19 November 2024 1:01 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPF Pension Money | नोकरदारांनो, तुमच्या 60 ते 70 हजाराच्या पगारावर किती EPF पेन्शन मिळणार, संपूर्ण माहितीचा आढावा घ्या Salary Account | पगारदारांनो, केवळ झिरो बॅलन्स नाही तर, सॅलरी अकाउंटवर मिळतात या 5 सुविधा, जाणून आश्चर्यचकित व्हाल SBI Mutual Fund | श्रीमंत करणाऱ्या 5 म्युच्युअल फंड योजना, 10 हजारांचे होतील करोडो रुपये, इथे पैशाने पैसा वाढवा - Marathi News Trident Share Price | 35 रुपयाच्या शेअरची कमाल, दिला 2300 टक्क्यांचा मल्टिबॅगर परतावा, फायदा घ्या - NSE: TECHLABS Yes Bank Share Price | येस बँकबाबत महत्वाची अपडेट, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK RVNL Share Price | RVNL कंपनीबाबत फायद्याची अपडेट, शेअर प्राईसवर सकारात्मक परिणाम होणार - NSE: RVNL IRFC Share Price | IRFC शेअर फोकसमध्ये, मल्टिबॅगर शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा का - NSE: IRFC
x

Wipro Shares Buyback | विप्रो बायबॅक योजना पूर्ण झाली, गुंतवणूकदारांना शेअर विक्रीवर किती परतावा मिळाला?

Wipro Shares Buyback

Wipro Shares Buyback | भारतातील आयटी क्षेत्रातील दिग्गज कंपनी विप्रोने 12 हजार कोटी रुपयेची बायबँक योजना पूर्ण केल्याची माहिती दिली आहे. या योजने अंतर्गत किरकोळ गुंतवणूकदारांचे स्वीकृती प्रमाण 77.40 टक्के नोंदवले गेले आहे. याचा अर्थ विप्रो कपनीने किरकोळ शेअर्स गुंतवणूकदारांकडून ऑफर केलेल्या 77.40 टक्के शेअर्सची परत खरेदी केली आहे. हे प्रमाण कंपनीच्या मागील बाय बकच्या ट्रॅक रेकॉर्ड एवढेच आहे.

मागील एकूण चार बायबॅकमध्ये किरकोळ गुंतवणुकदारांचे ऑफर प्रमाण 50 ते 100 टक्क्यांच्या दरम्यान राहिले आहेत. आज बुधवार दिनांक 5 जुलै 2023 रोजी विप्रो कंपनीचे शेअर्स 0.53 टक्के घसरणीसह 393.85 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये विप्रो कंपनीचे शेअर्स 1.15 टक्क्यांच्या वाढीसह 396.10 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. विप्रो कंपनीने बायबॅक योजना जाहीर करून आपले 26.96 कोटी शेअर्स बाजारातून परत विकत घेण्याची योजना जाहीर केली होती. हे प्रमाणत कंपनीच्या एकूण भाग भांडवलाच्या 4.91 टक्के आहे.

या बायबॅक साठी कंपनीने प्रति शेअर 445 रुपये किंमत जाहीर केली होती. त्यानुसार या बायबॅकचा आकार 12 हजार कोटी रुपये होता. आणि रेकॉर्ड तारीख 16 जून 2023 होती. 30 जून रोजी 2023 रोजी विप्रो कंपनीने आपला बायबॅक पूर्ण केला. 15 टक्के बायबॅक कोटा किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात आला होता. रेकॉर्ड तारखेला विप्रो कंपनीचे शेअर्स 381.30 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. म्हणून गुंतवणूकदारांना फक्त 16.7 टक्के नफा मिळाला.

विप्रो कंपनीचे शेअर्स मागील एका वर्षात 5.34 टक्क्यानी कमजोर झाले आहेत. कंपनीच्या बायबॅक योजनेने गुंतवणूकदारांना अवघ्या 16 टक्के नफा कमावून दिला आहे. ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसनल फायनान्शिअल सर्व्हिसेसने विप्रो स्टॉकवर तटस्थ रेटिंग देऊन शेअरची लक्ष किंमत 360 रुपये जाहीर केली होती. ही लक्ष किंमत सध्याच्या किंमत पातळीपेक्षा कमीआहे . ब्रोकरेज फर्मचे म्हणणे आहे की, जर विप्रो कंपनीने मजबूत धोरण राबवले आणि स्टॉक पुन्हा रुळावर येऊ शकतो, असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Wipro Shares Buyback has been completed check details on 05 July 2023.

हॅशटॅग्स

Wipro Shares Buyback(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x