23 November 2024 8:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Tata Technologies IPO | ही संधी पुन्हा मिळणे नाही! टाटा टेक्नॉलॉजी IPO ची तारीख आली, IPO तपशील जाणून गुंतवणूकीचा निर्णय घ्या

Tata Technologies IPO

Tata Technologies IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून भरघोस कमाई करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी चालून आली आहे. तब्बल 19 वर्षांनंतर टाटा समूहातील कंपनीचा IPO बाजारात येणार आहे. या कंपनीचे नाव आहे, टाटा टेक्नॉलॉजी. जुलै 2004 मध्ये TCS नंतर टाटा समूहाच्या कोणत्याही कंपनीचा IPO लाँच झाला नव्हता. (Tata Technologies Share Price)

आता तुम्हाला टाटा कंपनीच्या IPO मध्ये गुंतवणूक करण्याची संधी मिळणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचा IPO 11 जुलै 2023 रोजी गुंतवणुकीसाठी खुला केला जाणार आहे. याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही. मागील आठवड्यात SEBI ने टाटा टेक्नॉलॉजी IPO ला मंजुरी दिली होती. (Tata Technologies IPO GMP Today)

टाटा टेक्नॉलॉजी GMP

TopShares फर्मच्या अहवालानुसार टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या IPO शेअरची किंमत ग्रे मार्केटमध्ये 76 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहे. 28 जून 2023 रोजी हा IPO स्टॉक ग्रे मार्केटमध्ये 74 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. IPO च्या अधिकृत तारखेच्या आधी टाटा टेक्नॉलॉजी स्टॉकच्या GMP मध्ये जबरदस्त उसळी पाहायला मिळत आहे. टाटा टेक्नॉलॉजी या कंपनीचा IPO टाट ऑफर फॉर सेल अंतर्गत खुला केला जाणार आहे.

कंपनीचे विद्यमान भागधारक या IPO द्वारे 9.57 कोटी शेअर्स खुल्या बाजारात विकणार आहेत. याचे प्रमाण पेड अप कॅपिटल च्या तुलनेत 23.60 टक्के आहे. टाटा टेक्नॉलॉजी IPO द्वारे टाटा मोटर्स कंपनी देखील आपले 20 टक्के भाग भांडवल खुल्या बाजारात विकणार आहे.

टाटा टेक्नॉलॉजी कंपनीचे 74.69 टक्के भाग भांडवल टाटा मोटर्सने धारण केले आहेत. टाटा मोटर्स व्यतिरिक्त, अल्फा टीसी होल्डिंग्ज देखील 97.16 लक्ष शेअर्स म्हणजेच 2.4 टक्के भाग भांडवल विकणार आहे. तर टाटा कॅपिटल 48.58 लाख शेअर्स म्हणजेच 1.2 टक्के भाग भांडवल विकणार आहे.

टाटा टेक्नॉलॉजी कंपनीमध्ये अल्फा टीसी होल्डिंग फर्मने 7.26 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. तर टाटा कॅपिटल ग्रोथ फंडने 3.63 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. Tata Technologies IPO मध्ये पात्र संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी 50 टक्के भाग भांडवल राखीव ठेवले जाणार आहे.

किरकोळ गुंतवणूकदारांसाठी 35 टक्के भाग भांडवल राखीव ठेवेले जाणार आहे. आणि 15 टक्के भाग भांडवल इतरांसाठी राखीव ठेवले जातील. मीडिया रिपोर्टनुसार टाटा टेक्नॉलॉजी कंपनीच्या आयपीओचा आकार 4000 कोटी रुपये असेल.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Technologies IPO details on 01 July 2023.

हॅशटॅग्स

#Tata Technologies IPO(35)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x