19 November 2024 3:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPF Pension Money | नोकरदारांनो, तुमच्या 60 ते 70 हजाराच्या पगारावर किती EPF पेन्शन मिळणार, संपूर्ण माहितीचा आढावा घ्या Salary Account | पगारदारांनो, केवळ झिरो बॅलन्स नाही तर, सॅलरी अकाउंटवर मिळतात या 5 सुविधा, जाणून आश्चर्यचकित व्हाल SBI Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 5 म्युच्युअल फंड योजना, 10 हजारांचे होतील करोडो रुपये, इथे पैशाने पैसा वाढवा - Marathi News Trident Share Price | 35 रुपयाच्या शेअरची कमाल, दिला 2300 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, फायदा घ्या - NSE: TECHLABS Yes Bank Share Price | येस बँकबाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सकारात्मक परिणाम होणार - NSE: RVNL IRFC Share Price | IRFC शेअर फोकसमध्ये, मल्टिबॅगर शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC
x

Shilpa Medicare Share Price | शिल्पा मेडिकेअर कंपनीने राइट्स इश्यू जाहीर केला, शेअरने घेतली उसळी, गुंतवणूकीपूर्वी तपशील वाचा

Shilpa Medicare Share Price

Shilpa Medicare Share Price | सध्या जर तुम्ही झटपट पैसे वाढवणाऱ्या स्टॉकच्या शोधत असाल तर शिल्पा मेडिकेअर कंपनीच्या शेअर्सवर लक्ष ठेवा. मागील शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 15.74 टक्क्यांच्या वाढीसह 285 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. आता या कंपनीने राइट्स इश्यू जारी करण्याची घोषणा केली आहे.

या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 438 रुपये होती. 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 222.60 रुपये होती. शिल्पा मेडिकेअर कंपनीचे बाजार भांडवल 2,469.95 कोटी रुपये आहे. आज मंगळवार दिनांक 4 जुलै 2023 रोजी शिल्पा मेडिकेअर कंपनीचे शेअर्स 5.64 टक्के वाढीसह 304.55 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

शिल्पा मेडिकेअर राइट्स इश्यू :

शिल्पा मेडिकेअर कंपनीने नुकताच पार पडलेल्या संचालक मंडळाचा बैठकीत राइट्स इश्यू जारी करण्याची घोषणा केली आहे. यामुळे शुक्रवारी शिल्पा मेडिकेअर कंपनीचे शेअर्स तेजीत धावत होते. शिल्पा मेडिकेअर कॉम्लनी सेबीला दिलेल्या माहिती म्हंटले आहे की, संचालक मंडळाने आपल्या विद्यमान शेअर धारकांना 325 कोटी रुपयेचे राइट्स इश्यू जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या संचालक मंडळाने राइट्स इश्यूच्या अटी व शर्ती ठरवण्यासाठी एक राइट्स इश्यू कमिटी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

स्टॉकची कामगिरी :

मागील 1 महिन्यात शिल्पा मेडिकेअर कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 32.82 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील सहा महिन्यांत शिल्पा मेडिकेअर कंपनीच्या शेअरने लोकाना 7.82 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील एका वर्षभरात शिल्पा मेडिकेअर कंपनीच्या शेअर्सने लोकांचे 23.54 टक्के नुकसान केले आहे. मागील दहा वर्षात या कंपनीच्या शेअरने लोकांना 218 टक्के परतावा मिळवून दिला आहे. या काळात शेअरची किंमत 91 रुपयेवरून वाढून 289.90 रुपयेवर पोहचली आहे.

कंपनी बद्दल थोडक्यात :

शिल्पा मेडिकेअर लिमिटेड ही भारतीय फार्मास्युटिकल कंपनी सक्रिय फार्मास्युटिकल घटक आणि तयार डोस फॉर्मच्या विकास, उत्पादन आणि विपणन कार्यात गुंतलेली आहे. ही कंपनी जगभरात 65 पेक्षा जास्त देशामध्ये निर्यात करते. कंपनीची व्यापारी स्थिती चांगली आहे. शिल्पा मेडिकेअर कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2,469.95 कोटी रुपये आहे. आज या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत होते. तज्ञांनी राइट्स इश्यूच्या पार्श्वभूमीवर या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Shilpa Medicare Share Price today on 04 July 2023.

हॅशटॅग्स

Shilpa Medicare Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x