23 November 2024 11:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA
x

BCL Industries Share Price | पैसाच पैसा! बीसीएल इंडस्ट्रीज शेअर्स गुंतवणुकदारांना दुहेरी फायदा, डिव्हीडंड आणि स्टॉक स्प्लिट लाभ मिळणार

BCL Industries Share Price

BCL Industries Share Price | कोविडनंतर अनेक कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत कमाई करून दिली होती. यात बीसीएल इंडस्ट्रीज कंपनीचे शेअर्स देखील सामील आहेत. या कालावधीत बीसीएल इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 1000 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. (BCL Industries Share)

आता ही कंपनी आपले शेअर्स विभाजित करण्याचा विचार करत आहे. यासोबत बीसीएल इंडस्ट्रीज कंपनीने आपल्या शेअर धारकांना लाभांश वाटप करण्याची घोषणा देखील केली आहे. शुक्रवार दिनांक 23 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.85 टक्के घसरणीसह 508.00 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

बीसीएल इंडस्ट्रीज कंपनीने आपले शेअर 10 तुकड्यामध्ये विभाजित करण्याची योजना आखली आहे. कंपनीने सेबीला दिलेल्या माहिती म्हंटले आहे की, बीसीएल इंडस्ट्रीज आपले 10 रुपये दर्शनी मूल्य असलेले शेअर 10 तुकड्या विभाजित करणार आहे. त्यानंतर कंपनीच्या शेअर्सचे दर्शनी मूल्य प्रति शेअर 1 रुपयेवर येईल.

याशिवाय बीसीएल इंडस्ट्रीज कंपनी आपल्या पात्र शेअर धारकांना 10 रुपये दर्शनी मूल्याच्या प्रत्येक शेअरवर 50 टक्के लाभांश वाटप करणार आहे. म्हणजेच कंपनी आपल्या पात्र गुंतवणूकदारांना प्रत्येक शेअरवर 5 रुपये लाभांश वाटप करणार आहे. कंपनीने अद्याप लाभांश वाटपाची रेकॉर्ड डेट जाहीर केलेली नाही. याची गुंतवणूकदारांनी नोंद घ्यावी.

एकेकाळी बीसीएल इंडस्ट्रीज या FMCG कंपनीचे शेअर्स 48 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आत हा स्टॉक 508 रुपये किमतीवर पोहचला आहे. मागील एका महिन्यात बीसीएल इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 15 टक्के परतावा कमावून दिला आहे.

ज्या गुंतवणूकदारांनी 2023 या वर्षाच्या सुरुवातीला हा स्टॉक खरेदी केला होता, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 60 टक्क्यांहून अधिक वाढले आहेत. मागील एका वर्षात बीसीएल इंडस्ट्रीज कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 75 टक्के नफा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | BCL Industries Share Price today on 24 June 2023.

हॅशटॅग्स

#BCL Industries Share Price(15)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x