KCR Politics | विरोधकांच्या बैठकीच्या दिवशी केसीआर पुत्र आणि अमित शहांची भेट, महाविकास आघाडीची मतं फोडण्याची योजना
KCR Politics | तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी नुकतेच विरोधकांच्या ऐक्यासाठी प्रयत्न केले होते आणि आपला चेहरा देशव्यापी बनण्याच्या उद्देशाने आपल्या पक्षाचे नाव टीआरएसवरून बीआरएस म्हणजेच भारत राष्ट्र समिती असे बदलले होते. पण तेलंगणात काँग्रेसचे वारे वाहू लागल्याने आता त्यांची रणनीती बदललेली दिसते आणि त्यांच्या एकूण राजकीय हालचाली भाजपाची ‘बी टीम’ असल्याप्रमाणे आहेत.
एकेकाळी बिहारपासून महाराष्ट्रापर्यंत विरोधकांच्या एकतेचा प्रयत्न करणाऱ्या केसीआर यांनी २३ तारखेला पाटण्यातील सभेच्या दिवशीच आपला मुलगा केटीआर यांना अमित शहा यांच्या भेटीसाठी दिल्लीला पाठवले. मात्र विरोधकांच्या बैठकीमुळे माध्यमांवर याची जास्त झाली नव्हती. आता KCR यांच्या कुटुंबातील सदस्यांविरोधातील ED हालचाली देखील मंदावल्या आहेत. त्यामुळे KCR आता तेलंगणाबाहेर भाजपसाठी काम करत असून, त्यांची तेलंगणामध्ये भाजपसोबत राजकीय सेटलमेंट झाल्याची चर्चा तेलंगणातील स्थानिक माध्यमांकडे रंगली आहे.
महाराष्ट्रात BRS पक्षाचा फारसा प्रभाव पडणार नसला तरी महाविकास आघाडीची आगामी निवडणुकीत मतं खाण्यासाठी त्यांनी भाजपसोबत छुपी रणनीती आखली असल्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यासाठी मराठवाडा आणि विदर्भातील स्थानिक पक्षातील मागे फेकले गेलेले नेते त्यांच्या रडारवर असून केवळ महाविकास आघाडीची मतं फोडणं हाच त्यांचा उद्देश असल्याचं म्हटलं जातंय. त्यात प्रकाश आंबेडकर यांच्यावर नेहमीच भाजपाची बी टीम असा आरोप होतं असताना ते देखील KCR यांच्यासोबत बैठका घेत असल्याने यामागे कोण आहे हे समजू शकतं.
केसीआर यांच्या या भूमिकेकडे विरोधकांच्या ऐक्याला धक्का म्हणून पाहिले जात असले तरी काँग्रेसला यांची आधीच कल्पना होती. तेलंगणात काँग्रेसची हवा असल्याने KCR तितकेच दबावाखाली देखील आहेत. तेलंगणात अनेक मोठे नेते काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहेत. तेलंगणा हातून गेल्यास त्यांचं राजकीय अस्तित्व धोक्यात येईल असं त्यांना वाटू लागल्याने त्यांच्या काँग्रेसविरोधी हालचाली अधिक वाढल्या आहेत. पण तेलंगणा काँग्रेस देखील KCR यांना सत्तेतून पायउतार करण्यासाठी मोठी तयारी करत असून स्वतः राष्ट्रीय अध्यक्ष खर्गे आणि राहुल गांधी यावर नजर ठेऊन आहेत.
मंगळवारी महाराष्ट्रात येत असून राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके यांना पक्षात घेणार आहेत. खुद्द मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात येऊन एका नेत्याला प्रवेश दिल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तिखट प्रतिक्रिया दिली होती. संजय राऊत म्हणाले की, केसीआर भाजपसाठी काम करत आहेत. यापूर्वीही महाराष्ट्र दौऱ्यावर आलेल्या केसीआर यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला होता.
KCR यांच्या केंद्रस्थानी मराठवाड्यातील चंद्रपूर, औरंगाबाद, नांदेड, लातूर अशा भागात अधिकाधिक नेत्यांना आपल्याशी जोडण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसही संतापली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, केसीआर यांना महाराष्ट्रात येऊन भाजपच्या विरोधात मतविभागणी करायची होती. इतकंच नाही तर तेलंगणातील शेतकऱ्यांची स्थिती महाराष्ट्रापेक्षा चांगली आहे, असं म्हणत ते अनेकदा राज्यात शिरण्याचा प्रयत्न करताना दिसतात. ‘अबकी बार, किसान सरकार’चा नारा देत ते म्हणतात की, महाराष्ट्रापेक्षा तेलंगणात पिकांना जास्त भाव मिळतो.
शेतकरी तेलंगणात गेले तर त्यांना वस्तुस्थिती कळेल – शरद पवार
केसीआर यांच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना खुद्द शरद पवार म्हणाले की, महाराष्ट्रापेक्षा तेलंगणात शेतकऱ्यांना कांद्याचे दर जास्त मिळत आहेत, अशी बरीच प्रसिद्धी झाली. या मोहिमेमुळे अनेक शेतकरी तेलंगणात गेले असता महाराष्ट्रापेक्षा कमी भाव मिळत असल्याचे निदर्शनास आले. अशा प्रकारे ते फसवणूक झाल्यासारखे वाटून परतले.
News Title : KCR Politics against MVA check details on 27 June 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Loan EMI Payment | तुम्ही सुद्धा EMI भरायला विसरता, तुमच्या एका चुकीमुळे होईल प्रचंड नुकसान, संपूर्ण डिटेल्स वाचा - Marathi News
- Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- NTPC Share Price | मल्टिबॅगर एनटीपीसी शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NTPC
- Bank Job Requirement | बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी, या नामांकित बँकेत नोकरी करा आणि मिळवा घसघशीत पगार