22 November 2024 4:43 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, मोठ्या कमाईची संधी सोडू नका, प्राईस बँड जाणून घ्या - GMP IPO Post Office TD | पोस्टाची ही योजना देते SBI पेक्षा अधिक व्याज; संपूर्ण डिटेल्स जाणून घ्या आणि मगच गुंतवणूक करा - Marathi News Railway Ticket Booking | रेल्वेचं तात्काळ तिकीट बुक करण्यास अडचण निर्माण होत आहे; थांबा, 'या' टिप्समुळे झटपट होईल काम Smart Investment | शेअर बाजारातील गुंतवणूक समजत नाही; चिंता नको, गुंतवणुकीचे 'हे' पर्याय देतात बक्कळ पैसे - Marathi News Aadhar ATM Facility | ATM मध्ये न जाता पैसे कसे काढायचे ठाऊक आहे का; पहा आधार ATM ची कमाल, घरबसल्या मिळतील पैसे Tata Power Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर पुन्हा रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: RELIANCE
x

Shinde Camp | एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्री पद पुढील महिन्यात जाणार? शिंदेंमुळे त्यांचे सर्व समर्थक निवडणुकीपूर्वी पूर्ण फसणार?

Shinde Camp

Shinde Camp | दिल्लीतून सध्या महाराष्ट्र संबंधित खूप वेगवान हालचाली आणि बैठक होतं असल्याचं वृत्त आहे. शरद पवारही सध्या दिल्लीत असल्याने अनेक गोष्टी भाजपच्या गोटातून बाहेर येतं आहेत. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, पुतण्या अजित पवार यांच्या बंडखोरीबद्दल शरद पवारांना माहिती नव्हती याची मला खात्री होती. अजित पवार आणि त्यांच्या पक्षाच्या आमदारांना सरकारमध्ये सामावून घेण्याचा निर्णय नवी दिल्लीत घेण्यात आल्याचे चव्हाण यांनी सांगितले. येत्या १० ते ११ ऑगस्ट या कालावधीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विधानसभेतून निलंबित केले जाण्याची शक्यता आहे. अशा तऱ्हेने शिंदे आणि त्यांचे १६ आमदार अपात्र ठरल्यास मुख्यमंत्रीपद अजित पवारांकडे जाईल असे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर कोण खूश?

अजित पवार यांना मुख्यामंत्रीपदाचं आश्वासन देण्यात आले आहे, हे आम्हाला माहित आहे. पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीसाठी शरद पवार दिल्लीत दाखल झाले असताना पृथ्वीराज चव्हाण यांनी हे वक्तव्य केले आहे. महाराष्ट्रातील अस्थिरतेवर आता कोण खूश आहे? राष्ट्रवादी खूश आहे की शिंदे गट सुखी? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित केला आहे.

बुधवारी दोन्ही गटांकडून कडवट वक्तव्य

उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर तीन दिवसांनी अजित पवार यांनी बुधवारी शक्तिप्रदर्शन करत आपले पत्ते उघडले. पक्षातील आमदारांच्या पाठिंब्याच्या बाबतीत आपण काका शरद पवार यांच्यापेक्षा पुढे असल्याचे त्यांनी सिद्ध केले. पवार विरुद्ध पवार या बलाढ्य लढतीमुळे महाराष्ट्रातील आणखी एका बड्या राजकीय घराण्यातील कटुता उघड झाली आहे. पुतण्याने काकांना थेट निवृत्त होण्यास सांगितले आहे, तर काकांनी पुतण्याला त्याचा फोटो वापरू नका असा इशाराच दिली आहे. बुधवारी दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

शिंदे गटात काय चालले आहे?

अजित पवार यांच्या सरकार प्रवेशामुळे एकनाथ शिंदे गट अस्वस्थ असून शिंदे गटाचे आमदार उद्धव गटात परतण्याच्या विचारात असल्याची चर्चा आहे. बुधवारी रात्री मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या समर्थक आमदारांची भेट घेऊन सरकारमध्ये कोणताही बदल होणार नाही, असे आश्वासन दिले. मात्र एकनाथ शिंदे हे स्वतःच्या समर्थकांना सुद्धा अनेक विषयात स्वतःच्या व्यतिगत राजकीय हेतूमुळे अंधारात ठेवत असल्याची चर्चा सुरु झाली आहे आणि विरोधकांना अनेक गोष्टी थेट दिल्लीतून समजल्याने विरोधक आनंदात असल्याचं म्हटलं जातंय.

गेल्या काही आठवड्यांपासून राष्ट्रवादीत फूट पडल्याच्या बातम्या येत होत्या, पण रविवारी अजित पवार १८ आमदारांसह राजभवनात पोहोचले आणि एकनाथ शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांच्यासोबत आणखी आठ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मात्र शिंदे गटाच्या केवळ टाळ्या वाजवणं याशिवाय काहीच पर्याय नव्हता हे पाहायला मिळालं. मुख्यमंत्री पद असूनही अगदी एकाही समर्थकाला ते त्याचवेळी मंत्रिपदाची शपथ देऊ शकले नाहीत हे त्यांच्या समर्थकांना अजूनही समजले हे विशेष म्हणावे लागेल आणि त्यांचं भाजप पुढे काहीच चालत नाही हे शिंदे समर्थकांना अजून न समजणं हे त्यांच्या राजकीय जीवनाच्या अंताकडे घेऊन जाण्यासारखं आहे असं राजकीय तज्ज्ञ सांगत आहेत.

News Title : Shinde Camp in Danger Zone check details on 06 July 2023.

हॅशटॅग्स

#Shinde Camp(9)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x