25 November 2024 8:11 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

Polycab Share Price | मल्टिबॅगर पॉलीकॅब इंडिया शेअरची पुढची टार्गेट प्राईस जाहीर, गुंतवणूक करून फायदा घेणार?

Polycab Share Price

Polycab Share Price | पॉलीकॅब इंडिया लिमिटेड कंपनीच्या शेअरमध्ये बुधवार दिनांक 28 जून 2023 रोजी मजबूत खरेदी पाहायला मिळाली होती. हा स्टॉक 2.02 टक्के वाढीसह 3,538.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. ब्रोकरेज फर्मने पॉलीकॅब इंडिया लिमिटेड स्टॉकवर आउटपरफॉर्मर रेटिंग दिल्यानंतर गुंतवणूकदारांनी मोठया प्रमाणात शेअर खरेदीला सुरुवात केली होती.

नुवामा इन्स्टिट्यूशनल रिसर्चने फर्मने पॉलीकॅब इंडिया लिमिटेड स्टॉकवर आउटपरफॉर्म रेटिंगसह पॉलीकॅब इंडिया स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला होता. बुधवार दिनांक 28 जून 2023 रोजी पॉलीकॅब इंडिया लिमिटेड कंपनीचे शेअर्स 4.74 टक्के वाढीसह 3,630.55 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

पुढील एका वर्षात पॉलीकॅब इंडिया स्टॉक 4,000 रुपये किंमत स्पर्श करू शकतो, असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. पॉलीकॅब इंडिया कंपनीचा स्टॉकने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 64.94 टक्के नफा कमावून दिला आहे. 2023 मध्ये या शेअरची किंमत 37.18 टक्के वाढली आहे.

मागील तीन वर्षांत पॉलीकॅब इंडिया लिमिटेड या वायर आणि केबल बनवणाऱ्या कंपनीचे शेअर्स 350 टक्के मजबूत झाले आहेत. मागील पाच वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 454.46 टक्के परतावा कमावून दिला आहे. या काळात शेअरची किंमत 640 रुपयेवरून वाढून सध्याच्या किंमतीवर पोहोचली आहे.

तांत्रिकदृष्ट्या पॉलीकॅब इंडिया लिमिटेड स्टॉक रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स इंडेक्सवर 50.9 अंकावर ट्रेड करत आहे. यावरून कळते की स्टॉक जास्त सेल झाला नाही किंवा जास्त खरेदी झालेला नाही. पॉलीकॅब इंडिया कंपनीचा एक वर्षाचा बीटा 0.7 आहे, जो अल्पकालीन अस्थिरतेचे निर्देशक आहे. 21 जून 2023 रोजी पॉलीकॅब इंडिया लिमिटेड कंपनीने आपल्या 10 रुपये दर्शनी मूल्याच्या प्रत्येक इक्विटी शेअरवर 20 रुपये लाभांश वाटप केला होता.

पॉलीकॅब इंडिया लिमिटेड ही भारतातील सर्वात मोठी वायर आणि केबल निर्माता कंपनी मानली जाते. FY2022 मध्ये 122 अब्ज रुपयेच्या एकत्रित उलाढालीसह पॉलीकॅब इंडिया लिमिटेड कंपनी भारतातील सर्वात वेगाने वाढणारी FMEG कंपनी बनली आहे. 23 उत्पादन सुविधा केंद्र, 15 हून अधिक कार्यालये आणि 25 हून अधिक गोदामांद्वारे पॉलीकॅब इंडिया लिमिटेड कंपनी आपला व्यवसाय चालवत आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Polycab Share Price today on 29 June 2023.

हॅशटॅग्स

Polycab Share Price(7)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x