15 November 2024 3:10 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 5 मेटल शेअर्स मालामाल करणार, 46% पर्यंत परतावा मिळेल - NSE: TATASTEEL Suzlon Share Price | सुझलॉन शेअरबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून रेटिंग अपडेट - NSE: SUZLON IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागणार, ग्रे-मार्केटमधून फायद्याचे संकेत - GMP IPO Horoscope Today | रखडलेली कामे पूर्ण होतील, आजचा दिवस 'या' राशींसाठी अत्यंत खास, आजचे राशीभविष्य काय सांगते पहा Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर रॉकेट होणार, फायद्याचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रेटिंग अपग्रेड, शेअर मालामाल करणार - NSE: RELIANCE HAL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स शेअर मालामाल करणार, स्टॉक रेटिंग अपडेट, कमाईची मोठी संधी - NSE: HAL
x

BJP Hindu-Muslim Politics | भाजपकडून मंथन'साठी MIM चा गड असलेल्या हैदराबादची निवड का? चिथावणीखोर वक्तव्य करून वातावरण निर्मिती?

BJP Hindu-Muslim Politics

BJP Hindu-Muslim Politics | कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील पराभवामुळे भारतीय जनता पक्षाला दक्षिण भारतातील आपला एकमेव बालेकिल्ला गमवावा लागला आहे. अशा परिस्थितीत तेलंगणा राज्यात पक्षाला कोणतीही कसर सोडायची नाही. पुढील राष्ट्रीय स्तरावरील बैठक हैदराबादमध्येच बोलावण्याच्या तयारीत भाजप असल्याचे समजते. याशिवाय राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांच्या जाहीर सभाघेण्याचे ही पक्षाचे नियोजन आहे.

भाजपने बैठकीसाठी हैदराबादची निवड का केली?
सध्या तरी भाजपने याबाबत अधिकृतपणे काहीही सांगितलेले नाही. मात्र २०२४ मधील लोकसभा निवडणुकीत महागाई-बेरोजगारीच्या मुद्द्यांमुळे भाजपच्या प्रचाराचा पूर्ण जोर धार्मिक मुद्द्यांवर राहणार आहे असे संकेत मिळाले आहेत. हिंदू-मुस्लिम वाद अधिक कसा वाढेल आणि मतांचे ध्रुवीकरण कसे होईल यावर भाजपचे भविष्य अवलंबून असणार आहे. त्यामुळे भाजपची बी टीम म्हणून प्रसिद्ध असलेल्या आणि हैद्राबादमध्ये राजकीय पकड असलेल्या MIM पक्षाच्या गडात भाजप जाणीवपूर्वक राजकीय इव्हेन्ट घेणार आहे असं वृत्त आहे. भाजप नेत्यांनी मुस्लिमावरून चिथावणीखोर वक्तव्य करायची आणि त्यावर MIM पक्षाच्या नेत्यांनी हिंदूंविरोधात चिथावणीखोर प्रतिउत्तर देऊन प्रसार माध्यमांवर बातम्या झळकावयाच्या हाच कार्यक्रम पुढे पाहायला मिळेल असं राजकीय तज्ज्ञ सांगत आहेत.

तसेच के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीविरोधात (बीआरएस) आपली भूमिका नरम झालेली नाही, हे या माध्यमातून दाखवण्याचा पक्षाचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे. कर्नाटकातील पराभवानंतर तळागाळात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे मनोधैर्य उंचावण्याचे काम ही बैठक करेल, असेही बोलले जात आहे.

हैदराबादमधील बैठकीमुळे तेलंगणात पक्ष कमकुवत होत असल्याचा समज दूर होण्यास भाजपला मदत होईल, अशी अपेक्षा आहे. ताज्या घडामोडींनंतर तेलंगणातील लढाई आम्ही नगण्य आहोत, असा प्रचार भाजपमध्येच सुरु झाला होता. या प्रस्तावित बैठकीमुळे या सर्व सिद्धांतांना पूर्णविराम मिळणार आहे. तसेच तेलंगणात काँग्रेसची हवा देखील मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांची मतं फोडून अप्रत्यक्षरित्या BRS ला फायदा मिळवून द्यायचा आणि मग त्यांना आपल्या चमूत आणायची योजना असल्याचं वृत्त आहे. तेलंगणात BRS ला भाजपपासून नव्हे तर काँग्रेसपासून राजकीय धोका असल्याने ते विरोधकांच्या बैठकीपासून दूर राहिले होते. तेलंगणात सत्ता गेली तर BRS कुठेच सत्तेत नसेल आणि त्याचा भविष्यात काँग्रेसला अजून फायदा होईल अशी भीती BRS पक्षाला आहे.

पीएम मोदी सुद्धा हजेरी लावणार?
हैदराबादमध्ये ८ जुलै रोजी होणाऱ्या या बैठकीला पंतप्रधान मोदी उपस्थित राहतील की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या बैठकीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष, सरचिटणीस आणि प्रभारी उपस्थित राहणार आहेत. याशिवाय गृहमंत्री शहा आणि प्रमुख नड्डा यात सहभागी होणार आहेत.

अलीकडेच व्यस्त वेळापत्रकामुळे खम्मम येथील अमित शहा आणि हैदराबादमधील पंतप्रधान मोदी यांच्या सभा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे गेल्या वर्षी जुलैमध्ये राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठकही हैदराबादमध्ये झाली होती. तेलंगणाव्यतिरिक्त मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये ही विधानसभा निवडणूक होणार आहे.

News Title : BJP Hindu-Muslim Politics check details on 29 June 2023.

हॅशटॅग्स

#BJP Hindu Muslim Politics(2)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x