22 November 2024 9:46 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: RVNL Samvardhana Motherson Share Price | मल्टिबॅगर संवर्धन मदरसन शेअर मालामाल करणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: MOTHERSON Penny Stocks | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी शेअर श्रीमंत करतोय, रोज अप्पर सर्किट हिट करतोय - BOM: 526839 GTL Infra Share Price | GTL इन्फ्रा सहित हे 3 पेनी शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा - NSE: GTLINFRA IPO GMP | IPO आला रे, पहिल्याच दिवशी मिळेल 109% परतावा, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, अशी संधी सोडू नका - GMP IPO TATA Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत महत्वाची अपडेट, शेअर प्राईसवर होणार परिणाम - NSE: TATAMOTORS Reliance Share Price | स्वस्तात खरेदीची संधी, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि BHEL सहित 9 शेअर्स 67% पर्यंत परतावा देतील - NSE: RELIANCE
x

फ्रान्समधील दंगलींवर योगी मॉडेलची फ्रान्समधून ट्विटने मागणी, CMO-गोदी मीडियाकडून प्रचार, ट्विट करणारा योगी भक्त 'नरेंद्र' नामक गुन्हेगार निघाला

Riots in France

Narendra Yadav | फ्रान्समध्ये गेल्या पाच दिवसांपासून सातत्याने हिंसाचार सुरू आहे. सर्व प्रयत्न करूनही परिस्थिती सुधारत नाही. दरम्यान, परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी फ्रान्समध्ये ‘योगी मॉडेल’ची मागणी जोर धरू लागली आहे. प्रोफेसर एन जॉन कॅम नावाच्या प्रोफाईल असलेल्या व्यक्तीने ट्विटरवर ही मागणी केली आहे.

विशेष म्हणजे यावर उत्तर प्रदेश सरकारने अधिकृत प्रतिक्रिया देत योगी आदित्यनाथ यांची पाठ थोपटण्याचा प्रकार केला आणि त्यानंतर लगेच भाजपसंबंधित गोदी मीडियाच्या टीव्ही वृत्तवाहिन्यांनी यावर योगी सरकारचा जयजयकार करण्यास सुरवात केली. परंतु, संबंधित ट्विटर अकाउंट फेक असल्याचं समोर आलं असून ते एका फसवणुकीच्या प्रकरणातील आरोपीचं आहे हे समोर आल्यानंतर गोदी मीडियाने बातम्या डिलीट करण्यास सुरुवात केली आहे. भाजपचा IT सेलसुद्धा नेहमीप्रमाणे तोंडघशी पडला आहे.

ट्विटरवर ही व्यक्ती स्वत:ला अँजिओग्राफी आणि अँजिओप्लास्टीमध्ये तज्ज्ञ असल्याचे सांगत आहे, परंतु सोशल मीडियावरील त्याची पोलखोल झाली असून संबंधित प्रोफाइल खरंतर नरेंद्र विक्रमादित्य यादव नावाच्या व्यक्तीचे आहे आणि त्याने फ्रान्समधील प्रसिद्ध व्यक्तीच्या नावाने फेक अकाउंट बनवून ते पेड वेरिफाइड करून घेतले आहे. या व्यक्तीला फसवणुकीच्या प्रकरणात हैदराबादमध्ये अटक करण्यात आली होती.

काय होतं ट्वीटमध्ये?
प्राध्यापक एन. जॉन कॅम यांनी ट्विट करत म्हटले आहे की, दंगलनियंत्रणासाठी आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी योगी आदित्यनाथ यांना फ्रान्सला पाठवा. ‘देवा, अवघ्या २४ तासांत ते कारवाई करतील आणि सर्व काही सुरळीत करतील. या ट्विटमध्ये योगी आदित्यनाथ यांनाही टॅग करण्यात आले होते. त्यानंतर या ट्विटला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यालयाकडूनही उत्तर देण्यात आले आहे. जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात जेव्हा दंगल होते, कायदा व सुव्यवस्था बिघडते, तेव्हा जग योगी मॉडेलची मागणी करते. याच मॉडेलच्या आधारे महाराजांनी उत्तर प्रदेशात कायदा व सुव्यवस्था प्रस्थापित केली आहे असं ट्विटमध्ये म्हटले आहे. यानंतर गोदी मीडियाच्या बातम्या जोर धरू लागल्या.

News Title : Riots in France demand for Yogi Model Tweeter Narendra Yadav check details on 01 June 2023.

हॅशटॅग्स

#Riots in France(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x