25 November 2024 7:11 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Ashok Leyland Share Price | अशोक लेलँड शेअरमध्ये तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ASHOKLEY Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, कन्फर्म तिकीट कॅन्सल झाल्यानंतर किती चार्जेस द्यावे लागतात - Marathi News IRB Infra Share Price | IRB इन्फ्रा शेअर फोकसमध्ये, तुफान तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून 'BUY' रेजिंग - NSE: IRB SJVN Share Price | SJVN कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SJVN Mutual Fund SIP | SIP चा पैसा वसूल फॉर्म्युला, 7-5-3-1 रुलने होईल 10 कोटींची कमाई, सोपी ट्रिक समजून घ्या - Marathi News Ration Card | रेशन कार्ड लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; केवळ 450 रुपयांत सिलेंडर मिळणार, पहा कसं - Marathi News BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: BEL
x

BJP Maharashtra Politics | भाजपच्या अंतर्गत सर्वेक्षणानंतर NCP फोडण्याची योजना आखली? शिंदेंमुळे भाजपाला फटका बसण्याचे होते संकेत

BJP Maharashtra Politics

BJP Maharashtra Politics | शिवसेना फुटीनंतर महाराष्ट्रातील राजकीय नाट्य अजूनही सुरूच आहे. आता शरद पवार यांनी मुंबई सोडून नवी दिल्लीत पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक बोलावली आहे, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव आणि चिन्ह ताब्यात घेण्यासाठी अजित पवार निवडणूक आयोगात गेले आहेत. तत्पूर्वी, अंतर्गत सर्वेक्षणाच्या निकालातून भाजपने धडा घेत राष्ट्रवादीत फूट पाडल्याचे वृत्त आहे.

भाजपच्या सूत्रांच्या हवाल्याने वृत्तात म्हटले आहे की, भाजपने काही दिवसांपूर्वी एका खासगी कंपनीच्या सहकार्याने महाराष्ट्रात एक सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणात एकनाथ शिंदे यांच्यासोबत सरकार स्थापन केल्यानंतर भाजपची स्थिती काय आहे, आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला किती जागा मिळण्याची शक्यता आहे, जनतेत पक्षाची प्रतिमा काय आहे, याबाबत मते गोळा करण्यात आली होती.

भाजपची व्होट बँक घसरण्याचा धोका

शिंदे यांच्याशी युती केल्याने भाजपचे मोठे नुकसान होईल, असे संकेत सर्वेक्षणात समोर आले होते. एवढेच नव्हे तर शिंदे यांच्याशी युती केल्यास भाजपच्या मतांची टक्केवारी सुमारे १.७ टक्क्यांनी कमी होईल, असा अंदाज या सर्वेक्षणात व्यक्त करण्यात आला होता. याशिवाय आगामी लोकसभा निवडणुकीत शिंदे गट आणि भाजप एकत्र लढल्यास लोकसभेच्या अनेक जागांवर पराभव होईल, असे संकेत मिळेल होते, तर सध्या भाजपचे २३ खासदार आहेत.

2019 लोकसभा निवडणुकीची स्थिती

महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा आहेत. 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपला 23 तर मित्रपक्ष शिवसेनेला 18 जागा मिळाल्या होत्या. म्हणजेच एनडीएला ४८ पैकी एकूण ४१ जागा मिळाल्या होत्या, तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आघाडीला केवळ ५ जागा मिळाल्या होत्या. एक जागा ओवेसी यांचा पक्ष एआयएमआयएमने तर एक जागा अपक्षाने जिंकली होती. शिंदे यांच्याशी युती केल्यास एनडीएला पूर्वीपेक्षा जास्त जागा मिळतील, अशी भाजपला आशा होती, पण या सर्वेक्षणामुळे त्यांच्या आशा धुळीस मिळताना दिसल्या होत्या.

लोकसभेत महाविकास आघाडीला ३५ जागा मिळणे अपेक्षित

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना लोकसभेच्या १५ जागा जिंकेल, असा अंदाज भाजपच्या त्या सर्वेक्षणात वर्तवण्यात आला आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र निवडणूक लढवल्यास महाविकास आघाडीला ४८ पैकी ३५ जागा मिळतील, असे सर्वेक्षणात दाखवण्यात आले होते. अशा तऱ्हेने शिंदे कार्डचे अपयश पाहून महाविकास आघाडीचा दुसरा बलाढ्य पक्ष असलेल्या राष्ट्रवादीला तोडण्याचा कट भाजपने रचला आणि त्यात यशही मिळवले.

शिंदे गटामुळे होणाऱ्या नुकसानाची अजित पवारांच्या गटाकडून भरपाईची योजना

वर्षभरापूर्वी शिवसेना पक्ष फोडून महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यात आले होते. शिंदे गटाशी झालेल्या करारामुळे झालेले नुकसान अजित पवार गटाला एनडीएत सामावून घेण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचे या वृत्तात म्हटले आहे. गेल्या रविवारी अजित पवार यांनी आपले काका शरद पवार यांच्याविरोधात बंड करून शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या आणखी आठ आमदारांना मंत्रिपद देण्यात आले आहे. महाराष्ट्रात पुढील वर्षी लोकसभा निवडणुकीबरोबरच विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत.

News Title : BJP Maharashtra Politics Crisis check details on 06 July 2023.

हॅशटॅग्स

#BJP Maharashtra Politics(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x