23 November 2024 4:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Vs Reliance Share Price | BEL आणि रिलायन्स सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल 38% पर्यंत परतावा - NSE: BEL Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, असं मिळेल रेल्वेचं सर्वांत स्वस्त तिकीट, ठाऊक आहे हा फंडा My EPF Money | EPF मधून पैसे काढण्याची सर्वांत सोपी पद्धत इथे पहा, खात्यातील जमा शिल्लक तपासून पैसे काढू शकता Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल
x

५०० रुपये देऊन भाजपने बोटावर बळजबरी शाई लावली व मतदान करु नये सांगितलं

BJP, Narendra Modi, Utter Pradesh, Loksabha Election 2019

चंदौली : लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या म्हणजे ७व्या टप्प्यातील मतदानासाठी मतदारांकडून आज सकाळपासून सुरूवात झाली आहे. परंतु, युपीच्या चंदौली लोकसभा क्षेत्रातून एक अतिशय धक्कादायक वृत्त आहे. येथे मतदानाच्या एक दिवस आधीच मतदारांच्या बोटावर जबरदस्तीने शाई लावण्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.

इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, चंदौली लोकसभा क्षेत्रातील तारा-जीवापूर गावात दलित वस्तीतील नागरिकांनी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांवर मतदान करु नये यासाठी पैसे वाटल्याचा आरोप केला आहे. ‘शनिवारी ७व्या टप्प्यातील मतदानाच्या १ दिवस आधी ३ जण गावात आले. त्यांनी आमच्या बोटावर बळजबरी शाई लावली आणि आम्ही आम्ही मतदान करु नये यासाठी त्यांनी ५०० रुपये देखील दिले. ते तिघंही भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते होते’ असं स्थानिक गावकऱ्यांनी सांगितलं.

वृत्तसंस्था एएनआयला एका गावकऱ्याने सांगितल्यानुसार, ‘ते लोक भारतीय जनता पक्षाचे होते आणि त्यांनी आम्ही पक्षाला मतदान करणार की नाही अशी विचारणा केली. त्यानंतर बोटाला बळजबरी शाई लावून झाल्यावर आता तुम्ही मतदान करु शकणार नाहीत, याबाबत कोणाला काहीही सांगू नका असं ते म्हणाले’.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x