22 November 2024 3:23 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE Railway Ticket Booking | जनरल तिकिटाच्या पैशांत करता येईल AC कोचमधून प्रवास; 90% प्रवाशांना 'हा' नियम माहित नाही
x

Tata Consumer Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स शेअर्स तेजीत येतं आहेत, तज्ज्ञांचा खरेदी सल्ला, टार्गेट प्राईस

Tata Consumer Share Price

Tata Consumer Share Price | टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स कंपनीच्या शेअरमध्ये सोमवारी जबरदस्त तेजी पाहायला मिळाली होती. मात्र आज स्टॉकमध्ये किंचित प्रॉफिट बुकींग पाहायला मिळत आहे. काल टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स स्टॉक 3 टक्के वाढीसह 866.25 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. दिवसा अखेर टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स स्टॉक 862.40 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. (Tata Consumer Products Share Price)

21 जून 2023 रोजी टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स कंपनीचे शेअर्स 877 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. आज मंगळवार दिनांक 27 जून 2023 रोजी टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स कंपनीचे शेअर्स 0.29 टक्के घसरणीसह 860.05 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

शेअरची टार्गेट प्राईस

16 मार्च 2023 रोजी टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स कंपनीचे शेअर्स 685 रुपये या आपल्या वार्षिक नीचांक किमतीवर ट्रेड करत होते. तज्ञांच्या मते टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स कंपनीचे शेअर्स पुढील काळात आणखी वाढू शकतात. ग्लोबल ब्रोकरेज फर्म सिटीने टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स कंपनीच्या स्टॉकवर 1,020 रुपये लक्ष किंमत निश्चित केली आहे. टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स कंपनीच्या शेअरमधून गुंतवणुकदार 21 टक्के परतावा कमवू शकतात.

ब्रोकरेज फर्मने टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स स्टॉकवर बाय रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. शेअर बाजारातील 22 तज्ञांनी टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स स्टॉकवर ‘बाय’ रेटिंग देऊन शेअर्स खरेदी करण्याची शिफारस केली आहे. ब्रोकरेज फर्म सिटीने आपल्या अहवालात म्हंटले आहे की, टाटा कंझ्युमर कंपनी सर्व क्षेत्रांत प्रगती करत असून व्यवसाय वृध्दी करत आहे. कंपनीच्या आर्थिक कामगिरीमध्ये आणखी सुधारणा होण्याची अपेक्षा तज्ञांनी व्यक्त केली आहे.

कंपनीची कामगिरी

मार्च 2023 तिमाहीच्या निकालांनुसार टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स कंपनीने 268 कोटी रुपये इतका नेट प्रॉफिट नोंदवला होता. मागील वर्षीच्या याच तिमाहीत कंपनीने 217 कोटी रुपये नफा नोंदवला होता. म्हणजेच या तिमाहीत कंपनीच्या निव्वळ नफ्यात 23 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. मार्च 2023 तिमाहीत टाटा कंझ्युमर कंपनीने ऑपरेशन्समधून 3,619 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. मागील वर्षभराच्या तुलनेत या तिमाहीत कंपनीने 14 टक्के अधिक महसूल संकलित केला आहे. मागील वर्षी याच तिमाही कालावधीत टाटा कंझ्युमर कंपनीने 3,175 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Consumer Share Price today on 27 June 2023.

हॅशटॅग्स

Tata Consumer Share Price(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x