24 November 2024 5:29 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Smart Investment | बचतीवर 5 कोटी रुपये परतावा हवा असल्यास 40x20x50 फॉर्म्युला शक्य करेल, टिप्स फॉलो करा - Marathi News Property Knowledge | वडिलांच्या मालमत्तेवर मुलींचा किती हक्क, 'या' परिस्थितीत मुली वडिलांकडे मालमत्ता मागू शकत नाहीत SJVN Share Price | मल्टिबॅगर SJVN शेअर रॉकेट स्पीडने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - NSE: SJVN Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पाडतोय हा मल्टिबॅगर शेअर, तब्बल 4300% परतावा दिला, फायद्याची अपडेट - BOM: 543620 IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, अशी संधी सोडू नका - GMP IPO Sarkari Schemes | गुंतवणुकीसाठी 3 फायद्याच्या सरकारी योजना, सरकार देईल 8.2% पर्यंत परतावा, माहिती जाणून घ्या - Marathi News SBI Online | सरकारी SBI बँकेची जबरदस्त योजना, 50,000 रुपयांची गुंतवणूक देईल 13 लाखांपर्यंत परतावा - Marathi News
x

खासगी वाहनं व दुकानांमध्ये ईव्हीएम सापडली; फेरफार होत असल्याचा संशय

BJP, Narendra Modi, Loksabha Election 2019

चंदौली : लोकसभा निवडणुकीचे निकाल येण्यास अवघे २ दिवस असताना ट्विटरवर ईव्हीएम मशीन्स एका ठिकाणाहून दुसरीकडे ठिकाणी भरून नेले जात असल्याचे व्हिडीओ व्हायरल झाल्याने खळबळ माजली आहे. या व्हिडीओंमध्ये EVM मशीन्स अनधिकृत ठिकाणाहून दुसरीकडे नेले जात असल्याचं स्पष्ट दिसत आहे. यापैकी काही मशीन्स स्थानिक दुकानात, तर काही खासगी गाडीत असल्याचं दिसत आहे.

तसेच असाच एक यूपीतील व्हिडीओ देखील व्हायरल झाला आहे ज्यामध्ये काहीजण ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन्स गाडीतून बाहेर काढून एका दुकानाच्या आतमध्ये नेत असल्याचं दिसत आहे. यूपीतील चंदौली येथील हा व्हिडीओ आहे.

अजून एक व्हिडीओ आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्याने शेअर केला आहे. या व्हिडीओत ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशीन्स एका कारमध्ये असल्याचं दिसत आहे. हा व्हिडीओ पंजाबमधील आहे. आपच्या महिला कार्यकर्त्याने यावरुन भारतीय जनता पक्षाला टार्गेट केलं आहे.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x