21 November 2024 5:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE ICICI Mutual Fund | ICICI चा धमाकेदार फंड पाहिलात का, 5 लाखांचे झाले 3.5 करोड, इथे वाढवा पैशाने पैसा - Marathi News Home Loan Alert | तुम्ही सुद्धा होम लोन घेताय का; थांबा या 5 गोष्टींचा तटस्थपणे विचार करा, फायदा होईल - Marathi News Job Opportunity | तरुणांनो लाखोंच्या घरात पगार घेण्याची वेळ आली; ITBT मध्ये 526 जागांसाठी मेगा भरती सुरू, पटापट अर्ज करा Railway Ticket Booking | तिकीट कॅन्सल करण्याऐवजी ट्रान्सफर करा कॅन्सलेशन चार्जेसपासून वाचाल; पहा नवा नियम काय सांगतो
x

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी शेअर्समध्ये जबरदस्त तेजी, 5 दिवसात 6.47 टक्के परतावा, स्वस्तात खरेदी करून फायदा घेणार?

Suzlon Share Price

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी या रिन्यूएबल एनर्जी क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये तुफानी तेजी पाहायला मिळत आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स ऑर्डर्स आणि बॅलन्स शीटमधील मजबूत वाढीमुळे तेजीत आले आहेत.

बुधवार दिनांक 29 जून 2023 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 6 टक्के वाढीसह 14.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 13 जून 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 15.76 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. 28 जुलै 2022 रोजी हा स्टॉक 5.43 रुपये या नीचांक किमतीवर ट्रेड करत होता.

गुंतवणुकीवर परतावा

एकेकाळी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 375 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका महिन्यांत सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 43.00 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका या कंपनीच्या शेअरची किंमत 131.97 टक्के वाढली आहे. मागील सहा महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 45.81 टक्के नफा कमावून दिला आहे. तर YTD आधारे सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 38.32 टक्के मजबूत झाले आहेत.

सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरमध्ये वाढ होण्याचे कारण म्हणजे, मजबूत आर्थिक कामगिरी आणि अनेक पवन ऊर्जा प्रकल्पांचे यशस्वी अधिग्रहण केल्याने सुझलॉन एनर्जी स्टॉकमध्ये खरेदी वाढत आहे. स्टॉकमधील सुसाट तेजीने किरकोळ गुंतवणूकदारांना आकर्षित केले आहे. मार्च 2023 च्या तिमाहीनंतर सुझलॉन एनर्जी स्टॉकमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूकीचे आगमन झाले आहे.

ट्रेंडलाइन डेटानुसार Q4FY23 मध्ये किरकोळ गुंतवणूकदारांनी सुझलॉन एनर्जी स्टॉकमध्ये 0.30 टक्के गुंतवणूक वाढवली आहे. आता किरकोळ गुंतवणूकदारांचे गुंतवणुकीचे प्रमाण 72.3 टक्केवार पोहचली आहे. सुझलॉन एनर्जी कंपनी विंड टर्बाइन जनरेटरचे उत्पादन, ऊर्जा प्रकल्प अंमलबजावणी, ऑपरेशन आणि देखभाल आणि संबंधित घटकांची विक्री आणि व्यवसाय सेवा प्रदान करण्याच्या कामात गुंतलेली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Suzlon Share Price today on 29 June 2023.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(260)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x