3 December 2024 10:53 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Multibagger Stocks | कुबेरचा खजिना आहे हा स्वस्त शेअर, दिला 2000% परतावा, खरेदीला गर्दी - BOM: 540693 IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल - GMP IPO Yes Bank Share Price | येस बँक शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, शेअर BUY, SELL की Hold करावा - NSE: YESBANK NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर मालामाल करणार, कंपनीबाबत अपडेट आली, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: NBCC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, कंपनीबाबत अपडेट, शेअर होणार रॉकेट - NSE: TATAPOWER BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: BEL 7th Pay Commission | सरकारी कर्मचारी आणि पेन्शनर्ससाठी गुड-न्यूज, 53% डीएसह 2 भत्त्यांमध्ये मोठी वाढ झाली
x

तुमच्या बाळाला घ्या नाहीतर गुवाहाटीला घेऊन जातील असं म्हणणाऱ्या टोले-बहाद्दर नेत्या स्वतःच शिंदेसोबत गेल्या, टिझन्स उडवत आहेत खिल्ली

MLC Neelam Gorhe

Neelam Gorhe | ठाकरे गटाच्या महिला नेत्या आज शिंदे गटात सामील झाल्या आहेत. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. काही दिवसांपू्र्वी आमदार मनिषा कायंदे यांनी मुख्यमंत्री शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर आता नीलम गोऱ्हेंच्या शिवसेना प्रवेशानंतर ठाकरे गटातील दुसऱ्या महिला नेत्या शिंदे गटात गेल्या आहेत.

ठाकरे गटाला रामराम ठोकून नीलम गोऱ्हेंनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. विधानभवनात शिवसेना पक्षकार्यालयात नीलम गोऱ्हेंनी पक्षप्रवेश केला आहे. पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उदय सामंत उपस्थित होते.

मागील अधिवेशनावेळी आरोग्यमंत्री तानाजी सावंत, विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत आमदार सरोज आहिरे यांना व त्यांच्या बाळासाठी सुसज्ज हिरकरणी कक्ष उपलब्ध करून देण्यात आला होता. यावेळी गुवाहाटीचा उल्लेख करत विधान परिषदेच्या उपसभापती निलम गोऱ्हे यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना मिश्कील टोला लगावला होता. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनीही निलम गोऱ्हेंना प्रत्युत्तर दिलं होतं.

आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी आमदार सरोज अहिरेंच्या बाळाला कडेवर घेतलं होतं.यावर नीलम गोऱ्हे म्हणाल्या होत्या, बाळाला घ्या नाहीतर गुवाहाटीला घेऊन जातील. यावर मंत्री तानाजी सावंत म्हणाले होते, तुम्हालाही गुवाहाटीला घेऊन जातो. आज त्याच नीलम गोऱ्हे आता शिंदे गटात गेल्यावर समाज माध्यमांवर त्यांची खिल्ली उडवली जातेय.

News Title : MLC Neelam Gorhe has joined Shinde Camp today check details on 07 July 2023.

हॅशटॅग्स

#MLC Neelam Gorhe(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x