19 April 2025 8:38 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | पती-पत्नीसाठी खास सरकारी योजना, वर्षाला 1,11,000 रुपये तर महिन्याला 9250 रुपये व्याज मिळेल SBI Gold ETF | तुम्ही सोन्यात गुंतवणूक करताय? पण पैसा 'गोल्ड फंडात' झपाट्याने वाढतोय, प्रचंड फायद्याची अपडेट PPF Investment | पगारदारांनो, या सरकारी योजनेत वर्षाला 1.5 लाख रुपयांच्या बचत करा, तब्बल 1.5 कोटी रुपये परतावा मिळेल Horoscope Today | 19 एप्रिल 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Infosys Share Price | मजबूत फंडामेंटल्स असलेल्या IT स्टॉकसाठी BUY रेटिंग, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: INFY IRFC Share Price | 129 रुपयाच्या शेअरसाठी 165 रुपये टार्गेट प्राईस, महत्वाची अपडेट जाणून घ्या - NSE: IRFC Reliance Share Price | कोटक सिक्युरिटीज बुलिश, जाहीर केली टार्गेट प्राईस, गुंतवणूकदारांसाठी अपडेट - NSE: RELIANCE
x

नवी मुंबई-उरण नंतर मीरारोड मध्ये बकरी ईद पूर्वी धार्मिक वाद, सोसायटीत जय श्री-राम, विशिष्ठ TV वाहिन्यांच्या हजेरीने स्क्रिप्टेड असल्याचा संशय

Thane Mira Road

Maharashtra Politics | बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मिरा रोड येथील एका सोसायटीत एका मुस्लीम व्यक्तीने दोन बकऱ्या आणल्याने वाद निर्माण झाला आहे. या प्रकरणी मंगळवारी रात्री हा गोंधळ इतका वाढला की पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला आणि सध्या शांतता आहे. सोसायटीतील काही लोकांनी बकऱ्या आणण्यास आक्षेप घेत येथे बकऱ्या पाळता येणार नाहीत, असे सांगितले. वास्तविक ते बकरे पाळण्यासाठी नव्हे तर ईदच्या कुर्बानीसाठी आणले होते असं या लोकांनी सांगितले.

सोसायटीतील एका रहिवाशाने सांगितले की, आमच्या सोसायटीत कोणत्याही प्राण्याला प्रवेश दिला जाणार नाही, असा ठराव मंजूर करण्यात आला होता. पण काही लोकांनी हा नियम मोडून दोन बकऱ्या आत आणल्या आहेत. आम्ही त्याला विरोध करत आहोत आणि होऊ देणार नाही. अन्य एका सदस्याने सर्व लोकांना सलोखा राखण्याचे आवाहन केले आणि समाजाच्या नियमांचे सर्वांनी पालन करावे असे देखील सांगितले.

बकरी आणणाऱ्या मोहसीन यांनी सांगितले की, या सोसायटीत २०० हून अधिक मुस्लीम कुटुंबे राहतात. आम्ही दरवर्षी बकऱ्या आणायचो, पण कधीच गदारोळ झाला नाही आणि कोणी आक्षेपही घेतला नाही. पहिल्यांदाच काही लोकांनी आंदोलन केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी ११ जणांविरुद्ध भादंविच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. बकरी ईदमध्ये कुर्बानीसाठी बकऱ्या आणल्याचा आरोप या लोकांवर आहे.

मुस्लीम कुटुंबाचं म्हणणं काय?
मुस्लीम कुटुंबांचे म्हणणे आहे की आम्ही येथे पाळत नाही आहोत तर ते ईदच्या कुर्बानीसाठी आणले आहेत आणि आमच्याकडे त्यासाठी दुसऱ्या जागेचा पर्यायही नाही आणि रात्री बाहेर बांधून ठेवल्यास चोरोची भीती आहे. बकरी ईदपर्यंतच बकरा असतो. तसेच याची कुर्बानी येथे देतच नाही. त्यासाठी ते कत्तलखान्यात जातात किंवा शासनाने ठरवून दिलेल्या ठिकाणी कुर्बानी दिला जाते.

जेपी इन्फ्रा सोसायटीत राहणारे मोहसीन म्हणाले, ‘आम्हाला बकऱ्या ठेवण्यासाठी तात्पुरती जागा देण्यात यावी, अशी मागणी आम्ही सोसायटीकडे केली होती. आम्ही येथे कुर्बानी देतच नाही असे स्पष्टपणे सांगितले होते. मात्र अचानक काही ठराविक प्रसार माध्यमाचे प्रतिनिधी कॅमेरा घेऊन आणि एका विशिष्ट समाजाचा लोंढा अचानक आला आणि ‘जय श्रीराम’च्या घोषणा देऊ लागला आणि हनुमान चालीसा पठण करू लागला. काही क्षणातच बातम्या प्रसिद्ध झाल्या आणि क्षणात समाज माध्यमांवर कन्टेन्ट शेअर करून वातावरण बिघडविण्यात आल्याचं पाहायला मिळाल. सर्वकाही नियोजनबद्ध घडवलं गेल्याच देखील आम्हाला काही क्षणात समजलं.

सोसायटीत जय श्रीराम आणि हनुमान चालीसाचं पठण सुरु
आंदोलकांनी हनुमान चालीसाही पठण केल्याचे काही जणांचे म्हणणे आहे. सध्या सोसायटीजवळ पोलिस तैनात करण्यात आले असून घटनास्थळी शांतता आहे. गुरुवारी बकरी ईदचा सण असून बंदी घातलेल्या जनावरांचा बळी दिला जाणार नाही, असे सरकारचे म्हणणे आहे. याशिवाय ठरलेल्या ठिकाणीच कुर्बानीला परवानगी असेल. बलिदानाचे फोटो आणि व्हिडिओ देखील सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केले जाणार नाहीत. मात्र हिंदू-मुस्लिम वाद आता ठाणे पट्ट्यात पेटवला जातोय अशी अनेक उदाहरणं सामोरं आली आहेत. काही दिवसांपूर्वी नवी मुंबईत एक मशिदीच्या जागेवरून मोर्चा निघाला होता आणि याचे सर्वबाजूने कनेक्शन भाजपसाबंधित नेत्यांशी आणि भाजप संबंधित हिंदुत्ववादी संघटनांशी जोडले गेले असल्याचं समोर आलं होतं. विशेष म्हणजे त्या मशिदीच्या जागेसाठी पाठपुरावा करणारा स्थानिक आमदार देवेंद्र फडणवीस समर्थक होता तर त्याविरोधात मोर्चा काढणारे सुद्धा फडणवीसांच्याच जवळचे होते असं समोर आलं होतं.

News Title : Thane Mira Road protest inside housing society check details on 28 June 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Thane Mira Road(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या