये पोहोचले आहेत. आकडेवारीनुसार, मंगळवारपर्यंत मणिपूरमधील 11,870 लोकांनी मिझोरामच्या 11 जिल्ह्यांमध्ये आश्रय घेतला आहे. या कुटुंबांसोबत आलेल्या १५०० हून अधिक मुलांनी मिझोरामच्या विविध शाळांमध्ये प्रवेश घेतला आहे.

मिझोरामचे शिक्षण संचालक लालसांगलियाना यांनी पीटीआयला सांगितले की विस्थापित मुलांना सरकारी शाळांमध्ये मोफत प्रवेश देण्यात आला आहे. मुलांची परिस्थिती लक्षात घेऊन आवश्यक कागदपत्रे नसतानाही त्यांना शाळांमध्ये प्रवेश घेण्याची मुभा देण्यात आली. दरम्यान, मिझोरामचे गृह आयुक्त आणि सचिव एच लालेंगमाविया यांनी सांगितले की, मिझोराम सरकारने मणिपूरमधून स्थलांतरित झालेल्या हजारो लोकांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारकडे 10 कोटी रुपयांची आर्थिक मदत मागितली आहे. पावसाळ्यामुळे विस्थापित झालेल्यांना राहण्यासाठी अनेक सरकारी इमारती रिकाम्या करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.

मणिपूरचे संकट कधी संपणार?
मणिपूर काँग्रेसचे प्रवक्ते एन. बी. मेतेई यांनी मणिपूरमधील सध्याचे संकट किती काळ टिकेल, असा प्रश्न उपस्थित केला. कित्येक महिने, अनेक वर्षे किंवा कित्येक दशके? मणिपूरच्या जनतेलाही पंतप्रधानांचे म्हणणे ऐकण्याचा अधिकार आहे. संविधानानुसार त्यांची जबाबदारी जनतेला उत्तर देण्याची आहे, ५० दिवस पंतप्रधान कसे काय गप्प शकतात असे प्रश्न उपस्थित होतं आहेत. मणिपूरचे लोक जवळपास दोन महिन्यांपासून इंटरनेटशिवाय जगत आहेत, यामुळे खूप नुकसान होत आहे. पंतप्रधान मोदी परदेश दौऱ्यावर गेल्यानंतर या नेत्यांनी पंतप्रधान कार्यालयाला (पीएमओ) निवेदन दिले आहे.

News Title : Manipur Violence 50 days check details on 21 June 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Manipur Violence(11)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या