22 November 2024 3:20 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही SBI Mutual Fund | SBI ची हेल्थकेअर म्युच्युअल फंड योजना देतेय घसघशीत परतावा; 2500 चे होतील 1 करोड रुपये - Marathi News
x

RVNL Share Price | RVNL शेअरमधील जबरदस्त तेजीचे कारण काय? परतावा पाहून गुंतवणुकदार ही हैराण, सविस्तर माहिती जाणून घ्या

RVNL Share Price

RVNL Share Price | आरव्हीएनएल म्हणजेच रेल विकास निगम कॉर्पोरेशन कंपनीच्या शेअरमध्ये कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जबरदस्त उसळी पाहायला मिळाली होती. आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी आरव्हीएनएल कंपनीचे शेअर्स 4 टक्के वाढीसह 128 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र, दुपारनंतर शेअर्समध्ये जबरदस्त प्रॉफिट बुकींग सुरू झाली, आणि शेअर किंचित खाली आला.

आरव्हीएनएल स्टॉकमध्ये ही तेजी येण्याचे कारण म्हणजे कंपनीला मोठ्या प्रमाणात ऑर्डर्स मिळाले आहेत. आज गुरूवार दिनांक 22 जून 2023 रोजी आरव्हीएनएल कंपनीचे शेअर्स 0.24 टक्के वाढीसह 124.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

आरव्हीएनएल कंपनीचे नवीन ऑर्डर

रेल विकास निगम लिमिटेड कंपनीने नुकताच चेन्नई मेट्रो रेल लिमिटेडकडून भूमिगत स्टेशन बांधणीची ऑर्डर मिळवली आहे. चेन्नई मेट्रोने आरव्हीएनएल कंपनीला KMC Sterling Road Jn, Nungambakkam, Anna Flyover, Thousand Lights 3f Thousand Lights, Crossover Box याठिकाणी पाच भूमिगत मेट्रो रेल्वे स्थानक बांधण्याचे कंत्राट दिले आहेत. याशिवाय आरव्हीएनएल कंपनीला सीएम आरएलच्या स्टेज -2 प्रकल्पा अंतर्गत मेट्रो स्टेशनच्या बांधकामाचे ऑर्डर देण्यात आले आहेत. या प्रकल्पाचे एकूण ऑर्डर मूल्य 1,730.6 कोटी रुपये आहे. तर हा प्रकल्प 1725 दिवसांत पूर्ण करणे अपेक्षित आहे.

दुसऱ्या प्रकल्पात 4 भूमिगत स्थानकांचे बांधकाम करायचे आहे, ज्याचे एकूण ऑर्डर मूल्य 1,462 कोटी रुपये आहे. तिसरी ऑर्डर अड्यार डेपो इंदिरा नगर आणि तारामणी थिरुवनमियुर येथील भूमिगत मेट्रो रेल स्टेशनचे बांधकाम करण्याशी संबंधित आहे. या ऑर्डरचे एकूण मूल्य 865.6 कोटी रुपये असून त्याचे काम 1,630 दिवसांच्या पूर्ण करणे अपेक्षित आहे.

शेअरची कामगिरी

आरव्हीएनएल स्टॉक मागील सहा महिन्यांपासून रॉकेटच्या गतीने उडत आहे. रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स मागील सहा महिन्यात 86.76 टक्के वाढले आहेत. 2023 मध्ये आरव्हीएनएल कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना अद्भूत कमाई करून दिली आहे. त्याच वेळी RVNL कंपनीच्या गुंतवणूकदारांनी मागील एका वर्षात 312.29 टक्के परतावा कमावला आहे. आरव्हीएनएल कंपनी आणि रशियन रोलिंग स्टॉक निर्माता TMH ग्रुप यांच्यात मतभेद निर्माण झाल्याच्या बातम्या येत होत्या. यावर आरव्हीएनएल कंपनीने स्पष्ट केले आहे की, ही बातमी खोटी आणि चुकीची आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | RVNL Share Price today on 22 June 2023.

हॅशटॅग्स

RVNL Share Price(143)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x