19 April 2025 3:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | मालामाल करणार टाटा टेक शेअर्स, मिळेल 66 टक्के परतावा, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH ITI Share Price | आयटीआय शेअर फोकसमध्ये, यापूर्वी दिला 2309 टक्के परतावा, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: ITI Mazagon Dock Share Price | जबरदस्त शेअर, 3,122% परतावा दिला, या स्टॉकची पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MAZDOCK AWL Share Price | 50 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर मालामाल करणार - NSE: AWL HUDCO Share Price | तब्बल 852 टक्के परतावा देणारा सरकारी कंपनीचा शेअर, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HUDCO TTML Share Price | टाटा ग्रुपचा स्वस्त शेअर, यापूर्वी 2393% परतावा दिला, पेनी स्टॉक टार्गेट नोट करा - NSE: TTML JSW Steel Share Price | हा स्टील कंपनीचा स्वस्त शेअर खरेदी करा, BUY रेटिंग, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: JSWSTEEL
x

Blue Dart Share Price | मल्टिबॅगर ब्लू डार्ट एक्सप्रेस शेअर्स तेजीत, तज्ज्ञांचा शेअर्स खरेदीचा सल्ला, डिटेल्स जाणून घ्या

Blue Dart Share Price

Blue Dart Share Price | ब्लू डार्ट एक्सप्रेस कंपनीच्या शेअर्समध्ये मागील एका महिन्यापासून तेजी पाहायला मिळत आहे. या कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 8 टक्के वाढीसह 516 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल फायनान्शिअल सर्व्हिसेसने ब्लू डार्ट एक्सप्रेस कंपनीच्या स्टॉकवर ‘बाय’ रेटिंग देऊन स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. आज गुरूवार दिनांक 22 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.16 टक्के वाढीसह 7,238.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

4 ऑक्टोबर 2022 रोजी ब्लू डार्ट कंपनीचे शेअर्स 9,639.45 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तर 8 मे 2023 रोजी ब्लू डार्ट कंपनीचे शेअर्स 5,633 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते.

मोतीलाल ओसवाल फर्मचे तज्ञ ब्लू डार्ट स्टॉकवर सकारात्मक भावना व्यक्त करत आहे. कारण त्यांचा विश्वास आहे की एव्हिएशन टर्बाइन इंधनच्या किमतीत घट झाल्यामुळे, आणि विमानांच्या ताफ्यात वाढ आणि ई कॉमर्समधील बाजारपेठेतील वाटा वाढवण्यावर कंपनीने अधिक लक्ष केंद्रीत करायला सुरुवात केली आहे.

ब्रोकरेज फर्मने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, ब्लू डार्ट एक्सप्रेस सारख्या एक्सप्रेस लॉजिस्टिक्स एअरलाइनसाठी, एव्हिएशन टर्बाइन इंधनाची किंमत थेट ऑपरेटिंग खर्चाच्या 40 टक्के आहे. एटीएफच्या किमती आणि ब्रेंट क्रूडच्या किमती या जवळपास सारख्याच असतात. याशिवाय ब्रोकरेज फर्मने सांगितले की ब्लू डार्ट एक्सप्रेस कंपनीने टियर- II आणि टियर-III शहरांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी दोन नवीन विमाने आपल्या ताफ्यात सामील केले आहेत. कारण या शहरांमध्ये दीर्घ कालावधीमध्ये मागणी वाढण्याची शक्यता आहे.

एअर एक्सप्रेसची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी ब्लू डार्ट कंपनीने आर्थिक वर्ष 2023 मध्ये दोन नवीन बोईंग 737 विमाने आपल्या ताफ्यात सामील केले आहेत. मोतीलाल ओसवाल फर्मने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, कंपनीने 18 टन क्षमतेची दोन विमाने भारतातील टियर II आणि टियर III शहरांना सेवा प्रदान करतील.

मोतीलाल ओसवालचे तज्ञ म्हणाले की, ब्लू डार्ट कंपनी पुढील काळात मजबूत नेटवर्क एक्सप्रेस लॉजिस्टिक स्पेसमधील वाढीचा आणि उपलब्ध संधींचा फायदा घेण्यास सज्ज आहे. ब्लू डार्ट एक्सप्रेस कंपनी 2023-25 या काळात 12 टक्के CAGR कमाई नोंद करेल, असा विश्वास तज्ञांनी व्यक्त केला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Blue Dart Share Price today on 22 June 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Blue Dart Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या