23 November 2024 4:19 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Pension Life Certificate | जीवन प्रमाणपत्र जमा करण्यासाठी केवळ 7 दिवस बाकी, घाई करा नाहीतर पेन्शन विसरा - Marathi News Suzlon Vs BHEL Share Price | सुझलॉन आणि BHEL सहित या 8 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, मिळेल 67% पर्यंत परतावा - NSE: SUZLON Vodafone Idea Share Price | व्होडाफोन आयडिया कंपनीबाबत मोठी अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम - NSE: IDEA Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, असं मिळेल रेल्वेचं सर्वांत स्वस्त तिकीट, ठाऊक आहे हा फंडा My EPF Money | EPF मधून पैसे काढण्याची सर्वांत सोपी पद्धत इथे पहा, खात्यातील जमा शिल्लक तपासून पैसे काढू शकता Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल Mutual Fund SIP | श्रीमंतीचा महामार्ग, 'या' भन्नाट फॉर्म्युल्याचा वापर करा, तुमचा मुलगा देखील 21 व्या वर्षी बनेल करोडपती
x

Lok Sabha Election | आगामी ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीसोबतच लोकसभा निवडणूक होणार? काय आहे कारण? महत्वाच्या घडामोडी

Lok Sabha Election

Lok Sabha Election | नुकत्याच पार पडलेल्या आणि भाजपची सत्ता असलेल्या कर्नाटक आणि हिमाचल प्रदेश या दोन महत्वाच्या राज्यात काँग्रेसने भाजपचा दारुण पराभव करत बहुमताने सत्ता खेचून आणली आहे. तसेच राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेने लोकांच्या मनावर मोठा सकाराम्तक परिणाम केल्याने राहुल गांधी यांना देशभर मान्यता मिळत आहे. एकूण समाज माध्यमांवरील नरेंद्र मोदी आणि भाजपच्या अधिकृत पेजेसवरील कोणत्याही विषयाशी संबंधित पोस्टवर ९० टक्के लोकं नकारात्मक प्रतिक्रिया देत आहेत. त्यामुळे लोकांचा एकूण कल समजून येतोय. तसेच याच पेजेसवरून राहुल गांधींविरोधात कोणतीही पोस्ट केल्यास त्यावर काँग्रेस नव्हे तर सामान्य नेटीझसन्स भाजपला झोडपून काढताना दिसत असल्याने वारे कुठे हे भाजपच्या धुरंदरांना स्पष्ट दिसू लागलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपची वाहवाह करणाऱ्या ठराविक टीव्ही वृत्तवाहिन्यांवरील TRP प्रचंड घसरला असून त्याचा थेट परिणाम या वृत्तवाहिन्यांच्या आर्थिक सिस्टमवर पडला आहे. त्यामुळे जनतेचा एकूण कल समजून येतं असताना दुसरीकडे २०१४ पूर्वी जशा घटना नरेंद्र मोदी यांच्या बाबतीत घडत होत्या तसाच सकारात्मक घटनाक्रम आता राहुल गांधी यांच्या बाजूने होऊ लागल्याने भाजप आणि आरएसएसची चिंता प्रचंड वाढली आहे.

त्याचे तीव्र परिणाम आगामी ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या निकालात उमटतील याची भाजपाला अधिक चिंता आहे. परिणामी २०२४ मधील लोकसभा निवडणुकीचा मार्ग खूप कठीण होईल असं भाजपच्या वरिष्ठांना वाटत आहे. त्याचा दुसरा परिणाम असा होईल की लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसचा आत्मविश्वास द्विगुणित होईल आणि काँग्रेसची आर्थिक शक्ती देखील वाढेल. याच्या नेमकं उलट भाजपच्या बाबतीत घडेल. त्यामुळे पावसाळा संपताच म्हणजे डिसेंबरपूर्वी लोकसभा भंग करून ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीबरोबरच लोकसभा निवडणुकीची भाजपने तयारी केल्याचं खात्रीलायक वृत्त आहे. देशभरातील प्रशासनासोबत निवडणूक आयोगाच्या बैठका अचानक वाढल्या आहेत. त्यामुळे प्रशासकीय तयारी सुद्धा सुरु झाली आहे आणि विशेष म्हणजे ज्या राज्यात विधानसभा निवडणुका नाहीत तेथे देखील प्रशासनकीय आढावा बैठक वाढल्या आहेत. भाजपने सर्वकाही बाजूला ठेऊन मोर्चबांधणी सुरु केली आहे.

त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी विरोधक एकत्र येत असताना सत्ताधारी भारतीय जनता पक्षानेही कोणतीही कसर सोडली नाही. पाटण्यातील विरोधकांच्या ऐक्याबरोबरच तळागाळापर्यंत स्वत:ला बळकट करण्यावर भाजप अधिक भर देत आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि सर्व आघाड्यांचे अध्यक्ष शनिवारी पक्षाच्या प्रादेशिक नेत्यांसोबत होणाऱ्या महत्त्वाच्या बैठकांवर चर्चा करतील, अशी माहिती सूत्रांनी दिली. यावेळी आगामी लोकसभा निवडणुकीचा आराखडा तयार करण्यासाठी पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे.

दिल्लीतील भाजप मुख्यालयात शनिवारी होणाऱ्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा असतील. सकाळी सरचिटणीसांची बैठक होणार आहे, तर सायंकाळी आघाडीच्या अध्यक्षांची बैठक होणार आहे. पक्षाच्या सूत्रांनी एएनआयला सांगितले की, या बैठकीत कोणत्या विषयांवर चर्चा करावी आणि पुढील बैठक यशस्वी कशी करावी यावर चर्चा होईल.

३० मे ते ३० जून या महिनाभर चालणाऱ्या जनसंपर्क मोहिमेचा ही भाजप आढावा घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शनिवारी सकाळी होणाऱ्या बैठकीत सर्व सरचिटणीस आपापल्या क्षेत्राचा किंवा प्रभारी असलेल्या ठिकाणचा प्रगती अहवाल सादर करतील. महाजनसंपर्क अभियानाच्या अभिप्रायावरही चर्चा होणार आहे. सायंकाळी भाजपच्या सर्व आघाड्या आपली बाजू मांडतील आणि जनसंपर्क अभियान आणि इतर कार्यक्रमांच्या अभिप्रायांवर चर्चा करतील.

भाजप पहिल्यांदाच ६, ७ आणि ८ जुलै रोजी पूर्व, उत्तर आणि दक्षिण या तीन भागात मोर्चाच्या सर्व सरचिटणीस आणि अध्यक्षांच्या प्रदेशनिहाय बैठका घेणार आहे. बिहार, झारखंड आणि ओडिशाव्यतिरिक्त पश्चिम बंगाल, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम, नागालँड, मणिपूर, मिझोराम, मेघालय, त्रिपुरा आणि आसाम. पूर्व विभागाची बैठक ६ जुलै रोजी गुवाहाटी येथे होणार आहे. उत्तरेकडील प्रदेशांमध्ये हिमाचल प्रदेश, पंजाब, चंदीगड, राजस्थान, जम्मू-काश्मीर, लडाख, गुजरात, दमण आणि दीव-दादर नगर हवेली, मध्य प्रदेश, छत्तीसगड, उत्तराखंड, दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेश या राज्यांचा समावेश आहे.

अखेर ८ जुलै रोजी हैदराबाद येथे दक्षिण भागातील नेत्यांसोबत बैठक होणार आहे. या भागात केरळ, तामिळनाडू, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, मुंबई, गोवा, अंदमान निकोबार, पुद्दुचेरी आणि लक्षद्वीप यांचा समावेश आहे. पूर्व भागातील नेत्यांसोबत ६ जुलै रोजी, उत्तर भागासाठी ७ जुलै रोजी आणि दक्षिण भागासाठी ८ जुलै रोजी बैठक होणार आहे. त्यांच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा असतील. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका आणि लोकसभा निवडणुकांसाठी भाजपने कंबर कसली आहे. कारण मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणा या ४ राज्यांपैकी मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड मध्ये काँग्रेसच्या विजयाचे सर्व्हे झाले असून तेलंगणात तर भाजप स्पर्धेतही नसून येथे BRS आणि काँग्रेस असा थेट सामना होणार आहे. तर मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड मध्ये काँग्रेस आणि भाजप हेच प्रमुख पक्ष समोरासमोर असतील.

News Title : Lok Sabha Election May be in 2023 check details on 30 June 2023.

हॅशटॅग्स

#Lok Sabha Election(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x