22 November 2024 12:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर रॉकेट होणार, स्टॉक पुन्हा मालामाल करणार, कमाईची मोठी संधी - NSE: SUZLON SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर तुफान तेजीत, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Horoscope Today | दैनंदिन कामे मार्गे लागतील, आजचा दिवस उत्साहाचा आणि आनंदाचा, पहा तुमचे आजचे राशिभविष्य IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिलीच दिवशी मोठा परतावा मिळेल - GMP IPO RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839
x

Aptech Share Price | ॲपटेक शेअरने एका वर्षात 135 टक्के परतावा दिला, आता फ्री बोनस शेअर्स देणार, रेकॉर्ड डेट पाहून फायदा घ्या

Aptech Share Price

Aptech Share Price | ॲपटेक या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअरने मागील सहा महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांना प्रचंड नफा कमावून दिला आहे. आता ही कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना 5 शेअर्सवर 2 बोनस शेअर्स मोफत देणार आहे. कंपनीने नुकताच आपल्या बोनस शेअरची रेकॉर्ड डेटही जाहीर केली आहे.

बोनस शेअर्स वाटपाची रेकॉर्ड तारीख

कंपनीने बोनस शेअर्स वाटपाची रेकॉर्ड तारीख म्हणून 14 जुलै 2023 हा दिवस निश्चित केला आहे. ॲपटेक कंपनीचे शेअर्स कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 1.49 टक्के वाढीसह 495.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज शुक्रवार दिनांक 23 जून 2023 रोजी ॲपटेक कंपनीचे शेअर्स 1.18 टक्के वाढीसह 503.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मार्च 2023 तिमाही निकाल

31 मार्च 2023 रोजी संपलेल्या तिमाहीत ॲपटेक कंपनीने 181.47 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. तर 31 मार्च 2022 रोजी संपलेल्या तिमाहीत कंपनीने 66.99 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. अवघ्या एका वर्षात कंपनीच्या महसुलात 170.88 टक्के वार्षिक वाढ नोंदवली गेली आहे.

Q4 FY23 मध्ये कंपनीने 33.35 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. तर Q4 FY22 मध्ये कंपनीने 25.54 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. म्हणजे कंपनीच्या निव्वळ नफ्यात वार्षिक 30.55 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. समीक्षाधीन तिमाहीत Aptech कंपनीचा EPS 8.05 टक्केवर होता, जो मागील वर्षीच्या याच तिमाही कालावधीत 6.21 वरून वाढून 29.63 टक्के नोंदवला गेला होता.

शेअरची कामगिरी

ॲपटेक लिमिटेड कंपनीच्या शेअरने मागील एका महिन्यात आपल्या गुंतवणुकदारांना 4.24 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर YTD आधारे या शेअरची किंमत 46.76 टक्के वाढली आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने लोकांना 135.55 टक्के परतावा कमावून दिला आहे.

गेल्या पाच वर्षांत या शेअरची किंमत 99.52 टक्के वाढली आहे. ॲपटेक कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 591.85 रुपये होती. तर नीचांक किंमत 206.85 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2,051.91 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Aptech Share Price today on 23 June 2023.

हॅशटॅग्स

Aptech Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x