23 November 2024 5:51 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Mutual Fund SIP | पैशाने पैसा जोडा, करोडपती बनवण्याचा राजमार्ग, 15 वर्षांत व्हाल श्रीमंत, फॉर्म्युला जाणून घ्या BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, असं मिळेल रेल्वेचं सर्वांत स्वस्त तिकीट, ठाऊक आहे हा फंडा
x

Granules India Share Price | ग्रॅन्युल्स इंडिया शेअरने 13251 टक्के परतावा दिला, तज्ज्ञांचा शेअर खरेदीचा सल्ला, टार्गेट प्राईस पहा

Granules India Share Price

Granules India Share Price | ग्रॅन्युल्स इंडिया या फार्मा क्षेत्रातील दिग्गज कंपनीचे शेअर्स शुक्रवारी लाल निशाणीवर क्लोज झाले होते. अवघ्या 75000 रुपयांच्या गुंतवणुकीवर लोकांना लखपती बनवणाऱ्या ग्रॅन्युल्स इंडिया स्टॉकबाबत यज्ञ उत्साही पाहायला मिळत आहेत. (Granules Share Price)

ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजने ग्रॅन्युल्स इंडिया स्टॉकमध्ये सध्याच्या किंमत पातळीपासून 25 टक्क्यांची वाढ होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. शुक्रवार दिनांक 23 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.17 टक्क्यांच्या घसरणीसह 287.05 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. (Granules India Share)

करोडपती स्टॉक

ग्रॅन्युल्स इंडिया कंपनीचे शेअर्स 20 डिसेंबर 2002 रोजी 2.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मात्र आता हा स्टॉक 287.05 रुपये किमतीवर पोहचला आहे. मागील 21 वर्षात ग्रॅन्युल्स इंडिया कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 13251 टक्के परतावा कमावून दिला आहे. केवळ 75,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर या स्टॉकने लोकांना करोडपती बनवले आहे. (Granules Share)

मागील वर्षी 23 जून 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 238.05 रुपये या आपल्या वार्षिक नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. मागील पाच महिन्यांत या कंपनीच्या शेअरची किंमत 60 टक्क्यांनी वाढून 4 नोव्हेंबर 2022 रोजी 381.25 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहचले होते.

पुढील ट्रेंड काय?

ग्रॅन्युल्स इंडिया कंपनी एपीआ, इंटरमीडिएट्स आणि फिनिश्ड डोसेस म्हणजेच औषधे बनवण्याचे काम करते. ही कंपनी मुख्यतः B2B, B2C विपणन आणि वितरण क्षेत्रात काम करते. आर्थिक वर्ष 2023 च्या महसुलात ग्रॅन्युल्स इंडिया कंपनीच्या पॅरासिटामॉल, इबुप्रोफेन, मेटफॉर्मिन, मेथोकार्बामोल आणि ग्वायफेनेसिन या 5 उत्पादनांचा 85 टक्के वाटा होता.

पुढील काळात ही कंपनी कोर API पोर्टफोलिओ मजबूत करण्यावर, उत्पादनांचे मिश्रण बदलण्यावर आणि अधिक भौगोलिक क्षेत्रांमध्ये विस्तार करण्याचा प्रयत्न करत आहे. या कारणांमुळे देशांतर्गत ब्रोकरेज फर्म ICICI सिक्युरिटीजने ग्रॅन्युल्स इंडिया कंपनीचे शेअर्स 360 रुपये लक्ष किमतीसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Granules India Share Price today on 24 June 2023.

हॅशटॅग्स

Granules India Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x