23 November 2024 4:43 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

कर्नाटकात भाजपसोबत लोकसभा निवडणुकीची युतीची चर्चा सुरु होताच कुमारस्वामी यांच्याकडून काँग्रेस विरोधी पुड्या सोडायला सुरुवात

JDS Kumarswami

JDS Kumarswami | लोकसभा निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक आहेत. पुढील वर्षी एप्रिल-मे महिन्यात सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. त्यापूर्वी एकीकडे विरोधकांच्या ऐक्याबाबत बैठका होत असताना दुसरीकडे सत्ताधारी भाजपही आपापल्या परीने विविध राज्यांमध्ये रणनीती आखत आहे. महाराष्ट्रात गेल्या वर्षी एकनाथ शिंदे यांच्यासोबत सरकार स्थापन केलेल्या भाजपने आता अजित पवारांना आपल्या गोटात घेतले आहे. याशिवाय बिहारमध्येही जीतनराम मांझी, चिराग पासवान, उपेंद्र कुशवाहा आणि साहनी यांच्यासारख्या नेत्यांसोबत चर्चा सुरु आहेत. एनडीएमध्ये मोठे पक्ष नसल्याने भाजप आता इतर छोट्या पक्षांसोबत चर्चा करत असताना कर्नाटक मध्येही अत्यंत कमकुवत झालेल्या कुमारस्वामी यांच्या जेडीएस पक्षासोबत चर्चा करत आहेत.

कर्नाटकातील भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांचे वक्तव्यातून याची माहिती पुढे आली आहे. कर्नाटकात लोकसभा निवडणुकीसाठी जेडीएस आणि भाजप एकत्र येऊ शकतात, अशी चर्चा आहे. विधानसभा निवडणुकीत दोन्ही पक्ष स्वतंत्र लढले, त्यात काँग्रेस बहुमताने विजयी झाली आणि भाजप दुसऱ्या क्रमांकावर राहिला. मात्र जेडीएसने आतापर्यंतची सर्वात खराब कामगिरी केली आहे. त्यामुळे काँग्रेसला आव्हान देता यावे, यासाठी राज्यात एकत्र निवडणूक लढविणे ही भाजप आणि जेडीएसची गरज झाली आहे. तसेच आता जेडीएस अत्यंत कमकुवत झाल्याने जेडीएसला आता भाजपसोबत लोकसभा लढवण्याची इच्छा आहे असं भाजपच्या गोटातूनही स्थानिक वृत्तवाहिन्यांनी दिली आहे.

कुमारस्वामी काय म्हणाले?
जेडीएस नेते एचडी कुमारस्वामी म्हणाले की, मला कोणाचेही नाव घ्यायचे नाही. पण काहीही शक्य आहे. त्यासाठी जास्त वेळ लागणार नाही. या वर्षाच्या अखेरीस किंवा लोकसभा निवडणुकीनंतर काहीतरी घडण्याची शक्यता आहे. त्यासाठी वाट पाहावी लागणार आहे. त्याला उत्तर देताना येडियुरप्पा म्हणाले की, कुमारस्वामी यांनी जे काही म्हटले आहे ते पूर्णपणे बरोबर आहे. मी त्यांच्या मुद्द्याचे समर्थन करतो. कुमारस्वामी आणि आम्ही एकत्र निवडणूक लढवू शकतो. विशेष म्हणजे कर्नाटकात भाजप आणि जेडीएसने यापूर्वीच युती केली आहे.

भाजपसोबत चर्चा सुरु होताच काँग्रेस विरोधी पुड्या सोडायला सुरुवात
महाराष्ट्र राज्यामध्ये जी परिस्थिती निर्माण झाली आहे तशीच परिस्थिती आता कर्नाटकमध्ये व्हायला फार वेळ लागणार नाही, काँग्रेसचे सरकार वर्षभरात पडेल. अजित पवार कोण असतील हे मी इथे सांगणार नाही, पण ते लवकरच होणार असल्याचं दावा कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि जेडीएस नेते एचडी कुमारस्वामी यांनी केला आहे.

इतर राज्यातही छोट्या पक्षांसोबत चर्चा सुरु
दरम्यान, यूपी, पंजाब आणि आंध्र प्रदेशबाबतही अटकळ बांधली जात आहे. उत्तर प्रदेशात जयंत चौधरी यांना एकत्र आणण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. याशिवाय आंध्रमध्ये टीडीपीसोबत युती होऊ शकते. इतकंच नाही तर दीर्घकाळ एनडीएचा भाग असलेला अकाली दल पुन्हा एकदा भाजपशी मैत्री करू शकतो. असे संकेत दोन्ही पक्षांनी दिले आहेत. अशा तऱ्हेने निवडणुकीपूर्वी भाजप देशभरात एनडीएचा विस्तार करण्यात गुंतला आहे.

News Title : JDS Kumarswami in meeting with BJP check details on 04 July 2023.

हॅशटॅग्स

#JDS Kumarswami(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x