18 November 2024 8:20 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर चार्टवर मोठे संकेत, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक ब्रेकआऊट देणार का - NSE: RVNL NTPC Share Price | एनटीपीसी शेअरला 'आउटपरफॉर्म' रेटिंग, स्टॉक मालामाल करणार, यापूर्वी 218% परतावा दिला - NSE: NTPC EPFO Passbook | पगारदारांनो, टेन्शन फ्री रहा, EPF खात्यातून सहज ऑनलाईन पैसे काढता येतील, बॅलन्स चेक करून काढा पैसे HDFC Mutual Fund | SIP केवळ 3 हजारांची, मिळेल 5 करोडोंचा घसघशीत परतावा, पहा या म्युच्युअल फंडाची कमाल - Marathi News Credit Card Application | खराब सिबिल स्कोरमुळे बँक लोन आणि क्रेडिट कार्ड देण्यास नकार देतेय, काळजी नको, हे सोपं काम करा Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना, घसघशीत परताव्यासह मिळतील अनेक सुविधा, फायदा घ्या - Marathi News Pension Scheme | टेन्शन नको, ही सरकारी योजना महिना 1 लाख रुपये पेन्शन देईल, फायद्याची योजना लक्षत ठेवा - Marathi News
x

Bonus Shares | या कंपन्या फ्री बोनस शेअर्स वाटप करणार आहेत, लिस्ट सेव्ह करा, रेकॉर्ड तारीख पाहून फायदा घ्या

Bonus Shares

Bonus Shares | बोनस शेअर्स वाटप करणाऱ्या कंपनीच्या स्टॉकमध्ये गुंतवणूक करून फायदा घेणाऱ्या लोकांसाठी खुश खबर आहे. या आठवड्यात 3 कंपन्या स्टॉक मार्केटमध्ये एक्स-बोनस स्टॉक म्हणून ट्रेड करणार आहे. या कंपन्यानी आपल्या शेअर धारकांना मोफत बोनस शेअर्स वाटप करण्याची घोषणा केली आहे. या यादीत रोटो पप्स लिमिटेड, कान्साई नेरोलॅक, आणि भंसाली इंजिनीअरिंग कंपन्या सामील आहेत. चला तर मग जाणून घेऊ सविस्तर बोनस शेअर्सचे तपशील.

1) रोटो पंप्स लिमिटेड :

सेबीला दिलेल्या माहितीत या कंपनीने कळवले आहे की, कंपनी आपल्या विद्यमान शेअर धारकांना 1 शेअरवर 1 शेअर मोफत वाटप करणार आहे. या बोनस इश्यूची रेकॉर्ड तारीख म्हणून 8 जुलै 2023 हा दिवस जाहीर करण्यात आला आहे. शुक्रवार दिनांक 7 जुलै 2023 रोजी ही कंपनी एक्स-बोनस ट्रेड करेल. मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 0.32 टक्क्यांच्या वाढीसह 754.20 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 6 महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 69.12 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज मंगळवार दिनांक 4 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 0.78 टक्के घसरणीसह 780.00 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

2) कंसाई नेरोलॅक :

या कंपनीने ८ मे 2023 रोजी पर पडलेल्या संचालक मंडलच्या बैठकीत आपल्या शेअर धारकांना 2 शेअर्सवर 1 बोनस शेअर मोफत वाटप करण्याची घोषणा केली आहे. या कंपनीने 4 जुलै 2023 हा दिवस रेकॉर्ड डेट म्हणून निश्चित केला आहे. ज्या गुंतवणूकदारांचे नाव रेकॉर्ड बुकमध्ये असेल, त्यांना बोनस शेअरचा लाभ मिळेल. शुक्रवारी हा स्टॉक 456.75 रुपयेवर ट्रेड करत होता. तर आज मंगळवार दिनांक 4 जुलै 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 3.74 टक्के वाढीसह 319.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

3) भंसाली इंजिनीअरिंग :

सेबीला दिलेल्या माहितीत या कंपनीने कळवले आहे की, कंपनीने आपल्या विद्यमान पात्र गुंतवणूकदारांना प्रत्येक शेअरवर 2 बोनस शेअर्स मोफत वाटप करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने बोनस शेअर्सची रेकॉर्ड तारीख म्हणून 2 जुलै 2023 हा दिवस निश्चित केला होता. मागील शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 134.45 रुपयेवर ट्रेड करत होते. तर आज मंगळवार दिनांक 4 जुलै 2023 रोजी हा स्टॉक 0.92 टक्के घसरणीसह 128.85 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | List of Bonus Shares to shareholders check details on 04 July 2023.

हॅशटॅग्स

Bonus shares(93)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x