23 November 2024 9:19 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Gold Price Today | गुड-न्यूज! आज सोन्याचे दर कोसळले, खरेदीची सुवर्ण संधी, सोन्याचा दर 2,992 रुपयांनी खाली, नवे दर तपासा

Gold Price Today

Gold Price Today | गेल्या आठवडाभरात सोन्या-चांदीच्या दरात झपाट्याने घसरण झाली आहे. अमेरिकेतील महागाई थोडी नियंत्रणात आली आहे. त्यामुळे तेथील मध्यवर्ती बँकेने व्याजदरात वाढ केलेली नाही. याचा परिणाम सोन्याच्या दरावर झाला आहे. यामुळे जगभरात सोन्याचे दर घसरत आहेत. (Gold Rate Today)

गेल्या आठवड्यात सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोन्या-चांदीतील या घसरणीचा फायदा घेता येईल, असे तज्ज्ञांचे मत आहे. जर कोणाला दीर्घकाळ सोने खरेदी करायचे असेल तर या स्तरावरून खरेदीसुरू केली जाऊ शकते.

गेल्या आठवड्यात शुक्रवारी 24 कॅरेट सोन्याचा भाव 58395 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. तर सोमवारी हा दर 59227 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या पातळीवर होता. अशा तऱ्हेने संपूर्ण आठवड्यात सोन्याचा दर 832 रुपये प्रति दहा ग्रॅमवर बंद झाला आहे.

तर शुक्रवारी चांदीचा भाव 68304 रुपये प्रति किलो होता. तर चांदीचा दर सोमवारी 72359 रुपये प्रति किलोग्राम होता. त्यामुळे संपूर्ण आठवडाभरात चांदीचा भाव 4055 रुपये प्रति किलोवर बंद झाला आहे.

सोनं उच्चांकी पातळीपेक्षा किती रुपयांनी स्वस्त :
या घसरणीनंतर आता सोन्याची विक्री आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीपेक्षा 2,992 रुपयांनी स्वस्त झालं आहे. 4 मे 2023 रोजी सोन्याने उच्चांकी पातळी गाठली होती. त्यावेळी सोनं 61646 रुपये प्रति १० ग्राम वर पोहोचलं होतं. तर चांदीही आतापर्यंतच्या उच्चांकी पातळीवरून 7,455 रुपयांनी खाली आली आहे. चांदीने 4 मे 2023 रोजी 76464 रुपयांचा उच्चांक गाठला होता.

आतापर्यंतच्या उच्चांकी स्तरावरून घसरण झाल्यानंतर आता सोन्यातील गुंतवणूक आकर्षक असल्याचे सांगितले जात आहे. त्यांचा असा विश्वास आहे की, जर तुम्ही सोन्यात थोडी गुंतवणूक करायला सुरुवात केली तर भविष्यात भरपूर पैसे कमावू शकतात.

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Gold Price Today Updates check details on 25 June 2023.

हॅशटॅग्स

#Gold Price Today(249)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x