24 November 2024 10:56 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Interest | पोस्टाच्या 'या' 9 योजनांवर मिळते धमाकेदार व्याज, 10 रुपयांपासून देखील सुरू करू शकता गुंतवणूक Mutual Fund SIP | एक फॉर्म्युला तुमचं आयुष्य बदलू शकतो; कोटींच्या घरात कमवाल पैसे, म्युच्युअल फंड SIP ठरेल फायद्याची Home Loan | आधीच घरासाठी लोन घेतलं; दुसऱ्या घरासाठी देखील लोन प्रोसेस करायची आहे, असा मिळेल टॉप अप होम लोन FD Calculator | पत्नीच्या नावे FD करून मिळवा जास्तीत जास्त व्याज; FD कॅल्क्युलेटरचा फंडा काय सांगतो पहा - Marathi News SIP Calculator | आता सहज कमवता येतील 5 कोटी, गुंतवणुकीची 'ही' चाल बनवेल कोट्याधीश, कॅल्क्युलेशन पहा - Marathi News RVNL Share Price | RVNL शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, फायद्याची अपडेट आली, स्टॉक BUY करावा का - NSE: RVNL IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO
x

Penny Stock | पटेल इंजिनीअरिंग पेनी स्टॉक एका दिवसात 10 टक्के वाढला, शेअर खूप स्वस्त, का होतेय खरेदी?

Penny Stock

Penny Stock | मागील काही दिवसांपासून पटेल इंजिनीअरिंग कंपनीच्या शेअरमध्ये तुफान तेजी पाहायला मिळत आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हा स्टॉक 5 टक्के वाढीसह 30.67 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. विशेष म्हणजे आज या स्टॉकमध्ये मोठ्या प्रमाणात खरेदी पाहायला मिळत आहे. आज बुधवार दिनांक 28 जून 2023 रोजी पटेल इंजिनीअरिंग कंपनीचे शेअर्स 10.10 टक्के वाढीसह 32.15 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (Patel Engineering Share Price)

मागील आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत, शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणुकदार विजय केडिया यांची गुंतवणूक असलेल्या पटेल इंजिनिअरिंग कंपनीच्या विक्रीत 14 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली. आणि कंपनीने 1192 कोटी रुपयेची विक्री नोंदवली होती. पटेल इंजिनीअरिंग कंपनीचा EBITDA 176 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. तर कंपनीचा निव्वळ नफा 84 कोटी पेक्षा जास्त नोंदवला गेला आहे. नवीन प्रकल्पांच्या समावेशामुळे पटेल इंजिनीअरिंग कंपनीच्या ऑर्डर बुकके मूल्य आता 20,000 कोटीपेक्षा जास्त झाले आहे. (Patel Engineering Share)

पटेल इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स 30 ऑक्टोबर 2020 रोजी 8.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज हा स्टॉक 32.15 रुपयेवर पोहचला आहे. या काळात गुंतवणूकदारांचे पैसे चार पत वाढले आहेत. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पटेल इंजिनिअरिंग स्टॉक 30.65 रुपयेवर ट्रेड करत होता. तर आज हा स्टॉक 10 टक्के वाढीसह क्लोज झाला आहे. (Patel Engineering Share Price NSE)

पटेल इंजिनीअरिंग या कंपनीची स्थापना 73 वर्षे वर्षापुर्वी 1949 साली झाली होती. विजय केडिया यांनी गुंतवणूक केलेली ही कंपनी जलविद्युत निर्मिती आणि सिंचन क्षेत्रात व्यवसाय करते. पटेल इंजिनीअरिंग कंपनीने आतापर्यंत अनेक पायाभूत प्रकल्प पूर्ण केले आहे. ही कंपनी धरणे, पूल, बोगदे, रस्ते आणि औद्योगिक पायाभूत सुविधा यासारखे पायाभूत प्रकल्प देखील पूर्ण करते. मागील 3 महिन्यांत पटेल इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअरची किंमत 110 टक्के वाढली आहे. (Patel Engineering Share Price BSE)

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Penny Stock of Patel engineering share price on 28 June 2023

हॅशटॅग्स

#Penny Stock(187)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x