15 November 2024 11:44 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 8 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, मल्टिबॅगर परताव्याचा पाऊस पडतोय, फायदा घ्या - Penny Stocks 2024 Stocks To Buy | 5 शेअर्समधून करा मजबूत कमाई, झटपट 40 टक्केपर्यंत परतावा मिळेल, संधी सोडू नका Infosys Share Price | इन्फोसिस सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: INFOSYS HAL Share Price | डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये आला, रेटिंग अपग्रेड, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: HAL Bank Account Alert | तुम्हाला सेविंग अकाउंटवर FD प्रमाणे व्याज मिळेल, बँकेत जाऊन करा केवळ एक काम, पैशाने पैसा वाढवा Nippon Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, करोडपती करत आहेत या म्युच्युअल फंड योजना, बक्कळ कमाई होऊन पैसा वाढेल - Marathi News Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया पेनी शेअरला नोमुरा ब्रोकरेजकडून BUY रेटिंग, मिळेल 90% परतावा - NSE: IDEA
x

Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा! टाटा मोटर्स शेअरमध्ये तेजीचे संकेत, स्टॉकमधील वाढीचे नेमकं कारण काय? मालामाल होण्याची संधी

Tata Motors Share Price

Tata Motors Share Price | टाटा समूहाचा भाग असेलल्या टाटा मोटर्स कंपनीच्या शेअरमध्ये बुधवारी जबरदस्त तेजी पहायला मिळाली होती. सुरुवातीच्या काही तासात टाटा मोटर्स स्टॉक 2 टक्के वाढीसह 576.60 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. टाटा मोटर्स कंपनीच्या शेअरमध्ये वाढ होण्याचे कारण म्हणजे, टाटा मोटर्सची उपकंपनी टाटा टेक्नॉलॉजीच्या आयपीओ सेबीने मंजुरी दिली आहे. आंतरराष्ट्रीय ब्रोकरेज फर्म CLSA ने टाटा मोटर्स स्टॉकची लक्ष किंमत 624 रुपयेवरून वाढून 690 रुपये जाहीर केली आहे. (Tata Motors Share)

IPO तपशील

मंगळवार दिनांक 27 जून 2023 रोजी टाटा मोटर्स कंपनीची उपकंपनी टाटा टेक्नोलॉजीच्या IPO ला सेबीने मंजुरी दिली आहे. ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्ट नुसार टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स ऑफर फॉर सेल अंतर्गत विकले जाणार आहेत. टाटा टेक्नॉलॉजी कंपनी आपल्या IPO मध्ये 9.57 कोटी इक्विटी शेअर्स खुल्या बाजारात विकणार आहे. हे प्रमाण एकूण पेड -अप शेअर कॅपिटलच्या 23.60 टक्के आहे.

मजबूत लिस्टिंग होण्याची अपेक्षा – टाटा मोटर्स शेअर्स तेजीत

टाटा टेक IPO स्टॉकची मजबूत लिस्टिंग होण्याची अपेक्षा असल्याने टाटा मोटर्स कंपनीचे शेअर्स तेजीत आले आहेत. टाटा मोटर्स कंपनी टाटा टेक्नॉलॉजी कंपनीतील 8.11 कोटी शेअर्स म्हणजेच जवळपास 20 टक्के भाग भांडवल खुल्या बाजारात विकणार आहे. तर अल्फा टीसी होल्डिंग्स फर्म 97.16 लाख शेअर्स म्हणजेच 2.40 टक्के भाग भांडवल आणि टाटा कॅपिटल ग्रोथ फंड 48.58 लाख इक्विटी शेअर्स म्हणजेच 1.20 टक्के भाग भांडवल IPO मध्ये विकणार आहे.

टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या IPO चा आकार आणि शेअरची किंमत बँड अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीमध्ये टाटा मोटर्सने मोठी गुंतवणुक केली आहे. आणि टाटा मोटर्स या IPO च्या माध्यमातुन खुल्या बाजारात स्टॉक विकून भांडवल उभारणी करणार आहे.

टाटा मोटर्स कंपनीचा ताळेबंद मजबूत होणार

Tata Technologies IPO मुळे टाटा टेक्नॉलॉजी कंपनी ऐवजी टाटा मोटर्स कंपनीचा ताळेबंद मजबूत होणार आहे. टाटा मोटर्स कंपनीने टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स 7.40 रुपये किमतीवर खरेदी केले होते. टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या आयपीओमधून टाटा मोटर्स कंपनीमध्ये प्रचंड भांडवलाचे आगमन होणार आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Motors Share Price today on 29 June 2023.

हॅशटॅग्स

#Tata Motors Share Price(137)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x