23 November 2024 5:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 2 रुपयाचा चिल्लर प्राईस पेनी शेअर मालामाल करतोय, कंपनीच्या निव्वळ विक्रीत 248% वाढ - Penny Stocks 2024 Vodafone Idea Share Price | पेनी शेअर 7 रुपयाच्या खाली घसरला, तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: IDEA Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करतोय, 20 दिवसात 138% परतावा दिला, संधी सोडू नका - BOM: 538537 Government Job | केवळ 10 वी पासवर मिळणार सरकारी नोकरी; सरकारी नोकरीची सुवर्णसंधी, मिळेल 2 लाख पगार EPF Balance | ना पासवर्ड ना एप्लीकेशन; EPF बॅलन्स चेक करणं झालं आणखीन सोपं, एका मिस्ड कॉलवर होईल काम - Marathi News Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर पुन्हा रॉकेट होणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: TATASTEEL Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांच्या महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY करावा की Sell - NSE: YESBANK
x

Tata Play IPO | आला रे आला टाटा ग्रुपचा IPO आला! टाटा प्ले कंपनी IPO लाँचबाबत मोठी अपडेट, टाटा तिथे नो घाटा, तपशील जाणून घ्या

Tata Play IPO

Tata Play IPO | सध्या जर तुम्ही IPO मध्ये गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर तुमच्यासाठी सुवर्णसंधी चालून आली आहे. टाटा समूहाचा भाग असलेल्या टाटा प्ले लिमिटेड कंपनीचा IPO लवकरच बाजारात दाखल होणार आहे. मात्र सध्या टाटा समूह हा आयपीओ पुढे ढकलण्याचा विचार करत असून टाटा समूहाने टेमासेक होल्डिंग्ज पीटीई कंपनीसोबत करार करण्यासाठी चर्चा सुरू केली आहे. या करार अंतर्गत टाटा समूह टेमार्सेककडून टाटा प्ले कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा विचार करत आहे. (Tata Play Share Price)

टाटा प्ले लिमिटेड कंपनीमध्ये सिंगापूर स्थित टेमासेक कंपनीने 20 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. टाटा प्ले आयपीओ पुढे ढकलण्याचे कारण म्हणजे, सध्याची बाजार परिस्थिती पाहता टाटा समूहाला टाटा प्ले कंपनीच्या आयपीओ बाबत सांशकता वाटत आहे. कदाचित टाटा समूह शेअर बाजाराची परिस्थिती सुधारल्यावर टाटा प्लेचा IPO जाहीर करू शकते. टाटा समूह टेमासेक कंपनीचे शेअर्स बोलणी करत आहे.

तथापि ही चर्चा अगदी सुरुवातीच्या टप्प्यावर असून ती खंडित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. टाटा समूह आणि टेमासेक कंपनीच्या प्रतिनिधींनी या प्रकरणावर माहिती दिली नाही. टाटा प्ले कंपनीने भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्डला IPO साठी कागदपत्र सादर केले असून कंपनीने माहिती सार्वजनिक न करता IPO कागदपत्रे सबमिट केले होती. असे करणारी टाटा प्ले ही पहिली भारतीय कंपनी मानली जात आहे.

सेबीकडे IPO कागदपत्र सार्वजनिकरित्या जाहीर न करता दाखल केल्याने आयपीओ आणण्याचा कोणताही दबाव कंपनीवर येणार नाही. याउलट जर एखादी कंपनी पारंपारिक पद्धतीने IPO अर्ज दाखल करत असेल तर त्या कंपनीला 12 महिन्यांच्या आत IPO आणणे बंधनकारक असतो. टाटा प्ले कंपनीच्या प्री-फाइलिंग प्लॅनला मे 2023 मध्ये SEBI कडून मंजूरी देण्यात आली होती.

तब्बल 18 वर्षांनंतर टाटा समूहाची कंपनी आपला IPO बाजारात लाँच करणार आहे. 2004 साली आलेला टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड कंपनी 1.2 अब्ज डॉलर्सचा आयपीओ शेवटचा होता. टाटा प्ले ही कंपनी पूर्वी टाटा स्काय या नावाने ओळखली जात होती. टाटा प्ले हा 21st Century Fox Inc. आणि The Walt Disney कंपनी यांचा संयुक्त उपक्रम आहे. टाटा प्ले कंपनी आपल्या अॅपद्वारे आणि सेट टॉप बॉक्सेसद्वारे आपल्या ग्राहकांना टेलिव्हिजन आणि व्हिडिओ स्ट्रीमिंग सेवा प्रदान करण्याचा व्यवसाय करते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Tata Play IPO check details on 07 July 2023.

हॅशटॅग्स

Tata Play IPO(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x