18 November 2024 11:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPF Pension Money | नोकरदारांनो, तुमच्या 60 ते 70 हजाराच्या पगारावर किती EPF पेन्शन मिळणार, संपूर्ण माहितीचा आढावा घ्या Salary Account | पगारदारांनो, केवळ झिरो बॅलन्स नाही तर, सॅलरी अकाउंटवर मिळतात या 5 सुविधा, जाणून आश्चर्यचकित व्हाल SBI Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 5 म्युच्युअल फंड योजना, 10 हजारांचे होतील करोडो रुपये, इथे पैशाने पैसा वाढवा - Marathi News Trident Share Price | 35 रुपयाच्या शेअरची कमाल, दिला 2300 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, फायदा घ्या - NSE: TECHLABS Yes Bank Share Price | येस बँकबाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सकारात्मक परिणाम होणार - NSE: RVNL IRFC Share Price | IRFC शेअर फोकसमध्ये, मल्टिबॅगर शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC
x

Mumbai Goa Vande Bharat | मुंबई-गोवा 'वंदे भारत'चे भाडे विमानांपेक्षा महाग, इंडिगो प्लेन, आकासा आणि स्पाइसजेट तिकीटही स्वस्त

Mumbai Goa Vande Bharat Fare

Mumbai Goa Vande Bharat | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भोपाळमध्ये पाच सेमी हायस्पीड वंदे भारत ट्रेनचे व्हर्च्युअल उद्घाटन केले. या गाड्यांमध्ये बहुप्रतीक्षित मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेसचाही समावेश आहे. मडगावहून निघालेली वंदे भारत गाडी सकाळी ११ वाजता सुटली होती आणि रात्री सव्वा नऊ वाजता मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचली होती. उद्घाटनाच्या दिवशी सेमी हायस्पीड ट्रेनला 10 तास 15 मिनिटे लागली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सीएसएमटी प्लॅटफॉर्मवर वंदे भारत ट्रेनचे स्वागत केले आणि पंतप्रधान मोदींचे आभार मानले होते.

मात्र ट्रेनचा डिझाईन मॉडेल बाहेरून बघण्यासाठी चांगला असला तरी सामान्य लोकांच्या खिशाला परवडणारा नाही असेच म्हणावे लागेल. तसेच अनेक वंदे भारत ट्रेन लीकेजचे प्रकार समोर आल्याने पैसे भरूनही ट्रेनच्या आत प्रवाशांच्या डोक्यावर पाण्याची गळती होतं असल्याचे देखील समोर आले आहे.

ट्रेनचे तिकीट विमानांपेक्षा महाग
मुंबई-गोवा वंदे भारत गाडी दादर, ठाणे, पनवेल, खेड, रत्नागिरी, कणकवली आणि थिविम येथे थांबते. जीएसटी वगळता चेअर कारचे भाडे १,८१५ रुपये आणि एक्झिक्युटिव्ह चेअरकार क्लासचे भाडे ३,३६० रुपये आहे. ही गाडी ५८६ किलोमीटरचे अंतर पार करते. वंदे भारत ट्रेनने महाराष्ट्रातील हा सर्वात लांब मार्ग आहे. या भाड्याची विमान हवाई भाड्याशी तुलना केल्यास गोव्याला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे भाडे २०२४ रुपये, अक्सा एअरचे भाडे २०७७ रुपये, स्पाइसजेटचे भाडे २१५४ रुपये, एअर इंडियाचे भाडे २१४० रुपये आहे, तर इतर विमान कंपन्यांचे भाडेही याच आसपास आहे, जे वंदे भारत ट्रेनपेक्षा खूपच स्वस्त आहे.

पावसाळ्यात वंदे भारत मुंबई ते गोवा दरम्यान आठवड्यातून तीन दिवस धावणार आहे. सीएसएमटीहून वंदे भारत गाडी सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी पहाटे ५.२५ वाजता सुटेल आणि दुपारी ३.३० वाजता मडगावला पोहोचेल. मडगावहून वंदे भारत गाडी दर मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी दुपारी १२.२० वाजता सुटेल आणि सीएसएमटी मुंबईला रात्री १०.२५ वाजता पोहोचेल.

मडगाव-मुंबई दरम्यान धावणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसचा कमाल वेग १६० किमी असेल. मुंबईहून येणारी ही चौथी आणि महाराष्ट्राची पाचवी वंदे भारत ट्रेन आहे. सध्या मुंबई- मुंबई-सोलापूर (४०० किमी), मुंबई-शिर्डी (३४० किमी) आणि मुंबई सेंट्रल-गांधीनगर (५२० किमी) या तीन वंदे भारत गाड्या धावतात. याशिवाय नागपूर-बिलासपूर वंदे एक्स्प्रेसचाही समावेश असून ती ४१३ किमीचा प्रवास करते.

Disclaimer | म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Mumbai Goa Vande Bharat Fare check details on 16 July 2023.

हॅशटॅग्स

#Mumbai Goa Vande Bharat Fare(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x