23 November 2024 6:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Adani Total Gas Share Price | अदानी टोटल गॅस शेअर्सची तुफान खरेदी सुरू, शेअर सध्या 84 टक्के स्वस्त आहे, खरेदी करणार का?

Adani Total Gas Share Price

Adani Total Gas Share Price | अदानी टोटल गॅस या अदानी ग्रुपचा भाग असलेल्या कंपनीचे शेअर्स आपल्या उच्चांक किंमत पातळीच्या 84 टक्के खाली ट्रेड करत आहेत. हिंडेनबर्ग फर्मच्या अहवालानंतर अदानी टोटल गॅस कंपनीचे शेअर्स क्रॅश झाले होते. अवघ्या पाच महिन्यात गुंतवणूकदारांना 84 टक्के तोटा सहन करावा लागला आहे. (Adani Total Gas Share)

मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी टोटल गॅस कंपनीचे 641.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज बुधवार दिनांक 28 जून 2023 रोजी अदानी टोटल गॅस कंपनीचे (Adani Total Gas Share Price NSE) शेअर्स 1.93 टक्के वाढीसह 656.45 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. (Adani Total Gas Share Price BSE)

अदानी स्टॉक डिटेल

काही महिन्यांपूर्वी अदानी टोटल गॅस कंपनीचे शेअर्स 3900 रुपये या आपल्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. 24 जानेवारी 2023 रोजी अमेरिकेतील हिंडनबर्ग फर्मचा अहवाल प्रसिद्ध झाला, अदानी अदानी ग्रूपच्या शेअरमध्ये उतरती कळा सुरू झाली. जेव्हा हा अहवाल प्रसिद्ध झाला, तेव्हा अदानी टोटल गॅस कंपनीचे शेअर्स 3900 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

आता हा स्टॉक 650 रुपयेच्या जवळपास ट्रेड करत आहे. YTD आधारे अदानी टोटल गॅस कंपनीचे शेअर्स 81.49 टक्के कमजोर झाले आहेत. मागील एका वर्षात हा स्टॉक 72 टक्केपेक्षा जास्त घसरला आहे.

शेअरची कामगिरी

अदानी टोटल गॅस कंपनीच्या शेअरची वार्षिक नीचांक पातळी किंमत 620.15 रुपये होती. तर 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 3,998.35 रुपये होती. 23 जानेवारी 2023 रोजी अदानी टोटल गॅस कंपनीचे शेअर्स 3,998.35 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तेव्हापासून हा साठा सातत्याने लाल निशाणीवर ट्रेड करत आहे. आज मात्र स्टॉकमध्ये किंचित खरेदी पाहायला मिळत आहे.

मागील एका महिन्यात अदानी टोटल गॅस कंपनीचे शेअर्स स्टॉक 9.89 टक्के कमजोर झाले आहेत. मार्च 2023 तिमाहीमधे अदानी टोटल गॅस कंपनीने 10.2 टक्के वाढीसह 1,114.8 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीने 1,012 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. मार्च 2022 तिमाहीत कंपनीचा प्रॉफिट मार्जिन 13 टक्क्यांवरून वाढून 17.5 टक्क्यांपर्यंत पोहचला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Adani Total Gas Share Price today on 28 June 2023.

हॅशटॅग्स

#Adani Total Gas Share Price(17)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x