25 November 2024 6:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SJVN Share Price | SJVN कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SJVN Mutual Fund SIP | SIP चा पैसा वसूल फॉर्म्युला, 7-5-3-1 रुलने होईल 10 कोटींची कमाई, सोपी ट्रिक समजून घ्या - Marathi News Ration Card | रेशन कार्ड लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; केवळ 450 रुपयांत सिलेंडर मिळणार, पहा कसं - Marathi News BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअरमध्ये तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: BEL NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअरसाठी तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, 45% पर्यंत परतावा मिळेल - NSE: NBCC IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ - GMP IPO GTL Share Price | GTL पेनी शेअर तेजीने परतावा देणार, रिलायन्स कंपनी कनेक्शन, रॉकेट तेजीचे संकेत - BSE: 513337
x

Reliance Capital Share Price | रिलायन्स कॅपिटल शेअरमध्ये आजही अप्पर सर्किट, नेमकं कारण काय? स्वस्तात ट्रेड करणारा शेअर खरेदी करावा?

Reliance Capital Share Price

Reliance Capital Share Price | अनिल अंबानींच्या रिलायन्स कॅपिटल या दिवाळखोरी प्रक्रियेला तोंड देणाऱ्या कंपनीचे शेअर्स तेजीत धावत आहेत. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये रिलायन्स कॅपिटल कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 10.82 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील चार ट्रेडिंग सेशनपासून रिलायन्स कॅपिटल कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किट तोडत आहेत. (Reliance Capital Share)

29 मार्च 2023 रोजी रिलायन्स कॅपिटल कंपनीचे शेअर्स 7.60 रुपयेवर ट्रेड करत होते. 2018 मध्ये रिलायन्स कॅपिटल कंपनीचे शेअर्स 472 रुपयेवर ट्रेड करत होते. आता कंपनीची अधिग्रहण प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आज गुरूवार दिनांक 6 जुलै 2023 रोजी रिलायन्स कॅपिटल कंपनीचे शेअर्स 4.67 टक्के वाढीसह 11.20 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मागील आठवड्यात RCAP कंपनीला हिंदुजा समूहाचा भाग असलेल्या IndusInd International Holdings कंपनीने ताब्यात घेतले आहे. IndusInd International Holdings कंपनीने मांडलेल्या संकल्प योजनेच्या बाजूने कर्जदात्यानी मतदान केले होते. IndusInd International Holdings कंपनीने बोलीच्या दुसऱ्या फेरीत 9,661 कोटी रुपयेची सर्वात जास्त रोख ऑफर जाहीर केली होती. कर्जदात्यांच्या मतदानात 99 टक्के मते इंडसइंड इंटरनॅशनल होल्डिंग्सच्या बाजूने आले आहेत. कारण 9,661 कोटी रुपयेच्या रोख पेमेंटमधून रिलायन्स कॅपिटल कंपनीच्या कर्जदात्यांचे पैसे परतफेड केले जाणार आहे.

रिलायन्स कॅपिटल कंपनीच्या स्टॉकमध्ये तेजी येण्याचे दोन मुख्य कारण म्हणजे, हिंदुजा समूहाचा भाग असलेल्या इंडसइंड इंटरनॅशनल होल्डिंग्ज कंपनीने रिलायन्स कॅपिटल कंपनीच्या प्रस्तावित अधिग्रहण करण्यासाठी, वित्तपुरवठा करण्यासाठी आणि इंडसइंड बँकेतील हिस्सा वाढवण्यासाठी 1.5 अब्ज डॉलर्स भांडवल उभारण्याचा निर्णय घेतला आहे. IIHL ही कंपनी IndusInd बँकेच्या प्रवर्तक गटात सामील आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Reliance Capital Share Price today on 06 July 2023.

हॅशटॅग्स

#Reliance Capital Share Price(26)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x