फडणवीस यांच्या निवासस्थानी अजित पवार आणि भाजप नेत्यांची बैठक, मुखमंत्री शिंदेंना निमंत्रणच नाही, शिंदे गट आज शक्तिप्रदर्शन करणार
NCP Political Crisis | अजित पवार यांनी रविवारी राष्ट्रवादीसोबत केलेल्या बंडखोरीनंतर सोमवारी महाराष्ट्रात चांगलीच खळबळ उडाली आहे. दरम्यान, अजित पवारांच्या भाजपसोबत येण्याने शिंदे आणि शिंदे समर्थकांचे राजकीय आयुष्य टांगणीला लागल्याने एकनाथ शिंदे यांनी आपल्या सर्व खासदार आणि आमदारांना शिवाजी पार्कवर बोलावून गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने शक्तिप्रदर्शन सुरु केल्याचं वृत्त आहे.
एकनाथ शिंदे शक्तिप्रदर्शन करणार असल्याचे मानले जात आहे. त्यांनी आपल्या सर्व आमदार आणि खासदारांना 3 वाजता उपस्थित राहण्यास सांगितले आहे. शिंदे हे स्व. आनंद दिघे यांना श्रद्धांजली अर्पण करतील आणि त्यानंतर त्यांच्या समर्थकांना संबोधित करतील. इतकंच नाही तर या कार्यक्रमानंतर ते आपल्या आमदार आणि खासदारांसोबत बैठकही घेऊ शकतात असं म्हटलं जातंय. सध्या शिंदे समर्थकांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली असून सर्व मंत्रिपद अजित पवार गट घेऊन गेल्याने शिंदे सर्मथकांवर राजभवनात फक्त टाळ्या वाजविण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता असं चित्र निर्माण झालं आहे.
शिंदे गटातील आमदारांचं निलंबन झाल्यावरही सरकार सुरक्षित
अजित पवार यांच्यासोबत ४० आमदार आल्यानंतर भाजपला आता आपले सरकार मजबूत झाल्याचे वाटत आहे. अशा परिस्थितीत एकनाथ शिंदे यांच्या शिवायही महाराष्ट्रात भाजपचे सरकार कायम राहू शकते. अजित पवार यांच्या प्रवेशानंतर एकनाथ शिंदे यांना त्यांच्या भवितव्याची भीती सतावत आहे. त्यामुळेच त्यांनी बैठक बोलावली असून, त्याकडे शक्तिप्रदर्शन म्हणून पाहिले जात आहे. एकनाथ शिंदे यांनी गेल्या वर्षी ४० आमदारांसह भाजप सरकारमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर स्थापन झालेल्या आघाडी सरकारचे प्रमुख झाले. हे आश्चर्यकारक होते कारण भाजप नेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार अशी चर्चा होती.
त्यावेळी शिवसेनेत फूट पाडण्यासाठी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करण्यात आले होते, असे जाणकारांचे मत आहे. हे उद्दिष्ट आता पूर्ण झाले असून त्यापेक्षा अधिक काही शक्य दिसत नसल्याने, भाजपने त्यांना सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या बहाण्याने मुख्यमंत्री पदावरून बाहेर करण्यासाठीच अजित पवार यांना तात्पुरत्या स्वरूपात उपमुख्यमंत्री केल्याचं वृत्त आहे. अशा परिस्थितीत दोनच शक्यता आहेत त्यापैकी एक म्हणजे भाजपने फडणवीसांना मुख्यमंत्री करणे आणि अजित पवारांना उपमुख्यमंत्रिपद देणे किंवा अजित पवार यांना मुख्यमंत्री पद देऊन स्वतः दिल्लीतील केंद्रीय मंत्रिपदावर जाणे असे होऊ शकते. याशिवाय एकनाथ शिंदे यांनाही हटवले जाऊ शकते. आगामी काळात महाराष्ट्रात मुख्यमंत्री बदलेल, असे शिवसेना उद्धव गटाच्या वतीने आधीच सांगण्यात आले आहे.
अजित पवारांची आणि फडणवीस यांची बैठक, शिंदेंना ठेवलं लांब
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी बैठक सुरू आहे. या बैठकीला एकनाथ शिंदे किंवा त्यांचा एकही समर्थक हजर नाही. पण भाजपचे अनेक नेते आणि अजित पवार उपस्थित आहेत. या बैठकीत मंत्रिपदांच्या विभागणीबाबत चर्चा झाल्याचे समजते. एकनाथ शिंदे यांच्यापेक्षा सरकारची धुरा देवेंद्र फडणवीस यांच्या हातात असल्याचे स्पष्ट झाले असून कोणाला कोणते मंत्रिपद द्यायचे याची तयारी ते करीत आहेत. अजित पवारांना आणण्याचे शिल्पकार म्हणून ही देवेंद्र फडणवीस स्वतःला पुढे करत असले तरी मोदी-शहांच्या जवळ जाऊ इच्छिणाऱ्या शिंदेंना बाजूला करण्याची तयारी सुरु झाल्याचं म्हटलं जातंय.
News Title : Ajit Pawar and Devendra Fadnavis meeting before confirming portfolio check details on 03 July 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Monthly Pension Money | फायद्याची सरकारी योजना, आता आयुष्यभरासाठी मिळेल 1 लाख रुपयांची पेन्शन - Marathi News
- Post Office Scheme | फक्त 100 रुपयांची बचत करून मिळेल लाखो रुपयांचा परतावा, पोस्टाची ही योजना बनवेल लखपती - Marathi News
- Credit Card | आता खराब सिबिल स्कोअर असेल तरी देखील मिळेल क्रेडिट कार्ड, कोण कोणते फायदे मिळतील पाहून घ्या - Marathi News
- Mutual Fund SIP | केवळ सरकारी किंवा EPFO पेन्शन भरोसे राहू नका, म्युच्युअल फंड योजना महिना 2.60 लाख रुपये पेन्शन देईल
- UPSC Requirement 2024 | UPSC परीक्षा न देता चांगल्या पगाराची नोकरी हवी आहे तर लगेच अर्ज करा, पहा शेवटची तारीख काय आहे
- Post Office Scheme | पोस्टाची जबरदस्त योजना, केवळ 100 रुपयांपासून सुरू करा गुंतवणूक, कमवाल लाखो रुपये - Marathi News
- Property Knowledge | नवीन मालमत्ता खरेदी करत आहात, थांबा या 5 गोष्टी आवर्जून वाचा, लाखो रुपये वाचतील - Marathi News
- Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरसाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY
- Sreejita Wedding | एकाच वर्षी केली 2 लग्न, बिग बॉस फेम अभिनेत्री पुन्हा अडकली लग्न बंधनात, डेस्टिनेशन वेडिंगचे फोटोज व्हायरल
- Salary Account Benefit | तुमचं सुद्धा सॅलरी अकाउंट आहे का, मग बऱ्याच सुविधा मिळतील फ्री, नक्की फायदा घ्या - Marathi News