22 November 2024 7:23 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

Capacite Infra Share Price | कॅपेसाइट इंफ्रा प्रोजेक्ट शेअरने मागील 1 महिन्यात गुंतवणुकदारांना 23% परतावा दिला, एका बातमीने खरेदी वाढली

Capacite Infra Share Price

Capacite Infra Share Price | कॅपेसाइट इंफ्रा प्रोजेक्ट लिमिटेड या इमारत बांधकाम आणि EPC क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीला 452 कोटी रुपये मूल्याची ऑर्डर मिळाली आहे. कॅपेसाइट इंफ्रा प्रोजेक्ट कंपनीला दिल्ली-नॅशनल कॅपिटल रिजनमध्ये निवासी आणि व्यावसायिक टॉवर बांधण्याचा मोठा कंत्राट दिला आहे.

कॅपेसाइट इंफ्रा प्रोजेक्ट कंपनीसाठी ही एक मोठी बातमी आहे. आज बुधवार दिनांक 28 जून 2023 रोजी कॅपेसाइट इंफ्रा प्रोजेक्ट कंपनीचे शेअर्स 1.31 टक्के वाढीसह 204.40 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 23 जून 2023 रोजी कॅपेसाइट इंफ्रा प्रोजेक्ट कंपनीचे शेअर्स 188 रुपयेवर ट्रेड करत होते. आज हा स्टॉक 204 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. 2 जून 2023 रोजी, कॅपेसाइट इंफ्रा प्रोजेक्ट कंपनीचे शेअर्स 163 रुपये किमतीवर ट्रेड करत होते . याचा अर्थ मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 23.02 टक्के परतावा कमावून दिला आहे. 28 मार्च 2023 रोजी, कॅपेसाइट इंफ्रा प्रोजेक्ट कंपनीचे शेअर्स 110 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

कॅपेसाइट इंफ्रा प्रोजेक्ट कंपनीच्या शेअरने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 79.46 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरची किंमत 44.45 टक्के वाढली आहे. कॅपेसाइट इंफ्रा प्रोजेक्ट कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1376 कोटी रुपये आहे.

मागील 3 वर्षांत कॅपेसाइट इंफ्रा प्रोजेक्ट कंपनीच्या शेअरची किंमत 21 टक्के वाढली आहे. मागील आर्थिक वर्षाच्या अखेरीस या कंपनीकडे 9513 कोटी रुपये मूल्याचे ऑर्डर प्रलंबित होत्या. कॅपेसाइट इंफ्रा प्रोजेक्ट कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 211 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 105 रुपये होती. गुंतवणूक करून फायदा कमावण्यासाठी तुम्ही कॅपॅसिटी इन्फ्रा स्टॉक खरेदी करू शकता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Capacite Infra Share Price today on 28 June 2023.

हॅशटॅग्स

Capacite Infra Share Price(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x