6 November 2024 1:17 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
BEL Share Price | डिफेन्स कंपनीबाबत फायद्याची अपडेट, मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तुफान तेजीचे संकेत - NSE: BEL Penny Stocks | चिल्लर प्राईस पेनी शेअर श्रीमंत करणार, 30 दिवसात 103% परतावा दिला, स्टॉक खरेदीला गर्दी - Penny Stocks 2024 HUDCO Share Price | रॉकेट स्पीडने कमाई होणार, HUDCO शेअर फोकसमध्ये, मिळेल 65% परतावा - NSE: HUDCO RVNL Share Price | मल्टिबॅगर RVNL शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट आली, पुन्हा तेजीचे संकेत - NSE: RVNL SJVN Share Price | SJVN शेअर रॉकेट होणार, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SJVN Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीबाबत महत्वाची अपडेट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम- NSE: RELIANCE Tata Steel Share Price | टाटा स्टील सहित हे 3 मेटल शेअर्स 40% पर्यंत परतावा देणार, टार्गेट प्राईस नोट करा - TATASTEEL
x

आरआयसॅट-२बी या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

ISRO, PSLV, ISAT

श्रीहरीकोटा: आज सकाळी पहाटे ५.३० वाजता आरआयसॅट-२बी या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. त्याच्या उड्डाणाची पंचवीस तासांची उलटगिणती मंगळवारी पहाटे ४.३० वाजता सुरू झाली होती.

दरम्यान सदर उपग्रह सर्व प्रकारच्या हवामानात रडार इमेजिंगद्वारे निगराणी करणारा आहे. पीएसएलव्ही-सी४६ ची ही ४८वी मोहीम असून, सतीश धवन अंतराळ केंद्रातून हा ६१५ किलोग्रॅम वजनाचा उपग्रह प्रक्षेपण केल्यानंतर १५व्या मिनिटाला पृथ्वीच्या कक्षेत सोडला गेला.

हा उपग्रह गुप्त निगराणी, कृषी, वन व आपत्ती व्यवस्थापन यासारख्या क्षेत्रांत मोलाची मदत करणार आहे. इस्रोसाठी ही मोहीम अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, अशी माहिती इस्रोचे प्रमुख के. शिवन यांनी दिली. तसेच या मोहिमेबाबत जास्त माहिती देण्यास त्यांनी नकार दिला.

हॅशटॅग्स

#PSLV(13)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x