23 November 2024 2:21 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Railway Ticket Booking | 90% रेल्वे प्रवाशांना माहित नाही, असं मिळेल रेल्वेचं सर्वांत स्वस्त तिकीट, ठाऊक आहे हा फंडा My EPF Money | EPF मधून पैसे काढण्याची सर्वांत सोपी पद्धत इथे पहा, खात्यातील जमा शिल्लक तपासून पैसे काढू शकता Credit Score | पगारदारांनो, तुमचा क्रेडिट स्कोर 750 असून सुद्धा लोन मिळणार नाही, जाणून घ्या नेमके कारण काय असेल Mutual Fund SIP | श्रीमंतीचा महामार्ग, 'या' भन्नाट फॉर्म्युल्याचा वापर करा, तुमचा मुलगा देखील 21 व्या वर्षी बनेल करोडपती HAL Share Price | डिफेन्स कंपनी HAL सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, स्टॉक रेटिंग सह टार्गेट प्राईस नोट करा - NSE: HAL Smart Investment | श्रीमंतीच्या मार्गावर घेऊन जाणारा फॉर्म्युला आहे जबरदस्त; व्हाल 2 करोडचे मालक, खास इन्वेस्टमेंट टीप Penny Stocks | श्रीमंत करतोय हा पेनी शेअर, पैसा 7 पटीने वाढला, खरेदीनंतर संयम करेल श्रीमंत - Penny Stocks 2024
x

TD Power Share Price | मजबूत पैसा देणारा शेअर! टीडी पॉवर शेअर्सनी 3 वर्षात 16 पट परतावा दिला, हा शेअर खरेदी कडून फायदा घेणार?

TD Power Share Price

TD Power Share Price | 27 मार्च 2020 रोजी टीडी पॉवर सिस्टम कंपनीचे शेअर्स 15.40 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तिथून आतापर्यंत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांच्या पैशात 16 पट वाढ केली आहे. मागील आठवड्यात मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये TD पॉवर सिस्टम्स कंपनीच्या शेअर्सने 240 रुपये किंमत पार केली होती.

पॉवर सेक्टर कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूकदारांनी किंचित विक्री केली आहे. परंतु शेअर बाजार तेजीत असताना टीडी पॉवर सिस्टम्स कंपनीचे शेअर्स देखील धावत आहेत. आज सोमवार दिनांक 10 जुलै 2023 रोजी टीडी पॉवर सिस्टम कंपनीचे शेअर्स 1.74 टक्के वाढीसह 240.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

टीडी पॉवर सिस्टम या इलेक्ट्रिकल उपकरणे बनवणाऱ्या कंपनीच्या शेअर्समध्ये मागील काही दिवसांपासून म्युच्युअल फंडाची गुंतवणूक वाढत आहे. एलआयसी म्युच्युअल फंड आणि क्वांट म्युच्युअल फंड आणि इतर अनेक म्युच्युअल फंडांनी टीडी पॉवर सिस्टम्स कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. TD पॉवर सिस्टीम कंपनीच्या शेअरची 52-आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 250 रुपये होती.

या कंपनीने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणुकदारांना 133.26 टक्के परतावा कमावून दिला आहे. टीडी पॉवर कंपनीच्या शेअर्सनी मार्च 2026 तिमाहीचे जबरदस्त निकाल जाहीर केले होते. कंपनीच्या एकूण उलाढालीत 10 टक्के झाली आणि कंपनीने 250 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. मार्च तिमाहीत टीडी पॉवर सिस्टम कंपनीने 44 टक्के वाढीसह 35 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.

टीडी पॉवर सिस्टीम्स लिमिटेड या कंपनीची स्थापना, 1999 साली झाली होती. ही कंपनी AC जनरेटरच्या उत्पादनात जगात दिग्गज कंपनी मानली जाते. टीडी पॉवर सिस्टम कंपनी प्राइम मूव्हर्स, स्टीम टर्बाइन, गॅस टर्बाइन, हायड्रो टर्बाइन्स, पवन टर्बाइन आणि डिझेल इंजिनचे देखील उत्पादन करण्याचे काम करते.

टीडी पॉवर सिस्टम कंपनीची ऑर्डर बुक खूप मजबूत आहे. TD Power Systems कंपनीचे शेअर्स सध्या 240 रुपये किमतीवर ट्रेड केट होते. 6 ऑगस्ट 2021 रोजी TD पॉवर सिस्टम्स कंपनीचे शेअर्स 38 रुपयेवर ट्रेड करत होते. आज हा स्टॉक 240 रुपयेवर पोहचला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | TD Power Share Price today on 10 July 2023.

हॅशटॅग्स

TD Power Share Price(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x